Maharashtra Budget 2026 LIVE: राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री प्रताप सरनाईक

Maharashtra Budget 2026 LIVE Updates in Marathi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. शेतकरी कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना जाहीर केली. वाढवण येथे चौथी मुंबई विकसीत करण्याचे त्यांनी जाहीर केले. तर नागपूर येथे नवीन चित्रनगरी सुरू करण्यात येणार आहे.

Maharashtra Budget 2026 LIVE: राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प - मंत्री प्रताप सरनाईक
आज राज्याचा अर्थसंकल्प
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 07, 2026 | 8:30 AM

महायुती सरकार आज शुक्रवारी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय घडामोडींमुळे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडतील. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांच्याकडे वित्त खात्याची जबाबादारी आली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. तर  वाढवण येथे चौथी मुंबई विकसीत करण्याचे जाहीर केले.  राज्य जलमाहिती केंद्र सुरु केले जाईल. नाशिक येथे या केंद्राची इमारत असेल असेल. त्यासाठी मोठ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करणार आहे. मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Mar 2026 07:29 PM (IST)

    लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहने आत्मसमर्पण केले, इस्रायलचा मोठा दावा

    लेबनॉनमधील हिजबुल्लाहने आत्मसमर्पण करण्यास सहमती दर्शविली आहे असे इस्रायलने जाहीर केले आहे. इराणवरील हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले होते. गाझामध्ये जाण्यासाठी इस्रायलने बेरूतमधील हिजबुल्लाहचा बालेकिल्ला असलेल्या दहियेला रिकामे केले आहे.मात्र, आता हिजबुल्लाह हा शरण येण्यास तयार आहे असे इस्राईल म्हणत आहे.

  • 06 Mar 2026 07:16 PM (IST)

    राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री प्रताप सरनाईक

    महाराष्ट्राचा 2026-27 चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

  • 06 Mar 2026 07:07 PM (IST)

    KDMC महापौर हर्षाली चौधरी यांची प्रसूतीगृहाला सरप्राईज भेट

    KDMC महापौर हर्षाली चौधरी यांनी वसंत व्हॅली प्रसूतीगृहाला सरप्राईज भेट दिली आहे. रुग्णालयातील दुरवस्था पाहून यावेळी महापौर संतापल्या आहेत.रुग्णांना त्रास दिला तर थेट निलंबन करणार असा इशारा महापौर हर्षाली चौधरी यांनी डॉक्टर-नर्सेसना कडक शब्दात सुनावले.

  • 06 Mar 2026 06:50 PM (IST)

    सिडको चौकात भरदिवसा फ्री-स्टाईल हाणामारी

    छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबजलेल्या सिडको चौकात तरुणांच्या दोन गटात जोरदार ‘फ्री-स्टाईल’ हाणामारी झाली आहे. साध्या वादातून सुरू झालेल्या या भांडणाने काही वेळातच हिंसक वळण घेतले, ज्यामध्ये चाकू आणि दगडांचा सरेआम वापर करण्यात आला आहे.

  • 06 Mar 2026 06:28 PM (IST)

    आपल्याच नातवाच्या अंगावर गरम पाणी ओतणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

    नागपूरच्या कोराडी परिसरात अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने स्वतःच्याच चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आजीच्या विरोधात कोराडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 06 Mar 2026 06:18 PM (IST)

    समृद्धी महामार्गावर अपघात, कामगारांना ट्रकने उडवलं

    समृद्धी महामार्गावर अपघात

    समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही बसवण्याचं काम करणाऱ्या कामगारांना ट्रकने उडवलं

    406 पॉईंट समृद्धी महामार्ग संभाजीनगर जवळ अपघात.

    2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

    जखमींना उपचारासाठी संभाजीनगरला हलवलं

    दुपारच्या वेळी जेसीबीच्या बाजूला बसून जेवण करत होते कामगार

    जेसीबीसह कामगारांना ट्रकने उडवलं

  • 06 Mar 2026 06:00 PM (IST)

    नाशिकच्या सातपूर परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा, नगरसेवक आक्रमक

    नाशिकच्या सातपूर परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा

    दूषित पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर नगरसेवक आक्रमक

    सातपूर परिसरातील नगरसेवक समाधान देवरे आक्रमक

    शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी

  • 06 Mar 2026 05:45 PM (IST)

    पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळ भीषण अपघात, कामगारांना ट्रकने उडवलं

    पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळ भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे.  रस्ता दुभाजकाला पांढरे पट्टे मारणाऱ्या कामगारांना त्यांच्या पिकअपसह ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

     

  • 06 Mar 2026 05:30 PM (IST)

    रत्नागिरीच्या लोटे MIDCमधील डॉक्टर खान कंपनीत स्फोट

    रत्नागिरीच्या लोटे MIDCमधील डॉक्टर खान कंपनीत स्फोट. 11 कामगार जखमी, 5 जणांवर चिपळूणमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू 3 गंभीर जखमींवर मुंबईतील ऐरोलीत उपचार सुरु.

