आंतरराष्ट्रीय ‘लाडकी बहीण’, बांगलादेशी महिलेने घेतला योजनेचा लाभ, घुसखोरीनंतर योजनेवरही डल्ला
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका बांगलादेशी महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही महिला लाडकी बहिण योजनेचा गैरवापर करत होती. या प्रकरणात एका दलालालाही अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ राज्यातील कोट्यावधी महिलांना मिळाला असून त्यामुळे ही सतत चर्चेत असते. पण याच योजनेबद्दल आता एक महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशी महिलने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
राज्यभरामध्ये बांगलादेशी नागरिकाविरोधात धडक कारवाई सुरू आहे, सर्च ऑपरेशनही सुरू आहे. जसजसे हे नागरिक आढळता, सापडतात त्यांच्यावरती कारवाई केली जात आहे. मुंबईतसुद्धा गुन्हे शाखेकडून वेगवेगळ्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवण्यात येत असून बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दक्षिण मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातून 5 बांगलादेशींना अटक केली आहे. ज्यामध्ये एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा मिळाल्याचं समोर आलं आहे.
बनावट कागदपत्र तयार करून योजनेचा घेतला लाभ
हे बांगलादेशी जेव्हा भारतात येतात तेव्हा इथल्या एखाद्या एजंटला पकडून बनावट कागदपत्र तयार केली जातात आणि ते भारताचे रहिवासी असल्याचं दाखवतात. आणि त्याच कागदपत्रांचा वापर करून या बांगलादेशी महिलेने राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी, बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. कामाठीपुरा परिसरातून एका स्थानिक दलालालाही पोलिसांनी अटक केलेली आहे. एकूण 6 जमांवर ही अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जी प्राथमिक चौकशी केली त्यामध्ये जी महिला आहे तिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचता लाभ मिळाल्याचं उघड झालं आहे.
गेल्या महिन्या-दीड महिन्यात मुंबईत गुन्हे शाखेने जवळपास 30 हून अधिक गुन्हे दाखल केले असून सुमारे 50 बांगलादेशी नागरिकांना आत्तापर्यंत अटक केलेली आहे. यातही आत्तापर्यंत जी चौकशी केली जाता आहे, त्यामध्ये कामाठीपुरा परिसरात वास्तव्यास असलेल्या 5 बांगलादेशींना अटक केल्यानंतर त्यांच्यापैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झाल आहे. त्यासाठी कागदपत्र बनवून देण्यामध्ये ज्या एजंटने मदत केली त्याच्याविरोधातही वेगवेगळ्या कलमाअंतर्गंत गुन्हा दाखल केला जाईल. मात्र ज्या बांगलादेशींना आत्तापर्यंत अटक केली जाते, त्यांना स्थानिक पातळीवर मदत करणारे काही दलाल अथवा एजंट हेही सापडत आहेत. त्याअनुषंगाने त्यांना ताब्यात घेतलं जात आहे, अटकेची कारवाई केली जात आहे.