AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? हसन मुश्रीफ यांनी थेटच सांगितलं, आर्थिक अडचणी…

महायुतीच्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मुदत संपली असली तरी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी योजना बंद होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. आर्थिक अडचणी असूनही, ही योजना सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? हसन मुश्रीफ यांनी थेटच सांगितलं, आर्थिक अडचणी…
लाडकी बहीण योजना
| Updated on: May 01, 2026 | 8:04 AM
Share

महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सतत काही ना काही चर्चा सुरूच असते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महीना 1500 रुपये मिळतात. मात्र योजनेतील गैरप्रकार उघडकीस आल्यावर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. त्याची मुदत काल (30 एप्रिल) रोजी संपली. आता या योजनेसंदर्भात महायुतीमधील मंत्र्यांनीच एक महत्वाचं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते , मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी-बहीण योजनेबद्दल मोठं विधान केलंय. ही योजना बंद होणाहर, अशा वावड्या अधूनमधून उठत असतात. मात्र आता त्यावर खुद्द महायुतीमधील मंत्र्यांनीच वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ ?

नंदुरबार येथे बोलताना हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योनजेवरही भाष्य केलं. “लाडकी बहीण योजनेमुळे कुठल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाही आहे असं कुठेही निदर्शनास आलं नाही. लाडक्या बहिणी योजनेमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती चालू राहणार आहे. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. -या योजनेमुळे विकास कामांना निधी कमी मिळत आहे” असं म्हणत मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

अपात्र बहिणींकडून पैसे वसुली

लाडकी बहीण योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेत आणले. मध्यंतरी अशी चर्चा रंगली होती की लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते. मात्र असं काही होणरा नसून योजना सुरूच राहणारा असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. या योजनेत अनेक गैरप्रकारही झाले होते. अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली. निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली करण्याचे काम सरकारकडून सुरू करण्यात आले. राज्यातील 12915 लाभार्थी हे अपात्र आढळून आले. पैकी 6457 महिलांकडून आतापर्यंत 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ माजली होती.

Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!