  • 06 Mar 2026 05:20 PM (IST)

    बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

    बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई. सोनोग्राफी सेंटरचा परवाना रद्द, सेंटर सील. सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी महिला महिलांचे व्हिडिओ पाठवायची. सोनल गरेवाल महिलांचे व्हिडीओ टोळीला पाठवायची. प्रशिक्षण नसताना सोनल सोनोग्राफी मशीन हाताळायची. उल्हासनगर आरोग्य अधिकारी मोहिनी धर्मा यांची माहिती.

  • 06 Mar 2026 05:00 PM (IST)

    युद्ध परिस्थितीमुळे सांगलीतल्या द्राक्ष, हळद आणि बेदाणा बाजारपेठेला मोठा फटका

    आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे सांगलीतल्या द्राक्ष, हळद आणि बेदाणा बाजारपेठेला मोठा फटका बसलाय… जवळपास शंभर ते दीडशे रुपयांनी बेदाण्याचा दर घसरला आहेत…. 450 रुपया पर्यंत पोहचलेले दर,सध्या 300 रुपयांवर खाली आले आहेत… बेदाणा निर्यात थांबल्यानं त्याचा परिणाम बेदाणा दरावर झाला आहे…

  • 06 Mar 2026 04:49 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये भूमी अभिलेख कर्मचारी कृती समीतीचं आंदोलन

    छत्रपती संभाजीनगरमध्य़े भूमी अभिलेख कर्मचारी कृती समीतीचं आंदोलन. तांत्रिक वेतनश्रेणी, मोजणी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्यासाठी विविध मागण्यांसाठी आंदोलन. अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन

  • 06 Mar 2026 04:25 PM (IST)

    हळदी पाठोपाठ सांगलीतल्या बेदाण्यालाही फटका

    आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे सांगलीतल्या द्राक्ष, हळद आणि बेदाणा बाजारपेठाला मोठा फटका बसला आहे. जवळपास शंभर ते दीडशे रुपयांनी बेदाण्याचा दर घसरला आहेत. 450 रुपया पर्यंत पोहचलेले दर, सध्या 300 रुपयांवर खाली आले आहेत. सांगलीच्या बाजार समितीमध्ये बेदाणे सौदे पार पडत आहेत. याठिकाणी आता बेदाण्याला 300 रुपयांच्या आसपास दर मिळत आहेत

  • 06 Mar 2026 04:10 PM (IST)

    दूषित पाण्याच्या प्रश्नावर नगरसेवक आक्रमक

    नाशिकमधील सातपूर परिसरातील दूषित पाण्याच्या प्रश्नावर नगरसेवक आक्रमक झाले आहेत. बाटलीत आणलेले दूषित पाण्याचा घ्यायला लावला वास. सातपूर परिसरातील नगरसेवक समाधान देवरे यांनी बाटलीत आणले होते दूषित पाणी

  • 06 Mar 2026 04:10 PM (IST)

    रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंसह सुनेत्रा पवारांचीही भेट

    रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सुनेत्रा पवारांचीही भेट घेतलीय. अजितदादांच्या अपघात प्रकरणात योग्य तपास करण्याबाबत निवेदन दिलंय. तर मी केलेल्या दाव्याची एकनाथ शिंदेंकडून पुष्टी करण्यात आली अशी रोहित पवारांनी माहिती दिली.. दावोसला जाताना शिंदेंच्या विमानासाठी उड्डाण परवानगी न घेतल्याने विमान पाडण्याचा इराक आणि इराण या दोन्ही देशांनी इशारा दिला होता…असा दावा रोहित पवारांनी केला होता…

  • 06 Mar 2026 04:00 PM (IST)

    Maharashtra Budget 2026 : 12 किल्ल्यांच्या वारसा जतन करण्यासाठी उपाययोजना

    राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांच्या वारसा जतन करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिवसृष्टी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी निधी देणार. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथील स्मारक आणि पानिपत, हरियाणा येथील काला अंब येथील मराठा शौर्य स्मारकासाठी सहाय्य.

  • 06 Mar 2026 03:45 PM (IST)

    Maharashtra Budget 2026 : सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु

    आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे.  त्यामध्ये एकल महिला धोरण : सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणणार. तसेच, लखपती दिदी : राज्यात 27 लाख लखपती दिदी झाल्या, 2026-27 मध्ये आणखी 25 लाख लखपती दिदी करणार.

