AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly Election : या पाच व्हीआयपी जागांवर रंजक लढत

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे. या पाच ही जागांवर मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Assembly Election : या पाच व्हीआयपी जागांवर रंजक लढत
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 19, 2024 | 5:30 PM
Share

देशातील सर्वात समृद्ध राज्य महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील जनता 20 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी या दिवशी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडी आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या विचारधारेच्या भूमिकेखाली मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केले आहे. तर शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट, शिवसेना-उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी-शरद पवार गट यांनीही जोरदार प्रचार केलाय.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 234 मतदारसंघ सर्वसाधारण, 29 अनुसूचित जाती (एससी) आणि 25 अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव आहेत. या जागांसाठी एकूण 10 हजार 900 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 3302 जणांनी माघार घेतली. तर 1649 जणांचे अर्ज बाद झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा या राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपापल्या पक्षांचा प्रचार केला. पण राज्यात अशा पाच जागा आहेत जेथे रंगतदार निवडणूक होणार आहे.

1. वरळी

मुंबईच्या वरळी विधानसभेच्या जागेवर यावेळी तिरंगी लढत होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाचे मिलिंद देवरा रिंगणात आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे ही निवडणूक लढवत आहेत. मिलिंद देवरा हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. यूपीए-2 सरकारमध्ये ते मंत्री होते. संदीप देशपांडे स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत.

2. बारामती

बारामतीची जागा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र यावेळी पवार कुटुंबातच स्पर्धा आहे. या जागेवरून शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. जनता काका निवडून देते की पुतण्याला हे पाहणं येथे उत्सूकतेचं ठरणार आहे.

अजित पवार हे 1991 पासून सलग सात वेळा या मतदारसंघातून आमदार आहेत. तर युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहेत.

3. वांद्रे पूर्व 

काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले झीशान सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. बाबा सिद्दीकी यांची नुकतीच हत्या झाली होती, त्यामुळे झीशान सिद्दीकी यांना जनतेची सहानुभूती मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. झीशान सिद्दीकी मुस्लीम समाजात लोकप्रिय चेहरा आहेत. तर वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांचा पुतण्या आहे.

4. नागपूर दक्षिण पश्चिम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग चौथ्यांदा नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे रिंगणार आहेत.  2009 पासून नागपूर दक्षिण पश्चिममधून आमदार असलेले फडणवीस 2019 मध्ये 49,000 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. विकासकामांवर आणि भाजपच्या मजबूत संघटनात्मक पायावर त्यांची लोकप्रियता अवलंबून आहे.

काँग्रेसचे प्रफुल गुडधे हे स्थानिक समस्या आणि शहरी पायाभूत सुविधांतील त्रुटींवरून निवडणुकीच्या मैदानात उतरलेत.

5. कोपरी-पाचपाखाडी

या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केदार दिघे यांच्यात लढत आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आनंद दिघे यांच्या कौटुंबिक आणि भावनिक संबंधांमुळे केदारला स्थानिक मराठी मतदारांचाही पाठिंबा मिळू शकतो.

Follow Us
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा