AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचा नेता करणार बंडखोरी? थेट स्टेजवरूनच मोठी घोषणा, निवडणुकीआधीच राजकारण तापलं

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा महायुतीमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकांपूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचा नेता करणार बंडखोरी? थेट स्टेजवरूनच मोठी घोषणा, निवडणुकीआधीच राजकारण तापलं
eknath shindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 5:32 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच पुणे शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघामधून उमेदवारी मिळावी यासाठी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे इच्छूक आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली आहे. परंतु दुसरीकडे भाजपकडून देखील या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. मात्र वेळ पडल्यास भाजपा म्हणून निवडणुकीला दोन्ही मतदारसंघात सामोरे जाऊ, असं या संदर्भात बोलताना भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे.  मंगेश चिवटे यांनी रुग्णसेवेमध्ये जो चिवटपणा दाखवला त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये ते आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. मंगेश चिवटे यांना पाठिंबा दिला नाही, आणि  जर  बंडखोरी करण्याचं काम पडलं तर आम्ही बंडखोरीचे बादशाह आहोत असा सूचक इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे.  जो चांगला आहे त्याच्या मागे आम्ही उभं राहतो, नेत्यांचा विरोध असला तरी त्याची पर्वा करत नाही, असंही ते यावेळी म्हणाले, ते अमरावतीमध्ये आयोजित आरोग्य शिबिरात बोलत होते.

दरम्यान बच्चू कडू यांच्या या विधानानंतर आता महायुतीमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांच्यापूर्वी भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी या मतदारसंघाबाबत बोलताना मोठं विधान केलं होतं.  पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. मात्र वेळ पडल्यास भाजपा म्हणून निवडणुकीला दोन्ही मतदारसंघात सामोरे जाऊ, असा सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यानंतर आता बच्चू कडू यांनी देखील दावा केल्याने आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?