  • 06 Mar 2026 03:39 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांचा १ तास २४ मिनिटांचा अर्थसंकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ तास २४ मिनिटांमध्ये अर्थसंकल्प सादर केला. या योजनेत अनेक घोषणा करण्यात आल्या. चार नवीन योजना सादर करण्यात आल्या. तर मुंबई आणि पुण्यातील दळणवळण सुविधांसंबंधी मोठी घोषणा करण्यात आली. मेट्रोचे जाळे तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

  • 06 Mar 2026 03:36 PM (IST)

    आग्य्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक

    पानीपतमध्ये मराठा भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तिथल्या राज्य सरकारशी बोलणी सुरू आहे. तर आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभारल्या जाणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्माला दोनशे वर्ष पूर्ण होत असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

  • 06 Mar 2026 03:31 PM (IST)

    महसूली तूट आणि राजकोषीय तोटाही कमी

    यावर्षी अर्थसंकल्पासाठी ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांची खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे. ४० हजार ५५२ कोटी रुपयांची तूट येत आहे राजकोषीय तूट ही ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात सरकारला यश आले आहे. तर महसुली तूट ही १ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

  • 06 Mar 2026 03:29 PM (IST)

    चार नवीन योजनांची घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पात चार नवीन योजनांची घोषणा केली.

    महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान

    मत्स्यसंपदा योजना

    ग्रामीण पशूधन उद्योजक योजना

    महाराष्ट्र बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना

  • 06 Mar 2026 03:27 PM (IST)

    पानीपतमध्ये मराठा शौर्य स्मारक

    पानीपतमध्ये मराठा भव्य शौर्य स्मारक उभारण्यात येईल. तर आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

  • 06 Mar 2026 03:26 PM (IST)

    जिल्हा वार्षिक निधीसाठी भरीव तरतूद

    २१ हजार ८६७ कोटी रुपयांची जिल्हा वार्षिक निधीसाठी तरतूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत १ हजार ७०८ कोटींनी अधिक तरतूद केली आहे.

  • 06 Mar 2026 03:25 PM (IST)

    नैसर्गिक शेतीचा प्रयोग राबवणार

    राज्यात 5 लक्ष हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती योजना आणल्या जाईल. मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन योजना सुरु करणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात 97 टक्के काम पूर्ण करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

  • 06 Mar 2026 03:21 PM (IST)

    राज्यात एआय आयुक्तालय

    राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी AI आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यत आली आहे. राज्यात स्वतंत्र विभागा सुरू करण्यात येणार आहे.

  • 06 Mar 2026 03:19 PM (IST)

    ७५ हजार पदाची पदभरती करणार

    १ लाख २० हजार पदभर्ती केली गेली आहे. आता ७५ हजार पदाची पद भरती करणार आहे. २०४७ कडे वाटचाल करण्यासाठी पारदर्शक सुशासन आवश्यक वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

  • 06 Mar 2026 03:18 PM (IST)

    खेळाडूसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

    राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूनी सहभाग नोंदवावा यासाठी ८ हाय परफॉरमेंस केंद्र सुरू आहेत. चार प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

  • 06 Mar 2026 03:17 PM (IST)

    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुदान अकादमी स्थापन करणार

    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुदान अकादमी स्थापन करणार आहे. राज्यात आरोग्य संस्थाची बळकटी करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. राज्यात भाषा कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारस्याचे जतन करण्याचे उद्दिष्ट आहे

  • 06 Mar 2026 03:16 PM (IST)

    सिंहस्थ कुंभमेळासाठी निधीची तरतूद

    नाशिक येथे सिहस्थ कुंभमेळा आयोजन केले जाणार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सातारा येथे शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे जतन करण्यात येईल

  • 06 Mar 2026 03:14 PM (IST)

    दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र

    मधुमेहाचं लवकरच निदान करण्यासाठी ४ हजार ५०० कोटींची योजना प्रस्तावित आहे. आयुष्यमान योजनेत १ हजार ३५६ वरून २ हजार ३९९ आजाराची नोंद होईल. सातारा जिल्ह्यातील दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.

  • 06 Mar 2026 03:11 PM (IST)

    पुरंदर विमानतळासाठी विशेष प्राधिकरण

    पुरंदर विमानतळासाठी विशेष प्राधिकरणाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली.

  • 06 Mar 2026 03:09 PM (IST)

    शहरांसाठी ५,८६० कोटी रुपयांचा प्रकल्प

    राज्यातील शहरांमध्ये ५ हजार ५८० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सांडपाणी प्रक्रिया पूनर्वापर करण्यासाठी हा निधी उपयोगात येईल.

  • 06 Mar 2026 03:06 PM (IST)

    बांबू उद्योग धोरण २०२५

    राज्यात बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी ५० हजार कोटींपेक्षा जास्तीची गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार आहे. ५ लक्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

  • 06 Mar 2026 03:04 PM (IST)

    ३७ लाख लखपती दीदी

    राज्यात ३७ लाख लखपती दीदी झाल्या आहेत. तर लवकरच २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे. उमेद मॉलमधून विक्री करण्यासाठी खास धोरण राबविण्यात येणार आहे. राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

     

  • 06 Mar 2026 03:02 PM (IST)

    एक लाख उद्योजक घडवणार

    एक लाख उद्योजक घडवणे आणि ५० हजार स्टार्टअप्सला बळ देणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फंड देण्यात येणार आहे. खास स्टार्टअप्सला कर्ज सुविधेसह निविदा प्रक्रियेत खास सवलत देण्यात येणार आहे. भारत इनोव्हेशन स्टार्टअप योजना राबवण्यात येणार आहे.

  • 06 Mar 2026 03:00 PM (IST)

    आदिवासी घटक कार्यक्रमासाठी २१ हजार कोटी रुपये

    आदिवासी घटक कार्यक्रमासाठी २१ हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत. अनुसुचित जातींसाठी २०२६ २७ मध्ये २३ हजार १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • 06 Mar 2026 02:58 PM (IST)

    घरगुती ग्राहकांसाठी सौर ऊर्जा

    घरगुती ग्राहकांसाठी ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

  • 06 Mar 2026 02:57 PM (IST)

    लाडकी बहीण योजना आवश्यक ती भरीव तरतूद

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे. एकल महिलांच्या कल्याणसाठी लवकरच धोरण आणण्यात येईल. २५ लाख दीदींना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • 06 Mar 2026 02:54 PM (IST)

    नियमित परतफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ

    शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात. अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल. बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेऊ. समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन योजना करण्यात येणार आहे.

  • 06 Mar 2026 02:52 PM (IST)

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना जाहीर

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

  • 06 Mar 2026 02:48 PM (IST)

    सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद

    मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. २०४७ पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे.३२ हजार ७५६ कोटी मुख्यमंत्री सौर ऊर्जेसाठी खर्च करण्यात येईल. त्यासाठी यावर्षी देखील २० हजार कोटींची तरतूद केली आहे

  • 06 Mar 2026 02:46 PM (IST)

    नाशिक येथे राज्य जलमाहिती केंद्र

    राज्य जलमाहिती केंद्र सुरु केले जाईल. नाशिक येथे या केंद्राची इमारत असेल असेल. त्यासाठी मोठ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

     

  • 06 Mar 2026 02:45 PM (IST)

    १० लाख परवडणारी घरे देणार

    मुंबईत २० लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि १० लाख परवडणारी घरे करण्यासाठी आराखडा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार आहे. बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करणार आहे. मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे.

  • 06 Mar 2026 02:39 PM (IST)

    राज्यातील १ हजार गावांना काँक्रिट रस्त्याने जोडणार

    राज्यातील १ हजार गावांना काँक्रिट रस्त्याने जोडणार आहे. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत. वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पनवेल ते कर्जत अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार आहे.

  • 06 Mar 2026 02:37 PM (IST)

    मुंबई विमानतळ-नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार

    मुंबई विमानतळ-नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ऐरोली ते कटई नाका भाग तीनचे काम पूर्ण होत आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग बनवणार. अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

  • 06 Mar 2026 02:36 PM (IST)

    मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्ग

    मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्ग तयार करणार. गोरेगाव मुलुंड या भुयारी मार्गाचं काम अंतिम स्थरावर आहे. ठाणे ते मुलुंड भुयारी मार्ग जून २०२८ पर्यंत पूर्ण होईल. खारघर ते तुर्भे लवकर पूर्ण होईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

  • 06 Mar 2026 02:35 PM (IST)

    वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प

    निवडक ५० पर्यटन स्थळी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प नियोजित केला आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.

  • 06 Mar 2026 02:34 PM (IST)

    राज्यात मेट्रो मार्गिकेचे जाळे तयार होणार

    राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग व ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील. २०१९ पर्यंत १६५ किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील. मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्ग तयार करणार. गोरेगाव मुलुंड या भुयारी मार्गाचं काम अंतिम स्थरावर आहे.ठाणे ते मुलुंड भुयारी मार्ग जून २०२८ पर्यंत पूर्ण होईल.खारघर ते तुर्भे लवकर पूर्ण होईल असे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे.

  • 06 Mar 2026 02:32 PM (IST)

    एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार

    चौथी मुंबई वाढवण येथे होईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तर एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार आहे. नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

  • 06 Mar 2026 02:31 PM (IST)

    तीन विमानतळांचा विकास

    मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम २०२७पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल. तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

  • 06 Mar 2026 02:30 PM (IST)

    बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची एका वर्षात

    मुंबईत २० लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि १० लाख परवडणारी घरे करण्यासाठी आराखडा करण्यात येणार आहे. वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार आहे. बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करणार आहे. मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे.

  • 06 Mar 2026 02:28 PM (IST)

    राज्यात तिसरी चित्रनगरी स्थापन करणार

    राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगा तालुका रामटेक येथे विकसित करण्यात येणार आहे. नवीन पिढीला महाकवी कालिदासांचा जीवनपट कळावा म्हणून चित्रपटासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.

