Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानदुखीचा त्रास, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

| Updated on: Nov 08, 2021 | 8:06 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर येत आहेत. त्यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळावला आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना हा त्रास होत आहे.

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानदुखीचा त्रास, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर येत आहेत. त्यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळावला आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना हा त्रास होत आहे.

मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.

रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता

मागील अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त वर्षाबंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणेदेखील टाळले होते. सध्या ठाकरे यांचा हा त्रास कमी होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे झाले होते रुग्णालयात दाखल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे घराण्यातील आणखी एक मोठे नाव आणि वलय असलेले नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेतले होते. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

इतर बातम्या :

VIDEO: राज्य शासनाचा जीआर अमान्य, एसटी कर्मचारी संपावर ठाम; संप अधिक चिघळण्याची शक्यता

पाण्याला खळखळाट, तसा भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री

Palkhi Marg | तब्बल 11 हजार कोटींचा खर्च, पूर्ण रस्त्यावर पदपथ, पालखी मार्ग आहे तरी कसा, काय फायदे होणार ?