
बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला होता. तसेच वाल्मिक कराडची दोन्ही मुलं या हत्येत सहभागी होते असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यानंतर आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड म्हणाला की, ‘महादेव मुंडे हत्या प्रकरणात होत असलेले आरोप खोटे आहेत. कराड कुटुंबीयांचा एक सदस्य म्हणून मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी करेल. मुख्यमंत्री साहेबांना आमची देखील बाजू ऐकून घ्यावी लागेल. त्यांनी आम्हालाही वेळ दिलाच पाहिजे.’
पुढे बोलताना सुशील म्हणाला की, ज्ञानेश्वरी ताईंना ज्यांनी ऑफर दिली त्यांचं नाव त्यांनी उघड-उघड जाहीर करावं. खरंच त्यांना ऑफर गेली आहे की नाही? हे कळू तर द्या. आम्ही तर कुठली ऑफर दिलेली नाही. हादेव मुंडेंना आम्ही कधीही ओळखत नव्हतो. ना मी त्यांना कधी पाहिलं होतं, ना माझ्या भावाने त्यांना कधी पाहिलं होतं, ना माझ्या वडिलांनी त्यांना कधी पाहिलं होतं.
महादेव मुंडे यांचा मर्डर झाला असं म्हणतात. मर्डर झाला त्यादिवशी रात्री माझे वडील महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत तिरुपतीला होते. हादेव मुंडे हत्या प्रकरणात आमची कुठलीही चौकशी झालेली नाही. ज्या दिवशी आम्हाला चौकशीला बोलावतील त्या दिवशी आम्ही चौकशीला जायला तयार आहोत. झ्याकडे आणि माझ्या वडिलांकडे पासपोर्ट नाही. माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे वाटलं तर मी एसपी साहेबांकडे माझ्या भावाचा पासपोर्ट जमा करून टाकतो. या प्रकरणात कोणाचा दबाव आहे हे मला माहित नाही. मात्र आमचा यामध्ये संबंध नाही.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर बोलताना सुशील म्हणाला की, ‘रवी सानप साहेबांची बदली करण्यात आली असं म्हटले. इलेक्शन कमिशनच्या जीआर प्रमाणे रवी सानप यांची रूटीन बदली झालेली आहे. कमलेश मीना साहेब तर आयपीएस अधिकारी आहेत त्यांचं प्रमोशन आम्ही कसं करणार.
पुढे बोलताना सुशील म्हणाला की, ‘येणार्या काळात आम्ही पत्रकार परिषद घेऊ. समोरचे लोक म्हणतात आमच्याकडे पुरावे आहेत. आमच्याकडेही जे काही पुरावे आहेत ते सादर करू. महादेव मुंडेंच्या प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना नक्कीच शिक्षा व्हावी. 20 महिन्यानंतर येऊन कोणीतरी बोलतंय त्यामध्ये किती तथ्य आहे हे तपासातून पुढे येईल.’