Lote MIDC Blast : लोटे एमआयडीसीत भीषण स्फोट, चार कामगारांचा मृत्यू

Lote MIDC Blast : लोटे एमआयडीसीमधील (Lote MIDC Blast) घरडा  (Gharda Chemical company) इथे एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे.

Lote MIDC Blast :  लोटे एमआयडीसीत भीषण स्फोट, चार कामगारांचा मृत्यू
Lote MIDC blast chemical factory
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 11:33 AM

रत्नागिरी :  लोटे एमआयडीसीमधील (Lote MIDC Blast) घरडा केमिकल कंपनीत भीषण (Gharda Chemicals company) स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू तर दोन कामगार गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सकाळी एकापाठोपाठ एक असे दोन स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनीला आग लागली. यामध्ये अनेक कामगार जखमी झाले. (Lote MIDC blast at Chemical Plant many workers died today ratnagiri chiplun news)

जखमी कामगारांना कळबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनीतील बॉयलर गरम होऊन अचानक स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात सहा जण जखमी झाले होते, त्यापैकी काहींचा मृत्यू झाला. तर स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे कंपनीत 40-50 जण अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. घटनास्थळी सात ते आठ ॲम्बुलन्स दाखल आहेत. अग्निशमन दलाने आगीवर यश मिळवत, जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं.

नेमकं काय घडलं? 

लोटे एमआयडीसीतील घरडा इथल्या केमिकल कंपनीत नेहमीप्रमाणे कामगार दाखल झाले. मात्र आधापासूनच कार्यरत असलेला कंपनीतील बॉयलर प्रचंड गरम झाला होता. या केमिकल बॉयलरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये काही कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. तर काही जण जखमी झाले.

जखमी कामगाराला मुंबईला हलवणार

दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्या एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे. या कामगाराला तातडीने मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. बॉयलरच्या स्फोटामुळे कंपनीत भीषण आग लागली. या आगीने अनेक कामगारांना आपल्या कवेत घेतलं. त्यामुळेच काहींचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले.

VIDEO :

संबंधित बातम्या   

Chemical Company Blast | रासायनिक कंपनीत भीषण स्फोट, डोंबिवली हादरली, रक्षाबंधनामुळे मोठी दुर्घटना टळली

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.