स्कूल बसमधून लेकरं शाळेला जायची, आता त्यातून कोरोना रुग्णांचा मृतदेह नेण्याची वेळ

अमरावती जिल्ह्यात सरासरी 17 ते 18 बाधितांचा मृत्यू होत असल्यानं मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यास रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहेत. Amravati school bus for corona patient dead bodies transport

स्कूल बसमधून लेकरं शाळेला जायची, आता त्यातून कोरोना रुग्णांचा मृतदेह नेण्याची वेळ
अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांचे मृतदेह स्कूल बस मधून नेण्यात येत आहेत.

अमरावती: राज्यात शनिवारी तब्बल 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार 160 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात 63 हजार 818 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढताना दिसत आहेत. राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 63928 इतकी झाली आहे. अमरावतीमध्ये देखील कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यात सरासरी 17 ते 18 बाधितांचा मृत्यू होत असल्यानं मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यास रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहेत. जिल्हा प्रशासनावर यामुळे स्कूल बसचा वापर करण्याची वेळ आलीय. (Maharashtra Amravati district administration used school bus for corona patient dead bodies transport )

मृतदेह वाहतुकीसाठी स्कूल बसचा वापर

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. अमरावती मधे सुद्धा पुन्हा एकदा कोरोनाची लाट वाढली असून त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी 17 ते 18 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू होत आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढल्याने आता मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका ही कमी पडत आहे. त्यामुळे प्रशासन आता कोरोनाबाधितांच्या मृतदेह वाहतुकीसाठी स्कूल बसचा वापर करत आहे. आता कोविड रुग्णालयातून कोरोना बाधितरुग्णांचे मृतदेह स्मशानभूमीत स्कूल बसमधून नेण्यात येत आहेत.

अमरावतीच्या सीमा बंद, ई-पास असणाऱ्यांना प्रवेश

ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने, आणखी कडक पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा सीमा आता बंद करण्यात आल्या आहेत .जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस तैनात करण्यात आलेत. अमरावती ते यवतमाळ सीमा बंद करण्यात आली आहे. जिल्हा बाहेरून किंवा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या गाड्यांची पोलीस चौकशी करत आहेत. ज्यांच्याकडे ई-पास असेल त्यांना प्रवेश दिला जातोय.

नियमांचे उल्लंघन करणारी चांदूर रेल्वे शहरातील 5 दुकानं सील

संचारबंदीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील 5 दुकानांना सील लावण्यात आलं आहे. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या पथकाने केली. कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदीत निर्बंध अधिक कडक करण्यात आले असून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते सकाळी 11 अशी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

(Maharashtra Amravati district administration used school bus for corona patient dead bodies)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI