
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आधी सरकार स्थापनेला मग मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला. त्यानंतर अजून खाते वाटप झालेलं नाही. आता पुढील काही तासात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान थंडगार वाऱ्याने एक्स्प्रेस वेवर धुक्याची चादर आहे. मावळ थंडीने गारठला असून लोणावळ्यात पुणे मुंबई एक्स्प्रेस वे धुक्यात हरवला आहे, तर संपूर्ण मावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे. सहयाद्रीच्या पर्वत रांगेत घाट माथ्यावरील पट्टा धुक्यात हरवल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि आल्हाददायक धुकं यामुळे पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झालाय. तर दुसरीकडे वाहनचालक गाडी चालवताना या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटत आहे.
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण आणि नगरविकास खातं मिळालं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात आलं आहे.
कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?
आजपासून 3 जानेवारीपर्यंत नाशिक शहरात आंदोलनास मनाई करण्यात आली आहे. नाताळ, 31 डिसेंबर आणि भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारीला होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला आहे. शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी 21 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू असेल. राजकीय पक्ष व संघटनांना विनापरवानगी धरणे आंदोलन, निदर्शने अथवा रास्ता रोको करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मनाई हुकूम आदेश काढण्यात आला आहे.
मंत्रीपद मिळाल्यानंतर नितेश राणे उद्या प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.नितेश राणेंचे ग्रँड स्वागत होणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण येथे प्रथम होणार स्वागत त्यांनतर दिवसभर संपूर्ण जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी स्वागत होणार आहे. कणकवली येथे रात्री नऊ वाजता भव्य दिव्य स्वागत झाल्यानंतर हा स्वागत सोहळा समाप्त होणार आहे. ग्रँड स्वागतासाठी नितेश राणे उद्या सकाळी मुंबई वरून चॉपरने आगमन करणार आहेत.
हिवाळी अधिवेशनाची थोड्याच वेळात सांगता होणार आहे. सभागृह संपल्यानंतर विरोधी पक्षही घेणार पत्रकार परिषद घेणार आहे.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर पोहोचले आहेत. पीएम मोदींची ही भेट देखील खास आहे कारण 43 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी कुवैतला भेट दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज शरद पवार बीडच्या मस्साजोग गावात गेले होते. यावेळी पवारांनी पीडित देशमुख कुटुंबाचे सांत्वन केले. पवार साहेब आल्यामुळे आम्हाला धीर मिळाला, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहेत.
अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील १० लाख एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील ११० प्रकल्प सुरु आहे. त्यासाठी केंद्राचे अनुदान आहे. त्यातील ६९ प्रकल्प पूर्ण होत आहे. उर्वरित प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
विदर्भ मराठवाड्यासाठी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहे. नदी जोड प्रकल्पात आपण ५५० किलोमीटरची नवीन नदी तयार करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
परभणी आणि बीडमध्ये जे झाले त्याबाबत न्याय मिळणार आहे. हे सरकार न्यायाचे सरकार आहे. त्या ठिकाणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आम्ही यापूर्वी आरोपांना आरोपाने उत्तर दिले नाही. आम्ही कामातून उत्तर दिले. त्यामुळे जनता काम करणाऱ्या लोकांना दाद देते, हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या माजोरड्या शुक्ला कुटुंबाल अद्दल शिकवण्याचा विडा आता वकिलांनी उचलला आहे.कुणीही शुक्ला कुटुंबियांचं वकीलपत्र घेऊ नये, असा निर्णय मराठी वकिलांनी घेतला आहेत. कल्याण न्यायालयातील वकीलांनी हा निर्णय घेतला आहे.
विकास कामांना कोणी स्पीड ब्रेकर लावले हे पाहिले पाहिजे. मागील अडीच वर्षांत बंद पडलेले अनेक प्रकल्प आम्ही सुरु केले. त्यामुळे घरी बसणाऱ्या लोकांना जनतेने घरी बसलवले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार राहुल गांधी हे रविवारी 22 डिसेंबरला परभणी दौऱ्यावर असणार आहेत. राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
कल्याण न्यायालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. जेलमधील आरोपीने जजच्या दिशेने चप्पल भिरकावली आहे. न्यायाधीश आर जी वाघमारे यांच्या कोर्टात हा प्रकार घडला आहे. शैलेंद्र अहीरवाल या आरोपीला हत्येच्या प्रकरणात आज तारीख असल्याने त्याला जेल मधून कोर्टात आणले होते.
कुर्ला बस अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बसचालक संजय मोरे याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनवण्यात आली आहे.
माझ्या मुलाचा खून केला, असा आरोप सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींनी केला आहे. तसेच दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सूर्यवंशी कुटुंबियांनी केली आहे. तसेच सोमनाथ आंदोलनात नव्हता, असंही सूर्यवंशी कुटुंबियांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे सूर्यवंशी कुटुंबियांसोबत संवाद साधत आहेत. या दरम्यान कुटुंबियांनी हे आरोप केले असून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
आदित्य ठाकरे हे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले. अंबादास दानवे, सचिन अहिर देखील भेटीसाठी उपस्थित.
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरे याला कुर्ला कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणी झाल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर असून ते आज मस्साजोगला जाणार आहेत.
दुपारी ३ वाजता विमानाने लातूरला रवाना होणार आहे. लातूरवरुन हेलिकॉप्टरने मस्साजोग येथे जाऊन ते देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार.
देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर परभणीत सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची देखील भेट घेणार
निलकमल बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढून आता 15 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेनंतर बेपत्ता असलेल्या जोहान निसार मोहम्मद या 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.
