Maharashtra budget 2024 : 10 हजार रुपये विद्या वेतन देणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे?

Maharashtra budget 2024 : मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान व कौशल्य विकास प्रकल्पा अंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जाला तसेच मॉडेल आयटीआय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ एका सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Maharashtra budget 2024 : 10 हजार रुपये विद्या वेतन देणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे?
Ajit Pawar
| Updated on: Jun 28, 2024 | 2:53 PM

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली. “विविध शैक्षणिक संस्थातून दरवर्षी 11 लाख विद्यार्थी पदवी घेतात. डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांनी औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळू शकतो. दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरु करण्यात येणार आहे” अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

“त्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा 10 हजार रुपये विद्या वेतन देण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिलं जाणार आहे. शासनाच्या योजनांची जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवा वर्गाला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षित करण्यात येईल” असं अजित पवार म्हणाले.

95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड

मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान व कौशल्य विकास प्रकल्पा अंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जाला तसेच मॉडेल आयटीआय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ एका सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 2023-24 मध्ये 95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे मुंबई गोवंडी येथे कार्यालय रोजगार केंद्र उभारण्यात आलेले आहे. राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाची काम करण्यासाठी सारथी, बार्टी तसेच इतर सामाजिक संस्थांना भरीव अनुदान देण्यात येईल.