AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी होऊ शकतो, पण..मुख्यमंत्र्यांनी कुठली टेक्नोलॉजी वापरण्याचा दिला सल्ला?

Devendra Fadnavis : "जी राज्य उत्पादकतेत खूप पुढे होती, ती उत्पादकतेच्या अंतिम सीमेवर पोहोचली आहेत. मोठ्या प्रमाणात रासायनिक खत वापरामुळे ती क्षमता कमी झाली आहे" असं मुख्यमंत्री म्हणाले.

Devendra Fadnavis :  शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी होऊ शकतो, पण..मुख्यमंत्र्यांनी कुठली टेक्नोलॉजी वापरण्याचा दिला सल्ला?
Devendra Fadnavis Image Credit source: PTI
| Updated on: Aug 28, 2026 | 3:30 PM
Share

“नाशिक जिल्हा हा शेतीच्या बाबतीत प्रगतीशील जिल्हा आहे. शेती, फळबागा या क्षेत्रात झालेली प्रगती विलक्षण आहे. इथला शेतकरी अतिशय मेहनती आहे. आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारची वनउपज करणारा आमचा जिल्हा आहे. आज आपण द्राक्षाचा विचार केला, तर देशाच्या द्राक्ष निर्यातीत एकूण 80 टक्के निर्यात नाशिकमधून होते. नाशिकने हे कमावलेलं नाव आहे” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या शेतकऱ्याचं कौतुक केलं. दिंडोरीत नूतन कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. “आमच्या माता-भगिनींच्या डोळ्यात माहित नाही पण नाशिकचा कांदा आमच्या डोळ्यात मात्र वर्षातून दोनदा पाणी आणतो. संपूर्ण देशात नाशिकचा कांदा अतिशय प्रसिद्ध आहे. लासलगावसारखं कांद्याचं केंद्र आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कांद्याला चांगले भाव असल्याने कोणी कांदे घेऊन आला नाही. वर्षातून एकदातरी कांदे भेट मिळतात. आता कांदे भेट मिळाले असते तर घरी नेले असते. भाव पडतात तेव्हा कांदे भेट मिळतात. निश्चित तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “शेतमालाचा भाव जेव्हा कमी होतो, तेव्हा होणारं दु:ख, त्याचे परिणाम आम्ही पाहतो. आज सगळ्यात महत्वाचं शेती क्षेत्रात तंत्रज्ञान येणं महत्वाचं आहे” असं फडणवीस म्हणाले. “आपली लोकसंख्या, परिवार वाढले, आपल्या राज्यात 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. शेतकरी अल्पभूधारक असल्याने शेतकऱ्याची गुंतवणूक क्षमता कमी आहे” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ” AI च्या वापर केला तर उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी करु शकतो. APP मध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा मिळेल

“शेती क्षेत्रात संशोधन, तंत्रज्ञान येणं गरजेचं आहे. इतक्या सुंदर महाविद्यालयावर माझा विश्वास आहे, पुढच्या काळात शेतीत संशोधन होईल, त्या संशोधनाचं केंद्र हे महाविद्यालय असेल. त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा मिळेल. शेती क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरु आहे” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी क्षमतेने कशा वापरता येतील. जी राज्य उत्पादकतेत खूप पुढे होती, ती उत्पादकतेच्या अंतिम सीमेवर पोहोचली आहेत. मोठ्या प्रमाणात रासायनिक खत वापरामुळे ती क्षमता कमी झाली आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले.

Follow Us
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी;
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरे...
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरेंच्या बहिणीसोबतचे खास फोटो समोर
दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य