मोठी बातमी! तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे पदच नाही, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला  पाठवलेल्या पत्रात फक्त दोनच पदांचा उल्लेख आहे. त्यामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कोणतंही पद नाही.

मोठी बातमी! तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे पदच नाही, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर
Sunetra Pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 01, 2026 | 9:51 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला  पाठवलेल्या पत्रात दोनच पदांचा उल्लेख, आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, तर शिवाजीराव गर्जे खजीनदार असा या पत्रामध्ये दोनच पदांचा उल्लेख आहे. या पत्रांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असा उल्लेख आहे. तर शिवाजीराव गर्जे यांचा खजीनदार म्हणून उल्लेख आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिल्या पत्रात 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र त्यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नाही, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख या पत्रात नाहीये, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या काळात निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिण्यात आले होते, त्यामध्ये मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे त्यांच्या पदाचा उल्लेख होता. मात्र त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलं आहे, त्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये.

जेव्हा एखाद्या व्यक्तीची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होते, तेव्हा निवडणूक आयोगाकडे पक्षाशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात. तुमच्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये कोण -कोण आहे? त्यांच्या नावाची यादी देखील निवडणूक आयोगाला पाठवावी लागते. त्यानुसार राष्ट्रीवादीकडून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आलं, त्या पत्रामध्ये केवळ सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला आहे, तर दुसरीकडे शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे खजीनदार असा उल्लेख करण्यात आला आहे. इतर कोणाच्याही नावापुढे पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये, दरम्यान जेव्हा सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हाच सुनील तटकरे याची प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती, मात्र या पत्रात त्याचा उल्लेख नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान हे पत्र समोर आल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी एक ट्विट देखील केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदावर कायम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

Follow Us