Legislative Council Election Results : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट, मोठी बातमी समोर
23 ऑक्टोबर रोजी राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकीच्या जागांसाठी निवडणूक झाली होती. ज्यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ अशा पाच जागांचा समावेश आहे. आज मतमोजणी सुरू आहे, याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

23 ऑक्टोबर रोजी राज्यातील पाच विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक झाली होती. ज्यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ अशा पाच जागांचा समावेश आहे. दरम्यान आज या पाचही जागांची मतमोजणी सुरू आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे हे आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमाकांवर अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्यामध्ये चुरशीची लढत पहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे मात्र पुणे शिक्षक मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाने अपक्ष उमेदवार असलेल्या सचिन सानप यांच्या नावाची शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषणा केली होती. ते मात्र सध्या तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. ही विधान परिषदेची निवडणूक शिवसेना शिंदे गटाकडून अतिशय प्रतिष्ठेची बनवण्यात आली होती. पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीमध्ये भाजपसोबतच शिवसेना शिंदे गटाकडून देखील दावा करण्यात आला होता.
मात्र महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. भाजप या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्यानंतर देखील त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र दुसरीकडे सचिन सानप यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता.
सचिन सानप हे मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यानंतर या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने सानप यांना पाठिंबा दिल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. आता मतमोजनीचे सुरुवातीचे कौल हाती येत आहेत. ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसताना दिसून येत आहे.
