Maharashtra News Live Updates : नागपुरात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग उद्या 16 डिसेंबर पासून सुरू होणार

| Updated on: Dec 17, 2021 | 7:02 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Updates : नागपुरात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग उद्या 16 डिसेंबर पासून सुरू होणार
Breaking

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron)  वेरियंटचे रु्ग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 28वर पोहोचली आहे.   तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची (Cabinet ) बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Dec 2021 12:49 PM (IST)

    रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली, वसंत मोरेंची प्रतिक्रिया

    रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली,

    मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलं नाही,

    रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं,

    मी स्वतः राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींसमोर विषय मिटवला होता,

    मनसेची ताकद या निवडणुकीत दिसेल,

    त्यांनी असा आरोप करणं हास्यास्पद आहे,

    त्यांचा हा सगळा प्री प्लान्ड आहे

    मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेंची रुपाली पाटलांवर टिका

  • 15 Dec 2021 12:23 PM (IST)

    नागपुरात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग उद्या 16 डिसेंबर पासून सुरू होणार

    नागपुरात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग उद्या 16 डिसेंबर पासून सुरू होणार.

    कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आणि अटींच्या आधिन राहून नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन. बी यांनी जारी केले शाळा सुरू करण्याच्या परवानगीचे आदेश..

  • 15 Dec 2021 12:02 PM (IST)

    महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का, ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

    महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का, ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. ओबीसी आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ट्रिपल टेस्ट करावी लागेल. केंद्र सरकारच्या सांगण्याप्रमाणं इम्पेरिकल डाटा देण्यात येणार नाही, असं सुप्रीक कोर्टानं म्हटलं आहे.

  • 15 Dec 2021 11:54 AM (IST)

    ही बाबतीत बदल घडत नसेल तर मला स्वत:मध्ये बदल घडवावा लागेल: रुपाली पाटील ठोंबरे

    मी राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते यांना माझ्या स्वार्थासाठी वाईट बोलणार नाही. मनसेच्या काही नेत्यांसदर्भात मी पक्षाच्या चौकटीत राहून माझी अडचण राज ठाकरे यांना कळवली आहे. परंतु, काही कारणांमुळं मी राजीनामा देत आहे. लोकांना न्याय देत असताना खंबीर साथीची गरज असते, हे मी राज ठाकरे यांना कळवलं आहे. काही बाबतीत बदल घडत नसेल तर मला स्वत:मध्ये बदल घडवावा लागेल, असं रुपाली  पाटील म्हणाल्या.

    पक्षात काही बदल करायचे हे मी राज ठाकरे साहेबांना कळवलं आहे. मी पक्षात काही बदल करायचे असतील हे जाहीर सांगण्याइतकी मोठी नाही, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. मी 14 वर्ष काम करत आहे. राजकारण करत असताना नव्या कोणत्या पक्षात काम करायचं ठरवलेलं नाही. मला ऑफर आलेल्या आहेत मात्र मी आता काही ठरवलेलं नाही, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

    संदीप देशपांडे आणि मी भावंड म्हणून काम केलं आहे. मी पण त्यांच्या बरोबरचं तयार झालेली आहे. मी त्यांना सध्या उत्तर देणार नाही. वसंत मोरे असतील, संदीप देशपांडे यांना उत्तर देणार नाही. मी त्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर देणार नाही. 14 वर्ष काम करत असताना माझ्याकडून सर्वसामान्य लोकांकडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करत असताना माझ्या पक्षाला, माझ्या नेत्याला त्रास होऊ नये, अशी भूमिका असल्याचं रुपाली पाटील यांनी म्हटलं.

  • 15 Dec 2021 11:47 AM (IST)

    मी संघर्ष करणारी कार्यकर्ती: रुपाली पाटील ठोंबरे

    मनसेच्या नेत्या रुपाली   पाटील यांनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. राज ठाकरे हे माझे दैवत आहेत, होते आणि राहतील असं त्या म्हणाल्या आहेत. मी मुंबईला काल वैजापूर ऑनर किलिंग संदर्भात अजित पवार यांची भेट घेतली. याशिवाय युवा सेनेच्या वरुण सरदेसाई यांची देखील भेट घेतल्याचं रुपा  पाटील यांनी सांगितलं आहे. मी संघर्ष करणारी कार्यकर्ती आहे. मी राज ठाकरे यांच्याकडे पाहूनचं मनसेमध्ये आले आहे.

  • 15 Dec 2021 10:58 AM (IST)

    राज ठाकरे पुण्यात दाखल

    शिवाजीनगरचं ग्रामदैवत रोकडोबा मंदिरात घेतलं दर्शन,

    पुणे दौऱ्याची सुरुवात शिवाजीनगर मतदारसंघात देणार भेट,

    अनिकेत ढगे उपविभाग प्रमुख यांच्या घरी करणार नाश्ता

  • 15 Dec 2021 10:57 AM (IST)

    स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला पाच मिनिटे उशीर झाल्यामुळे नाकारला प्रवेश

    परीक्षेला पाच मिनिटे उशीर झाल्यामुळे नाकारला प्रवेश

    स्टाफ सिलेक्शन परीक्षेसाठी परीक्षार्थींना नाकारला प्रवेश

    औरंगाबादच्या डिजिटल झोन परीक्षा केंद्रावर नाकारला प्रवेश

    कोल्हापूर, बुलढाणा, उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना नाकारला प्रवेश

    एसटी सुरू नसल्यामुळे झाला होता विद्यार्थ्यांना उशीर

    जवळपास 20 विद्यार्थ्यांना नाकारला परीक्षा केंद्रावर प्रवेश

  • 15 Dec 2021 10:28 AM (IST)

    सर्वोच्च न्यायालयात आजचा निर्णय ओबीसी समाजाच्या बाजूला येईल याचा विश्वास: विजय वडेट्टीवार

    - सर्वोच्च न्यायालयात आजचा निर्णय ओबीसी समाजाच्या बाजूला येईल याचा विश्वास

    - आम्ही काढलेला अध्यादेश इतर राज्यांनीही काढला

    - आज आलेला निर्णय संपूर्ण देशासाठी असेल, जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य

    - देशातंच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय

  • 15 Dec 2021 09:57 AM (IST)

    चंद्रकांत पाटील यांनी त्या वक्तव्यावर तात्काळ माफी मागावी, नवाब मलिकांची मागणी

    चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण केलंय.  हिंदू मतांची वोटबॅंक तयार केली हे सांगणं महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, त्यांनी कुणावर अन्याय  केला नाही, सर्वधर्मियांना घेऊन ते सत्ता चालवत होते. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ माफी मागायला हवी, असं नवाब मलिक म्हणाले.

  • 15 Dec 2021 09:38 AM (IST)

    पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा  ठीक आहेत, पण देशाची जनता महागाईच्या मुद्यावर होरपळून निघाली : संजय राऊत

    शिवसेना खासदार संजय राऊत

    पाच राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. गोवा, उत्तराखंड असेल. यामध्ये विरोधी पक्ष कोणती भूमिका बजावू शकतात, यावर प्राथमिक चर्चा झाली. बैठकीला प्रमुख नेत्यांमध्ये शरद पवार, फारुख अब्दुल्ला इतर नेते आणि शिवसेनेच्या वतीनं मी तिथं उपस्थित होतो. त्या बैठकीला उपस्थित राहण्याविषयी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता.

    शरद पवार यांनी भविष्यात लवकर बैठक व्हावी, अशी सूचना मांडली. फार वेळ न लावता भविष्यात लवकर बैठक घ्यावी, अशी भूमिका नेत्यांनी मांडली, असं संजय राऊत म्हणाले.

    विरोधी पक्षांनी एकत्र यावं ही भूमिका आहे. भाजपशी ममता बॅनर्जी लढत आहेत, आम्ही देखील लढत आहे. टार्गेट एक  असेल तर , मतभेदाचं कारण काय आहे. तुम्ही वेगळे लढावं, आम्ही वेगळं लढावं, अशी गरज काय आहे, असं संजय राऊत म्हणाले. ममता बॅनर्जी यांची समजूत काढली जाणार का विचारलं असता यासंदर्भात मी काय बोलू, असं संजय राऊत म्हणाले. शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला हे ज्येष्ठ नेते आहेत ते चर्चा करतील, असं संजय राऊत म्हणाले.

    महाराष्ट्रात मिनी यूपीए आहे. राज्यस्तरावर मिनी यूपीएचं मॉडेल असून  त्याचा आदर्श इतरांनी घेतला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

    राज्यसभेत आम्हाला बोलू देत नाहीत. पण लोकसभेत महागाईवर प्रश्न विचारले जातील, असं संजय राऊत म्हणाले. पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा  ठीक आहेत, पण देशाची जनता महागाईच्या मुद्यावर होरपळून निघाली आहे. या प्रश्नी संसदेत वादळी चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणाले. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यावर नरेंद्र मोदी बोलताना दिसत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