  • 06 Mar 2026 02:27 PM (IST)

    चौथ्या मुंबईसाठी पायाभूत सुविधा

    मुंबई व पुण्याला ५० अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे.४ लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे

  • 06 Mar 2026 02:26 PM (IST)

    ॲनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात मोठा बदल

    राज्याला ॲनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात अव्वल बनवणार आहोत. २५० पेक्षा अधिक स्टुडिओ बनवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. मागच्यावेळी वेव्हज परिषद झाली. केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह सुरू करण्यात आली आहे. पुणे हे जीसीसीसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत आहे.

  • 06 Mar 2026 02:23 PM (IST)

    महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र करणार

    १२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे. महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे असे अर्थसंकल्पात संकल्प सोडण्यात आला आहे.

  • 06 Mar 2026 02:21 PM (IST)

    इन्व्हेस्ट महाराष्ट्राचा नारा

    राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक सेवा धोरण जाहीर केलं आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. या धोरणातून ५० लाख रोजगार निर्माण होणार आहे. तसेच यासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात येत आहे, अशी माहिती अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी दिली.

  • 06 Mar 2026 02:20 PM (IST)

    महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना

    महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमी रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जातील.१२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे.महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.

  • 06 Mar 2026 02:19 PM (IST)

    १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी तयार

    ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

  • 06 Mar 2026 02:18 PM (IST)

    बळीराजा शेत पाणंद योजना सुरू

    मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजना सुरू करत आहोत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामे झाली आहे. या योजनेच्या टप्पा तीनची कामे हाती घेत आहोत. उर्वरित कामे प्रगती पथावर आहे.

  • 06 Mar 2026 02:17 PM (IST)

    गोपिनाथ मुंडे अपघात अनुदान योजनेचा विस्तार

    गोपिनाथ मुंडे अपघात अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. महिला गोपालक, कुक्कुटपालकांसाठी विशेष योजना करण्यात येणार आहे.

  • 06 Mar 2026 02:16 PM (IST)

    राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार

    राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ ठरवले आहे. चार केंद्रांखाली १६ उपकेंद्र ठरवले आहेत.प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसेल, असे त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केले.

     

  • 06 Mar 2026 02:14 PM (IST)

    देशाच्या विकसात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल

    १ फेब्रुवारी २०२६ रोजी युवा केंद्रीत अर्थसंकल्प सादर केला. मुंबई पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल, असे फडणवीस यांनी आश्वासन दिले.

     

  • 06 Mar 2026 02:13 PM (IST)

    अजितदादांच्या आठवणीने भावुक

    माझं अंतःकरण जड झाल आहे. अजित दादा यांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहीली. त्यांना श्रद्धांजली म्हणुन त्यांच भव्य स्मारक उभारल जाईल. नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरू केले जाईल. हा अर्थसंकल्प त्यांना सादर करतो अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

  • 06 Mar 2026 02:12 PM (IST)

    सामाजिक समरसता वर्ष

    हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला २०० वर्ष पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. ⁠बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. ⁠सामाजिक समरसता वर्ष म्हणुन साजरा केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

  • 06 Mar 2026 02:11 PM (IST)

    विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येणार

    महात्मा फुले यांच्या जयंतीला २०० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने एक समिती स्थापन करून विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतील. संत गाडगेबाबांचं १५० वं जयंती वर्ष आहे. त्यामुळे एक सर्किट तयार करणार. संत गाडगेबाबा ग्राम योजना राबवणार. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सोयीसुविधांसाठी तरतूद करण्यात येणार आहे.२०२६-२०२७ हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळा झाला. देहू येथील तुकारामांच्या जन्मस्थानाचं जनत आणि संवर्धन करू, असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले.

  • 06 Mar 2026 02:08 PM (IST)

    अजितदादांच्या नावाने गतिमान नागरी सन्मान पुरस्कार

    राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांची आठवण काढली. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नातं दृढ झालं होतं. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख होती. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारता येणार आहे अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सन्मान हा पुरस्कार सुरू करण्यात येईल. हा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करतो, असे ते म्हणाले.

  • 06 Mar 2026 02:06 PM (IST)

    हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नवीन योजना

    मुंबई येथील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता जून २०२६ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्यात येईल.तर बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम काम जूनपर्यंत होईल. तर योजना पण लवकरच सुरू होईल.

  • 06 Mar 2026 02:04 PM (IST)

    हा केवळ जमाखर्च नाही

    राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हा केवळ जमाखर्च नाही तर विकसीत महाराष्ट्राचा लेखाजोखा आहे. यावेळी त्यांनी सर्व महामानवांना अभिवादन केले. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र एकत्र करून, संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी योजना राबविण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अभियान राबविण्यात येईल.

  • 06 Mar 2026 01:58 PM (IST)

    विकसीत महाराष्ट्राचा संकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांसह आता विकसीत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटरवर याविषयीची पोस्ट करत थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करण्याची माहिती दिली आहे.

