एसटी स्थानक स्वच्छ ठेवा, 1 कोटी रुपये मिळवा, एसटी महामंडळाचं नवं अभियान; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

स्वच्छ बस स्थानक, सुंदर व नीटनेटका बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यासाठीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येणार असून राज्यातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे

एसटी स्थानक स्वच्छ ठेवा, 1 कोटी रुपये मिळवा, एसटी महामंडळाचं नवं अभियान; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
एसटी स्थानक स्वच्छ ठेवा, 1 कोटी रुपये मिळवा, एसटी महामंडळाचं नवं अभियान
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 11:58 AM

स्वच्छ बस स्थानक, सुंदर व नीटनेटका बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यासाठीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येणार असून राज्यातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. तब्बल 3 कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला 1कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्या (23 जानेवारी) सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या एसटी स्टँडला 1 कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षीच हे अभियान सुरू करण्यात आले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना विशद करताना, सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतूक , टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे. असे स्पष्ट केले होते. तसेच ” आपलं गाव, आपलं बसस्थानक ” या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य ” गाभा ” राहणार आहे. हे देखील आवर्जून सांगितले होते. अर्थात, कोणतेही बसस्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते. त्या अर्थाने बसस्थानक हे त्या गावची ” शान ” असल्यामुळे गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बसस्थानकाच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यंयीकरणासाठी सरळ हाताने मदत करावी, असे आवाहन यावेळी मंत्री सरनाईक यांनी केले.

दर 3 महिन्यांनी होणार मूल्यमापन

वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर 3 महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरी द्वारे बस स्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या असलेल्या सर्व बस स्थानकाचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी ‘ अ ‘ वर्ग, निमशहरी ‘ ब ‘ वर्ग व ग्रामीण ‘ क ‘ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केलेली आहे.

प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या बस स्थानकाला मिळणार 1 कोटी रुपये

प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे. राज्यपातळीवर ‘ अ ‘वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपये ‘ ब ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख रुपये तर ‘ क ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.