AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचे ग्रहण, राहुरीतील बडा नेता नाराज

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिल्याने कदम कुटुंब नाराज झाले आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि त्यांचे पुत्र सत्यजित कदम यांना अपेक्षा होती, पण तिकीट कापल्याने त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. यामुळे राहुरीतील निवडणूक अधिक रंजक होणार आहे.

पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचे ग्रहण, राहुरीतील बडा नेता नाराज
| Updated on: Oct 21, 2024 | 10:32 AM
Share

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघा एक महिना शिल्लक आहे. त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच काल भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपची ही यादी जाहीर होताच आता पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. भाजपकडून राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यामुळे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि त्यांचे पूत्र सत्यजित कदम हे नाराज झाले आहेत.

ऐनवेळेला तिकीट कापल्याने नाराज 

भाजपची पहिली यादी जाहीर होताच आता पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर कदमांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पूत्र सत्यजित कदम हे देखील राहुरी मतदारसंघांसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळेला तिकीट कापल्याने ते नाराज झाले आहेत.

दोन दिवसात निर्णय घेणार

सत्यजित कदम यांनी उघडपणे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. “मी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. मी कार्यकर्त्यांमुळे नेता झालो, त्यामुळे त्यांना विचारूनच पुढचा निर्णय घेणार आहे. येत्या दोन दिवसात मी याबद्दलचा निर्णय घेईन”, असे सत्यजित कदम म्हणाले.

सत्यजित कदम यांच्यासोबतच चंद्रशेखर कदम यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत पक्षहितासाठी थांबलो होतो, मात्र पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे आता सत्यजित कदम आणि त्यांचे कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी ठामपणे उभा राहणार, असे चंद्रशेखर कदम म्हणाले.

सत्यजित कदम निवडणूक लढवण्यास इच्छुक

दरम्यान २०१९ मध्ये माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र त्यावेळी शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आले. शिवाजी कर्डीले यांचा त्यावेळी पराभव झाला होता. त्यानंतर सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय गणिते पाहता २०२४ च्या विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बोललं जात होतं. सत्यजित कदम यांनी मुंबईत भाजप वरिष्ठांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. पण राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.