    चंद्रकांत पाटील काय म्हणतात यावर भूमिका ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते आहेत. प्रमोद महाजन यांचं ऑन रेकॉर्ड वक्तव्य आहे. महाराष्ट्रात मराठीच्या मुद्यावर मत द्यायला सांगितलं. त्याप्रमाणं हिंदू म्हणून निवडणूक लढवू, असं म्हणाले होते. त्यानंतर पार्ले येथील निवडणुकीत शिवसेनेनं मतदान मागितलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या दोन आमदारांचं निलंबन झालं होतं. बाळासाहेब ठाकरेंना हिंदूना हिंदू म्हणून मतदान करायला लावलं. या देशात हिंदूची वोट बँक आहे हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेले. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख ठामपणे उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, असं संजय राऊत म्हणाले. आमचं हिंदुत्व शेपूट घालणारे आणि पळपुटं नाही, असं संजय राऊत यानी सांगितलं. आमचं हिंदुत्व लोकांना अन्न वस्त्र निवारा मिळावा यासंदर्भात जोडलेलं आहे.

  • 15 Dec 2021 08:44 AM (IST)

    राज ठाकरेंचा आजपासून पुणे दौरा

    राज ठाकरेंचा आजपासून पुणे दौरा,

    आजपासून पदाधिकारी बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या घरी जाणार राज ठाकरे

    शिवाजीनगर मतदारसंघात सकाळी उपविभाग प्रमुखाच्या घरी करणार नाश्ता ,

    महापालिका निवडणूकीसाठी राज ठाकरे मैदानात,

    मात्र राज ठाकरे पुण्यात येताचं रुपाली पाटलांनी मनसे सोडली ..

  • 15 Dec 2021 08:43 AM (IST)

    सोलापूरमध्ये ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत 43 जागांसाठी 0 अर्ज

    ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत 43 जागांसाठी एकही अर्ज दाखल नसल्याने या जागा पुन्हा राहणार रिक्त

    रिक्त जागांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार

    उर्वरित 56 जागांसाठी 21 डिसेंबरला होणार मतदान

    जिल्ह्यात सध्या 148 ग्रामपंचायतीचा 176 सदस्यांसाठी सुरू आहे पोटनिवडणूक

    यात 60 जागा बिनविरोध झाल्या असून 43 जागावर एकही अर्ज आला नाही

  • 15 Dec 2021 07:45 AM (IST)

    कोरोनामुळं मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

    कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मिळकतधारकाच्या कुटुंबीयांना पुढील आर्थिक वर्षात मिळकतकराच्या सामान्य करात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय

    स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

    कोरोना प्रादुर्भावामुळे शहरात आजपर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांचा मृत्यू

    काही कुटुंबात आई-वडील असे दोघांचा मृत्यू झाल्याने पाल्य अनाथ झाले

    या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी सामान्य करात शंभर टक्के सवलत देण्यात येणार

  • 15 Dec 2021 07:26 AM (IST)

    ओमिक्रॅानच्या विदर्भातील पहिल्या रुग्णाची RTPCR चाचणी निगेटीव्ह

    ओमिक्रॅानच्या विदर्भातील पहिल्या रुग्णाची RTPCR चाचणी निगेटीव्ह

    - ओमीक्रॅानच्या रुग्णाला आज नागपूर एम्समधून सुट्टी मिसळण्याची शक्यता

    - कालच्या टेस्टनंतर 24 तासांत आणखी चाचणी करुन देणार सुट्टी

    - रुग्णाला 10 दिवस होम क्वॅारंटाईन राहणे गरजेचं

    - स्पेनवरुन नागपूरात आलेल्या महिलेसह 24 तासांत 4 नवे कोरोना पॅाझीटीव्ह

    - स्पेनवरुन नागपूरात आलेल्या महिलेचे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले नमुने

  • 15 Dec 2021 06:58 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या विविध परीक्षेच्या दरांचा बाजारात मात्र ऊत : सदाभाऊ खोत

    महाविकास आघाडीच्या विविध परीक्षेच्या दरांचा बाजारात मात्र ऊत आलेला आहे आणि त्यांच्या किंमती जर बघितल्या तर महागाईचा निर्देशांक प्रचंढ वाढलेला आहे. कोण दहाला पेपर विकत आहे? कोण पंधरा तर कोण वीस लाखाला विकत घेत आहे? आणि एका बाजूला हे घोटाळे बाहेर पडत आहेत.

  • 15 Dec 2021 06:40 AM (IST)

    हे काय तुमच्या बापाचा शेत नाही. ही लाल परी हे महाराष्ट्राचे वैभव : सदाभाऊ खोत

    जवळजवळ दहा हजार कर्मचारी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे आणि आता काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणार आहेत. या महाविकास आघाडी सरकारचे मंत्री एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही तुम्हाला काढून टाकु, अशा प्रकारची धमकी देत आहेत. हे काय तुमच्या बापाचा शेत नाही. ही लाल परी हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

Published On - Dec 15,2021 6:12 AM

Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.