एकनाथ खडसेंचा सनसनाटी दावा, जावयाचा गेम?, थेट केले गंभीर आरोप आणि…

Eknath Khadse on pune rave party : एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. हेच नाही तर रेव्ह पार्टीवरून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली. आता यावर नाथाभाऊंनी मोठे भाष्य केले आहे.

एकनाथ खडसेंचा सनसनाटी दावा, जावयाचा गेम?, थेट केले गंभीर आरोप आणि...
| Updated on: Jul 28, 2025 | 2:33 PM

पुणे : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान अटक केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली. या रेव्ह पार्टीचे आयोजन प्रांजल यांनीच केल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील हडपसर भागातील घरावरही छापा टाकला. नाथाभाऊंच्या जावयाला रेव्ह पार्टीदरम्यान रंगेहात पकडल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली.

काल त्यावर नाथाभाऊंनी भाष्य केले. आज एकनाथ खडसे हे पुण्यात असून त्यांनी मोठी शंका व्यक्त केलीये. या रेव्ह पार्टी प्रकरणात बोलताना खडसे म्हणाले की, मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही, परंतु पोलीस यंत्रणेकडून माहिती कशी दिली जाते, एखाद्याचे मोबाईलमधील व्हिडीओ बाहेर कसे येत आहेत. पोलिसांना काय अधिकार आहेत हे व्हिडीओ माध्यमांना देण्याचा.

ड्रग्ज घेतल्याचा रिपोर्ट आला नाही, अल्कहोल घेतल्याचा पुरवा आला आहे. काय काळबेर सुरू आहे, एकदंरीत प्रकरण पाहता काही तरी काळबेरं दिसत आहे. माझ्या जावयाने ड्रग्ज आयुष्यात पाहिला नाही. पोलिस या प्रकरणात जेवढी तत्परता दाखवत आहेत तेवढीच तत्परता लोढा प्रकरणात का दाखवत नाहीत, असाही प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

ते बोलताना पुढे म्हणाले की, त्या सिडीमध्ये, त्या पेन ड्राईव्हमध्ये काय होते ते दाखवावे. लोढांनी ज्या मंत्र्यांवर आरोप केले आहेत, त्याचे पुरावे पण पोलिसांनी दाखवावे. पोलिसांची मिटिंग झाली, पोलिसांनी संध्याकाळी थांबवुन ठेवले, जावयाची चुक आसेल तर पाठीशी घालणार नाही. पोलिस तपास करत आहेत, तपासाची जे निष्कर्ष येतील त्यानंतर मी बोलणार आहे.

पोलिस म्हणतात अल्कहोलचा रिपोर्ट आला ड्रग्जचा रिपोर्ट आला नाही. पोर्षे प्रकरणात रिपोर्टमध्ये फेरफार झाला होता, त्यामुळे ससूनमध्ये फेरफार होतो. एकुणच सर्व प्रकरणात शंका येते, असेही आता थेट एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. रोहिणी खडसे यांची आज पुणे आयुक्तांसोबत मिटिंग होती. मात्र, ही मिटिंग अचानक रद्द करण्यात आली, ज्यानंतर विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. यासोबतच प्रांजल खेवलकर याच्या अटकेनंतर रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे पुण्यात तळ ठोकून आहेत.