Maharashtra all party meeting  : लॉकडाऊनची वेळ आली आहे दुसरा कोणता पर्याय नाही, वाचा मुख्यमंत्र्यांनी मांडलेले 10 मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय बैठक (Maharashtra all party meeting) बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंदर्भात (Maharashtra lockdown) या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.

Maharashtra all party meeting  : लॉकडाऊनची वेळ आली आहे दुसरा कोणता पर्याय नाही, वाचा मुख्यमंत्र्यांनी मांडलेले 10 मुद्दे
Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 5:48 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय बैठक (Maharashtra all party meeting) बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंदर्भात (Maharashtra lockdown) या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत (Maharashtra all party meeting CM Uddhav Thackeray 10 most important points from meeting).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले 10 मोठे मुद्दे :

  1. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे.
  2. लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये.
  3. महिन्याभराच्या आता आपण नियंत्रण आणू शकतो. पण एकमत व्हायला हवं. एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे
  4. लोकांचं येणे जाणे कमी करणे हा उद्देश आहे. कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याचे नियोजन करा. ‘पीक अवर’ ही संकल्पना आता बदलायला हवी.
  5. निवडणूक आणि लग्न सराई सुरू झाली. यामुळे 25 वर्षावरील मुलं सुद्धा संक्रमित होत आहे. 45 वयावरील लोकांप्रमाणेच, आता 25 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांनाही लस देण्याची केंद्राकडे विनंती.
  6. व्हॅक्सिनचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधानसमोर मांडला.
  7. रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे.
  8. राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदीबाबतचा आढावा
  9. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही.
  10. राज्यात संपूर्ण लॉकडाऊनसाठी होकार देण्याचं सर्व पक्षांना आवाहन (Maharashtra all party meeting CM Uddhav Thackeray 10 most important points from meeting)

मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?

कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडला होता. सध्या कोरोनाची साखळी तोडणं आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. कालच निर्णय झाला असता पण देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजची ही बैठक बोलावली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच उद्योगांबाबत बोलताना लोकांचं येणं जाणं कमी केलं पाहिजे. कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याचं नियोजन करा, पीक आवर ही संकल्पना आता बदलायला हवी, असं मतही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केलं आहे.

(Maharashtra all party meeting CM Uddhav Thackeray 10 most important points from meeting)

हेही वाचा :

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची भूमिका

… तर कोरोनावर महिन्याभरात नियंत्रण मिळवू शकू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.