
मुंबई : देशात लोकसभा निवडणूकांचा माहोल सुरु आहे. केंद्रात सलग दोन वेळा सत्ता मिळविणाऱ्या भाजपाप्रणीत एनडीए आघाडीने ‘अब की बार, 400 पार’चा नारा देत पुन्हा एकदा दिल्ली काबीज करण्याचा निर्धार केलाय. एनडीए आघाडीने प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. देशातील विविध राज्यात लोकसभा निवडणूक मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे तर पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मतदान होणार आहे. मुंबईमध्ये सहा लोकसभा मतदार संघ आहेत. येथे शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले आणि पक्ष बळकावलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार टक्कर होणार आहे. या मतदार संघातील काय आहे परिस्थिती याचा घेतलेला आढावा. मुंबईत सहा लोकसभा मतदार संघात एकूण 98.8 लाख मतदार आहेत. एकूण 9...