AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात वीज पडली अन् जमिनीतून सुरु झाला निळ्या पाण्याचा प्रवाह, निळे पाणी पाहण्यासाठी गर्दी, पाहा Video

blu water from earth surface: वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी का वाहू लागले? या प्रश्नाचे शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी भूगर्भ शास्त्रांची मदत घेतली जाणार आहे. अगदी गडद निळ्या रंगाचे हे पाणी वाहत आहे. धारशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चार्य व्यक्त केले जात आहे.

शेतात वीज पडली अन् जमिनीतून सुरु झाला निळ्या पाण्याचा प्रवाह, निळे पाणी पाहण्यासाठी गर्दी, पाहा Video
धारशिव जिल्ह्यातील शेतात निळे पाणी वाहू लागले.
| Updated on: Jun 13, 2024 | 7:12 AM
Share

राज्यात अनेक भागात मान्सून पोहचला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेती कामांना वेग आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली. धारशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला गावातील एका शेतात वीज पडली. त्यानंतर त्या शेतीतील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागले. भूगर्भतून निळे पाणी येऊ लागल्यामुळे ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. त्याचे व्हिडिओ काढून लोक सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

का आले निळे पाणी

वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी का वाहू लागले? या प्रश्नाचे शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी भूगर्भ शास्त्रांची मदत घेतली जाणार आहे. अगदी गडद निळ्या रंगाचे हे पाणी वाहत आहे. धारशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चार्य व्यक्त केले जात आहे.  मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे. परंतु धारशिवमधील प्रकारची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

पावसानंतर जायकवाडीत पाण्याची आवाक

मराठवाड्यात दमदार पाऊस सुरु झाल्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. पहिल्याच पावसाने धरणात पाणी साठू लागले आहे. या पावसामुळे संभाजीनगरला महिनाभर पाणी पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जायकवाडी धरणात तब्बल 1 टक्क्याने पाणीसाठा वाढला आहे. जायकवाडी धरणात 4600 क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडी धरण भरायला सुरुवात झाल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे.

संभाजीनगरात मान्सूनचे आगमन

संभाजीनगरात मान्सूनचे आगमन दमदार झाले आहे. ६ तासांत ५७.८ मिमी पाऊस झाला आहे. संभाजीनगरमध्ये ५७.८ मिमी. पावसाची नोंद झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेने दिली. तसेच नांदेड, बीड,जालना, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.