  • 06 Mar 2026 01:54 PM (IST)

    कॅबिनेटची अर्थसंकल्पाला मंजुरी

    राज्याचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात मुख्यमंत्री विधीमंडळात सादर करतील. कॅबिनेटने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पापूर्वी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्य वित्त मंत्री आणि इतरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

  • 06 Mar 2026 01:44 PM (IST)

    राज्याच्या अर्थसंकल्पाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी

    राज्याच्या अर्थसंकल्पाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेतकरी, लाडक्या बहिणींचं आजच्या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष आहे.

  • 06 Mar 2026 01:24 PM (IST)

    नाशिक – महापालिकेत नगरसेवक आक्रमक

    नाशिक –  प्रभागात पाणी येत नसल्याने महापालिकेत नगरसेवक आक्रमक झाले आहेत.  आज महापालिकेत विशेष महासभा असून अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.

  • 06 Mar 2026 01:09 PM (IST)

    बीड – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्चला

    बीड – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्चला होणार आहे.   डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत, अशा सूचना कोर्टाने सरकारी पक्षाला दिल्या आहेत.  जेल ट्रान्सफर संदर्भात विष्णू चाटे याच्या अर्जावर आज ऑर्डरची शक्यता आहे.

  • 06 Mar 2026 01:00 PM (IST)

    युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढणार का? – आदित्य ठाकरे

    “आपल्या देशाला आता दुसऱ्या देशाकडून परवानगी घ्यावी लागते. भारताला तेल खरेदीसाठी अमेरिकेने सवलत दिलीय. त्यावरुन टीका सुरु आहे. युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढणार का? ते स्पष्ट करा” अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

     

  • 06 Mar 2026 12:56 PM (IST)

    दुबईत अडकलेले जळगाव शहरातील पर्यटक सुखरूप परतले

    दुबईत अडकलेले जळगाव शहरातील पर्यटक सुखरूप आपल्या गावी तसेच मायदेशी परतले आहेत. जळगावातील गुळवे दांपत्याने दुबईत पर्यटन करत असताना युद्धाचा थरारक प्रसंग तसेच मिसाईल पडल्याचे आवाज आणि दृश्य अनुभवण्याची आपबिती सांगितली.मिसाईल बॉम्ब पडल्याचे मोठ्या मोठ्याने येणारे आवाज येत असल्याने मनात मोठी भीती निर्माण झाल्याचे गुळवे दांपत्याने सांगितले. बीचवर फिरत असताना लांब अंतरावर मिसाईल पडल्याचे दृश्य बघितले, मोठा आवाज ऐकल्याने भीती वाटली, त्यानंतर हॉटेलातून बाहेर पडलो नाही.

  • 06 Mar 2026 12:40 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांच्याकडून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

    मोदीजी ट्रम्प तुमच्या मजबुरीचा फायदा उचलत असतील, तर भारत आणि भारतीयांच्या हिताखातिर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या अशी मोठी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

  • 06 Mar 2026 12:35 PM (IST)

    रोहित पवारांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

    रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्याआधी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. आज CID ऑफिसमध्ये रोहित पवार जाणार आहेत. रोहित पवार दिल्लाचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत.

     

  • 06 Mar 2026 12:21 PM (IST)

    उमरगा पंचायत समिती सभापती पदी आकांक्षा चौगुले

    अखेर उमरगा पंचायत समिती सभापती पदी आकांक्षा चौगुले यांची बिनविरोध निवड. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले सभापती. उमरगा पंचायत समिती सभापती पदासाठी महायुती मधील भाजप आणि शिवसेनेत होती रस्सीखेच. सभापतीपदासाठी शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  • 06 Mar 2026 12:08 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 285 रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 76 हजार 40 रुपयांवर पोहोचले आहेत.

  • 06 Mar 2026 11:55 AM (IST)

    बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई

    उल्हासनगर मधील एका सोनोग्राफी सेंटर मधून सोनल गरेवाल हिला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण असताना देखील सोनोग्राफी सेंटरची मशीन हाताळत होती. सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांचे ३० सेकंदांचे व्हिडिओ बनवून टोळीला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संबंधित सेंटरचा परवाना रद्द करून सील करण्यात आले, उल्हासनगर आरोग्य अधिकाऱ्यांनी या सोनोग्राफी सेंटरमध्ये पहाणी केले असता हे धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 06 Mar 2026 11:40 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात आज 8 पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड

    धाराशिव जिल्ह्यामध्ये आज आठ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार आहे या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि कळंब या दोन ठिकाणी समसमान जागा असल्याने यामूळे सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर उमरगामध्ये शिवसेना आणि भाजपमध्येच सभापती पदासाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले या सभापती होणार असल्याचं शिक्कामोर्तब झालेलं आहे. तर दुसरीकडे परंडा आणि लोहारा या ठिकाणी देखील सभापती निवडले जाणार आहेत परंडा येथे शिवसेना तर लोहारा येथे महायुतीचा सभापती होणार असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच तुळजापूर आणि धाराशिव मध्ये भाजपाचे बहुमत असल्यामुळे भाजपचा सभापती होण्याचे चित्र आहे

  • 06 Mar 2026 11:30 AM (IST)

    सांगली: गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक… तीन किलो गांजासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

    सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील थबडेवाडी येथे तीन किलो गांजा जप्त करत एकास अटक करण्यात आली आहे.थबडेवाडीच्या स्मशानभूमी जवळ गांजा विक्री करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेच्या पथकाला मिळाली, त्यानंतर सापळा रचून दुचाकीस्वारास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे गांजा आढळून आला, त्यानंतर 72 हजार रुपये किमतीचा तीन किलो गांजा व दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हे दाखल करत एकास अटक करण्यात आली आहे.

  • 06 Mar 2026 11:20 AM (IST)

    नाशिक महापालिकेच्या विशेष महासभा अगोदर नाशिक महापालिकेची स्थायी समितीची बैठक

    नाशिक महापालिकेच्या विशेष महासभा अगोदर नाशिक महापालिकेची स्थायी समितीची बैठक पार पडली.  गेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला होता. मात्र अनेक सदस्यांना अर्थसंकल्पात आणखी काही तरतुदी द्याव्या अशी मागणी केली होती. या मागणी संदर्भात चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत अर्थसंकल्पात अजून कुठल्या गोष्टींची तरतूद करावी या संदर्भात चर्चा होणार आहे.

  • 06 Mar 2026 11:07 AM (IST)

    अमरावतीत मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात काल तापमान 39° च्या उंबरठ्यावर…

    मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या तापमानाचा 14  वर्षांचा रेकॉर्ड मोडला. अचानक वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर दुचाकीस्वारांनी उन्हापासून बचावासाठी तोंड व डोके झाकले आहेत. हवामान विभागाने पुढील 4-5 दिवस तापमान वाढत राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले. पाणी पिणे आणि उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला.

  • 06 Mar 2026 10:48 AM (IST)

    आमदारकी मागितली आणि देवाने खासदारकी दिली, माया इवनाते भावूक

    भाजपच्या राज्यसभा उमेदवार माया इवनाते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, मी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. गरिबीचे चटके काय असतात याची मला पूर्ण जाणीव आहे. काही महिन्यांपूर्वी मी सिद्धिविनायकाच्या चरणी मला एखादी संधी मिळावी, किमान आमदारकी तरी मिळावी अशी प्रार्थना केली होती. पण देवाने चक्क चमत्कार केला आणि मला थेट राज्यसभेची खासदारकी दिली. पक्षाने दाखवलेल्या या विश्वासामुळे मी भारावून गेली आहे. मला मिळालेल्या या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठीच करणार, असा ठाम विश्वास माया इवनाते यांनी व्यक्त केला.

  • 06 Mar 2026 10:38 AM (IST)

    राज्याच्या जनतेचे हित लक्षात घेऊन अर्थसंकल्प मांडला जाणार – आशिष जयस्वाल

    आज अर्थसंकल्प सादर करताना दादांची खूप आठवण येत आहे. गेल्या २५ वर्षांपासून मी त्यांना अर्थसंकल्प मांडताना पाहत आलोय. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा राज्याच्या जनतेचे हित लक्षात घेऊन मांडलं जाणार आहे, असे आमदार आशिष जयस्वाल यांनी म्हटले. गोरगरीब शेतकरी कष्टकरीसाठी हा अर्थसंकल्प असेल. गुंतवणूकीवर राज्याचा जोर राहील. सर्व क्षेत्रात विकासाला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प राहील, असेही आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

  • 06 Mar 2026 10:35 AM (IST)

    अजित दादांच्या विमान अपघाताची २ तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु- शंभूराज देसाई

    अजित दादांच्या विमान अपघाताची २ तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. त्यांच्या अहवालातील ठळक मुद्दे मंत्रिमंडळासमोर आले तर आम्ही बोलू, असे शंभूराज देसाई म्हणाले.

  • 06 Mar 2026 10:28 AM (IST)

    अजितदादांनीच आखलाय राज्याचा अर्थसंकल्प; मराठवाड्याला नक्की न्याय मिळणार, आमदार राजेश विटेकरांनी व्यक्त केला विश्वास

    राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. विटेकर म्हणाले की, यंदाचा १२ वा अर्थसंकल्प अजितदादा स्वतः सादर करणार होते, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होते. असे असले तरी, राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तरतुदी दादांनी आधीच करून ठेवल्या आहेत, ही बाब खुद्द मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली आहे. त्यामुळे आज सादर होणारा अर्थसंकल्प हा दादांच्या संकल्पनेतीलच असेल आणि यात मराठवाड्याच्या ज्वलंत प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल, अशी आशा राजेश विटेकर यांनी व्यक्त केली.

  • 06 Mar 2026 10:18 AM (IST)

    सोलापूरकरांची ६१ वर्षांची प्रतीक्षा संपली; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

    सोलापूर शहरासाठी गेल्या ६१ वर्षांपासून प्रलंबित असलेला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी हे महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार असून, आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्यक तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असून विद्यार्थ्यांसाठी शासकीय शिक्षणाची दारे खुली होणार आहेत.

  • 06 Mar 2026 10:08 AM (IST)

    आज अजितदादा असते तर त्यांनी…. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी धनंजय मुंडेंचे ट्वीट

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी एक ट्वीट केले आहे. स्वर्गीय अजितदादांच्या विकास व्हिजनची यातून पूर्तता होईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

  • 06 Mar 2026 09:50 AM (IST)

    केडीएमटीचा हा कसला न्याय? २० रुपयांच्या बससाठी ४० रुपयांचा रिक्षा प्रवास

    डोंबिवली स्वामीनारायण सिटी–ठाणे माजिवडा २० रुपयांत बस सेवा, मात्र बस सेवा स्टेशनपासून दूर असल्याने प्रवासी नाराज. बस पकडण्यासाठी आधी ४० रुपयांचा रिक्षा प्रवास; प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया. बस सेवा ‘श्रीमंत वसाहतीं’साठीच सुरू केली का? सर्वसामान्य डोंबिवलीकर व नागरिकांना या बस चा फायदा काय संतप्त प्रवाशांचा प्रशासनाला सवाल. बस सेवा थेट डोंबिवली रेल्वे स्थानकावरून सुरू करा प्रवाशांची जोरदार मागणी

  • 06 Mar 2026 09:40 AM (IST)

    अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल सिद्धीविनायक गणपती दर्शन घेणार

    अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल साडे नऊ वाजता सिद्धिविनायकचे दर्शन घेणार आहेत. अतूल सावे देखील सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले आहेत.

  • 06 Mar 2026 09:30 AM (IST)

    शाळेत सोडण्याच्या बहाण्याने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    भुसावळ नशिराबाद रस्त्यावर निर्जन स्थळी घेऊन जात मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे…

     

  • 06 Mar 2026 09:20 AM (IST)

    मंत्री अतुल सावे यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन

    राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन. आपल राज्य चांगले चालले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत ते सर्वासाठी असले पाहिजे. राज्यात अनेक संकट जरी असले तरी मुख्यमंत्री सक्षम आहेत हे सर्व दूर करण्यास अशा भावना अतुल सावे यांनी व्यक्त केल्या आहेत. सिद्धिविनायकांच्या दर्शना नंतर मंत्री अतुल सावे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनीधी विजय गायकवाड यांनी

  • 06 Mar 2026 09:10 AM (IST)

    जळगावात भारत फायनान्स या खासगी बँकेच्या जळगाव शाखेत आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस

    ३३६ महिलांच्या ३१ लाख १२ हजार १६४ रुपयांचा फसवणूकप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. बँकेच्या ५ माजी वसुली अधिकाऱ्यांनी ३३६ कर्जदार महिलांकडून हप्ते गोळा करून ती रक्कम बँकेत भरण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे पोलिसात दाखल तक्रारीत नमूद. बँकेच्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये हिशेबात वसुली झालेली रक्कम आणि बँकेत जमा झालेली रक्कम यात मोठी तफावत आढळून प्रकार उघडकीस. शाखा व्यवस्थापक मनीष चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँकेच्या ५ माजी वसुली अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, ते आता तपास करणार आहे

  • 06 Mar 2026 09:01 AM (IST)

    अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित

    मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस अगदी थोड्याचवेळात अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात अजितदादां सारखीच कडक आर्थिक शिस्त दिसून येण्याची शक्यता आहे. काल सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे.

  • 06 Mar 2026 08:54 AM (IST)

    थेट परकीय गुंतवणूक वाढली

    थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 31 टक्के इतका आहे. तर स्टार्टअप क्षेत्रातही राज्याचा देशात सर्वाधिक म्हणजे 17 टक्के इतका वाटा आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार थेट परकीय गुंतवणुकीतही राज्याने मोठी आघाडी घेतली आहे.

  • 06 Mar 2026 08:42 AM (IST)

    अनेक संकटं असली तरी मुख्यमंत्री सक्षम-अतुल सावे

    राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन घेतले. आपलं राज्य चांगले चालले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत ते सर्वासाठी असले पाहिजे. राज्यात अनेक संकट जरी असले तरी मुख्यमंत्री सक्षम आहेत हे सर्व दूर करण्यास अशा भावना अतुल सावे यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • 06 Mar 2026 08:29 AM (IST)

    पायाभूत सुविधा विकासाला चालना

    राज्याच्या पायाभूत सोयी-सुविधांना गती मिळणार आहे. त्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो प्रकल्पासह बंदरे विकास, विमानतळ आणि औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.

     

  • 06 Mar 2026 08:19 AM (IST)

    अर्थव्यवस्थेची जोरदार घौडदोड

    विधानसभेत वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तर विधान परिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर केला. या अहवालात कृषी,उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वाढीमुळे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचा दावा केला आहे.

Follow Us