Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांसाठी मोठी तरतूद! घोषणा काय?

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र राज्याचा २०२६ चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला आहे. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगाबाबत मोठी घोषणा केली आहे.

Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांसाठी मोठी तरतूद! घोषणा काय?
Budget 2026
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 06, 2026 | 2:49 PM

आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा निर्णय कोणता जाणून घ्या.

ज्योतिर्लिंगांबाबत मोठी घोषणा काय?

12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहेत. या ज्योतिर्लिंगांसाठी यंदाच्या बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट सादर करताना सांगितले की, “५ ज्योतिर्लिंगांसाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवले आहे.” पुढे ते म्हणाले की त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल.

या अर्थसंकल्पामध्ये पुढे वाहतूक केंद्रीच विकास व १०० टक्के डिजिटायझेशन करणार, ३०० अब्ज डॉलरचे उद्देश, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम २०२७पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल, तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार, चौथी मुंबई वाढवण येथे होईल, एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार असे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग कोणते?

महाराष्ट्रात नाशिक येथे त्र्यंबकेश्वर, पुण्यातील खेड येथे भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगर येथील वेरुळजवळील घृष्णेश्वर, बीडमधील परळी जवळील वैजनाथ मंदिर आणि हिंगोलीतील औंढा नागनाथ ही पाच ज्योतिर्लिंग आहेत. या पाचही ज्योतिर्लिंगांसाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवण्यात आले आहे.

झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासाबाबत देखील घोषणा

मुंबईत २० लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि १० लाख परवडणारी घरे करण्यासाठी आराखडा करण्यात येणार आहे. वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार आहे. बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करणार आहे. मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे.

Follow Us