मराठी माणसाला मारहाण प्रकरणात अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लाला अटक केली आहे. गीता शुक्लासह विवेक जाधव आणि पार्थ जाधव या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठी राज्यभर ऑनलाईन परीक्षा नियोजित होती. राज्यातील नऊ जिल्ह्यात 31 हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार होते. मात्र तीन दिवस चालणारी ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आज पहिल्या दिवशी सकाळपासून विद्यार्थी संगणकावर उत्तर देत असताना उत्तर सबमिट होत नसल्याचे लक्षात आले. चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय परीक्षा केंद्रावर यामुळे एकच गोंधळ उडाला.
मंत्रीपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर पहिल्यांदाच कोल्हापुरात आले.कोल्हापुरात महायुतीकडून दोन्ही नेत्यांचा जल्लोषी स्वागत करण्यात आले. दोन्ही नवनिर्वाचित मंत्र्यांची ताराराणी चौक ते दसरा चौकापर्यंत स्वागत मिरवणूक काढण्यात आली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील हेलिपॅडवर दाखल झाले आहेत. शरद पवार आज संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वन भेट घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात संवाद झाला. विधान परिषदेच्या परिसरात दोघांमध्ये भेट झाली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. आज आणि उद्या मुंबईत घेणार राज्यभरातील OBC नेत्यांची भेट घेणार आहे. ते OBC नेत्यांची मते जाणून घेणार आहे. नाशिकमध्ये समता परिषदेत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आता मुंबईत ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत.
देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.
पुणे : मावळ तालुक्याला वरदान असलेली पवना नदीची शुद्धता आणि स्वच्छचा टिकावी यासाठी पवना माईचा उत्सव साजरा करण्यात येतो. या दरम्यान जलदिंडी काढण्यात येते. या दिंडीत पवना धरण परिसरातील गावे, माध्यमिक शाळा सहभाग घेतात, पवना धरण या ठिकाणी पवना माईचे जलपूजन करून दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पवना नदीवरील ब्राह्मनोली घाटावर दिंडी चे परिसरातील शाळांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पवनामाईची आरती करून स्वच्छतेच्या घोषणा दिल्या. नदीचे पूजन करण्यात आले. पवना नदीची कृतज्ञता म्हणून नदीत कणकेचे दिवे सोडण्यात आले. आणि पवना नदी स्वच्छताची शपथ घेण्यात आली.
गेल्यावर्षी सुद्धा मी डिसेंबरमध्येच मंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि यावेळी सुद्धा मी डिसेंबर मध्येच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मला असं वाटतं डिसेंबर महिना हा माझ्यासाठी लकी महिना आहे. जे मागच्या काळात झालं त्याला गुडबाय आणि जे नवीन काळात येणार आहे त्याचे वेलकम, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
खातं हे खातं असत. कोणत्याही खात्याचं काम करायला मला आवडेल. दीनदलित बाल शोषित अशा सर्वांची काम माझ्या हाताने होवो. ज्यांनी ज्यांनी मला प्रेम सहकार्य केलं. त्यांची सेवा करण्यासाठी प्रभू मला शक्ती देवो, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
कोल्हापूर : मंत्रीपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर पहिल्यांदाच कोल्हापुरात येणार आहेत. कोल्हापुरात दाखल होताच हे दोन्हीही मंत्री कर्वे निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणार आहेत. अंबाबाई दर्शनानंतर दोघेही महायुतीकडून आयोजित स्वागत मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आज आणि उद्या छगन भुजबळ मुंबईत राज्यभरातील OBC नेत्यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते OBC नेत्यांची मतं जाणून घेणार आहेत. त्यानंतर ते पुढचा निर्णय घेतील, असे बोललं जात आहे. नाशिकमध्ये समता परिषदेत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आता मुंबईत ओबीसी नेत्यांची घेणार भेट घेणार आहेत.
वाल्मिक कराडला तात्काळ अटक करून खुनाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी करा. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. गुन्हा होऊन तेरा दिवस झाले तरीही आरोपी अटकेत नाहीत. आमची आणि ग्रामस्थांची एकच मागणी आहे की आरोपीला तात्काळ अटक करा असं संदीप क्षीरसागर म्हणाले. शरद पवार आज देशमुख कुटुंबीयांची सांत्वन भेट घेण्यासाठी येत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, जळगाव जिल्ह्यातील चोरीला गेलेल्या 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. नंदूरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने चोरीला गेलेल्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रकाशा ते तळोदा दरम्यान चोरीच्या मोटरसायकल विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या आरोपींकडून आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे.
परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल आंबेडकर समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली आहे. या आवाहनानंतर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल आणू नये असा आवाहन देखील करण्यात आलं आहे. आज दुपारी आंबेडकरी समाजाच्या वतीने शहरांमध्ये निदर्शने देखील करण्यात येणार आहेत.
कल्याण योगीधाम अजमेरा सोसायटी मारहाण प्रकरण. मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह त्यांचे दोन सहकारी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना पोलिसांनी काल केली अटक. आज अखिलेश शुक्लाच्या पत्नी गीता शुक्लासह आणखी दोन आरोपीना घेतलें ताब्यात. एकूण सहा आरोपीं पोलिसांच्या ताब्यात असून अजून चार आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व आरोपींना आज दुपारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार.
“दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नथुराम गोडसे याचा यथोचित सन्मान करा”. साहित्य संमेलनाची आयोजक संस्था सरहदला धमक्यांचे फोन. फक्त गोडसेच नाही, तर सावरकर यांचं देखील नाव संमेलनातील ठिकाणांना द्यावं अशी मागणी. जर तसं झालं नाही, तर संघर्ष अटळ असल्याचाही धमकीत उल्लेख.
बीएमसी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरु झालीय. स्थानिक पातळीवर स्वबळाची मागणी असतेच. महाविकास आघाडी अजूनही आहे. आम्हाला काहीही करुन मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकावी लागेल असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.