AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण संसदेत का घुसला? लातूर पोलिसांच्या हाती काय माहिती मिळाली?

संसदेत घुसखोरी करुन गोंधळ घालणारा तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील झरी गावचा रहिवासी आहे. संबंधित घटनेनंतर लातूर पोलीस अधिकच्या तपासासाठी झरी गावात दाखल झाले. त्यांनी अमोल शिंदे याच्या घरी जावून त्याच्या आई-वडिलांची चौकशी केली. यावेळी अमोल विषयी महत्त्वाची माहिती समोर आलीय.

पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण संसदेत का घुसला? लातूर पोलिसांच्या हाती काय माहिती मिळाली?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 13, 2023 | 5:15 PM
Share

महेंद्र जोंधळे, Tv9 मराठी, लातूर | 13 डिसेंबर 2023 : देशाचं सर्वोच्च सभागृह मानलं जाणाऱ्या संसदेत आज महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने गोंधळ घातला. त्याच्यासोबत यावेळी एक हरियाणाची महिलादेखील होती. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. संसदेवर अशाप्रकारे कुणी घुसखोरी करुन गोंधळ कसा घालू शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संबंधित प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाला खळबळून जाग आली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी घोषणाबाजी करणारा आणि संसदेच्या सभागृहात पिवळा धूर करणाऱ्या तरुणाचं अमोल शिंदे असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या वरिष्ठ पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना याप्रकरणी अधिकची माहिती मिळवण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर पोलीस अमोल शिंदे याच्या लातूर जिल्ह्यातील झरी गावात दाखल झाले.

अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. संबंधित घटनेनंतर चाकूर पोलीस तातडीने झरी गावात दाखल झाले. ते झरी गावात विचारपूस करत अमोल शिंदे याच्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांना त्याच्याविषयी माहिती विचारली. अमोल धनराज शिंदे असं त्याचं पूर्ण नाव आहे. अमोलची घरची परिस्थिती खूप बेताची आहे. त्याचे आई-वडील मजूर आहेत. ते मजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. दुसरीकडे अमोल हा शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून समोर आली आहे.

गावकऱ्यांना अमोल विषयी जास्त माहिती नाही

अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून काय करत होता? याची चौकशी पोलिसांनी यावेळी केली. पोलिसांनी त्याच्या झरी गावातील नागरिकांची चौकशी केली. अमोलच्या नातेवाईकांशी चर्चा केली. गावातील नागरिकांशी चर्चा केली. गावातील कुणालाही अमोल याच्याविषयी जास्त माहिती नाही. अमोलला गावात राहायला आवडत नसे, अशी देखील माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

अमोल पोलीस भरतीची तयारी करायचा

पोलिसांनी अमोल शिंदे याच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच त्याच्या घरात कागदपत्रे ठेवलेल्या भागाची झडती घेतली आहे. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांची चौकशी केली असता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली. अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. तो कुटुंबिय आणि गावापासून दूर राहत होता. तो गेल्या 15 दिवसांपूर्वी दिल्लीला जातो असं आई-वडिलांना सांगून निघून गेला होता, अशी माहिती समोर आलीय. अमोल शिंदे हा दिल्लीत का गेला? नेमकं काय काम होतं? त्याच्यासोबत कोण-कोण होतं? याचा तपास पोलीस आता करत आहेत.

Follow Us
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद