Maharashtra News Live Update : काँग्रेस आमदारांची सोनिया गांधींसोबत बैठक
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9
मुंबई : आज मंगळवार 5 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. रात्री जवळपास तीनशे आंदोलक एसटी कर्मचारी हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. विलीनीकरणाच्या मागणीवर हे कर्मचारी ठाम असून त्यासाठी मुंबईत आता तीव्र आंदोलन उभारणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी जाहीर केली आहे.
