AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे भुजबळ बिजबळ…, लक्ष्मण हाकेंचा नवा व्हिडिओ व्हायरल, बघा काय म्हणाले?

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर ओबीसी नेते देखील आक्रमक झाले आहेत. हे सर्व सुरू असतानाच आता लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हे भुजबळ बिजबळ..., लक्ष्मण हाकेंचा नवा व्हिडिओ व्हायरल, बघा काय म्हणाले?
laxman hakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 9:59 AM
Share

एकीकडे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 29 ऑगस्टपासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सरकार कुणबी प्रमाणपत्र रद्द करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणनेतर ओबीसी नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा समाजाचे नेते आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान या घडामोडी घडत असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  हा व्हिडीओ नवनाथ वाघमारे यांना उद्देशून असल्याचं बोललं जातं आहे. मात्र टीव्ही 9 मराठी या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही. आपल्याला 90 टक्के रिस्पॉस आहे, तरीही आपण आबाला पुढे करत असल्याचं या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके यांनी काय म्हटलं? 

आपल्याला 90 टक्के रिस्पॉस तरी आबाला पुढे करतो, असं म्हटलेला हाकेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना उद्देशून असल्याचं बोललं जात आहे. मात्र या व्हिडीओची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 90 टक्के रिस्पॉस मला आहेना, लक्ष्मण हाकेला 90 टक्के रिस्पॉस आहे. पण मी लोकांना सांगतो नाही आबाला पुढे घ्या, आबाला पुढे घ्या. नाही आबाच्या नावाने घोषणा द्या, हे सगळं मी करतोय ना, हे भुजबळ-बिजबळ सोडा, आमदार, खासदारांनी धास्ती घेतलीये. असं या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके म्हणताना दिसत आहेत,

दरम्यान सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना उद्देशून असल्याचं बोललं जात आहे. मी आबाला पुढे करतो, असं यामध्ये लक्ष्मण हाके म्हणताना दिसत आहेत.

Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका