जरांगे चौथी नापास गडी, मुख्यमंत्र्यांची आय-माय… बीडच्या सभेत लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले?
Jarange vs Hake: बीडमध्ये ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा पार पडत आहे. या सभेला राज्यातील प्रमुखे ओबीसी नेते हजर आहेत. या सभेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांचा उल्लेख चौथी नापास असा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बीडमध्ये ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा पार पडत आहे. या सभेला राज्यातील प्रमुखे ओबीसी नेते हजर आहेत. या सभेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांचा उल्लेख चौथी नापास असा केला आहे. तसेच पुढे बोलताना हाके म्हणाले की, ‘भुजबळ साहेब दोन दिवस झालं इथ सांगितलं जातय की भुजबळांना बीडमध्ये येऊ देणार नाही. मात्र तुमचा एक कार्यकर्ता बीडच्या उमापूर गावात सभा घेत होता. भुजबळ साहेबांच लांब, तुम्ही ओबीसीच्या एका कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का तर लावून पहा.’
ओबीसींचे आरक्षण संपवणारा जीआर
लक्ष्मण हाके म्हणाले की, मी आज एक जीआर घेऊन आलो आहे. हा जीआर ओबीसींचे आरक्षण संपवारा आहे. यातील एक वाक्य आहे की, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी साठी शासन निर्णय घेत आहे. तायवाडे साहेब तुम्ही म्हणता, कुणब्यांना आरक्षण दिलं आहे, याद्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. भुजबळ साहेब तुम्ही मुख्यंमंत्र्यांना मागास्वर्गीय आयोग बरखास्त करायला सांगा.
चाैथी नापास गडी…
जरांगे पाटलांवर बोलताना हाके म्हणाले की, ‘एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणांच्या अन्नामध्ये विष कालवण्याचे काम या सरकारकडून झालं आहे. हा जरांगे उठसूट भुजबळांवर टीका करतो, धनंजय मुंडेंवर टीका करतो. या जरांगेविषयी बोलायचं झाल्यास चौथी नापास गडी. मुख्यमंत्र्यांची आय-माय काढणारा हा माणूस, मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही तर राज्यातील 14 कोटी जनतेचा अपमान आहे.
आम्ही ओबीसी बांधवांनी तुम्हाला मतदान दिले, ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला आम्ही घरी बसवलं. त्याच तुम्ही आम्हाला काय फळ दिल? तर हा जी आर काढला. इथ गावगाड्यातील सर्व लोकं उपस्थित आहेत. आपली लोकं टार्गेट केली जात आहेत, आरक्षण संपवलं आहे. लोकनियुक्त सरकारकडून आरक्षणाचं संरक्षण झालं नाही. जर आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागत असेल तर तुम्ही काय कामाचे?
आपल्या भाषणाच्या शेवटी हाके म्हणाले की, ‘जीआर काढून आरक्षण मिळत नाही, यासाठी तुम्हाला खालच्या समाजात यावं लागेल, आमच्या लोकांनी त्रास सहन केला आहे. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कायदा नाही. ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. मराठी समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका ही आमची भूमिका आहे.’
