AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात नवा वाद पेटला, सभागृहाला दिलेलं शिवरायांचं नाव बदललं; काँग्रेसचा भाजपवर जोरदार घणाघात

maharashtra Politics : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाचं नाव बदलण्यात आलं आहे. यावरुन नवा वाद पेटला आहे.

राज्यात नवा वाद पेटला, सभागृहाला दिलेलं शिवरायांचं नाव बदललं; काँग्रेसचा भाजपवर जोरदार घणाघात
| Updated on: Aug 07, 2026 | 7:45 AM
Share

राज्यात नवा वाद पेटला आहे. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहाचं ‘शिवरत्न’ नाव हटवण्यात आलं आहे. या नावाऐवजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह असे नाव देण्यात आलं आहे. या प्रकारामुळे राज्यभरात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आता चारीबाजूंनी भाजपच्या निर्णयावर टीका होऊ लागली आहे. भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे वावडे आहे का, असा आरोप सोशल मीडियावरून उपस्थित केला जात आहे. आता या वादात काँग्रेसने उडी मारली आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचे ‘शिवरत्न’ नाव हटवून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह करण्याचा ठराव उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मांडला. त्याला एकमताने मान्यता देण्यात आली. यामुळे जिल्ह्यासह राज्यात नवा वाद पेटला आहे.

जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाला 40 वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कारकि‍र्दीत ‘शिवरत्न’ नाव दिले होते. काही वर्षांआधी जिल्हा परिषदेवर मोहिते पाटील समर्थकांची सत्ता होती. यंदा जिल्हा परिषदेत सत्ता बदल झाला. जिल्हा परिषदेवर भाजपने सत्ता काबीज केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहाला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा ठराव झाला.

या ठरावानंतर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण जपण्याचे कार्य या निमित्ताने केले जात आहे, अशी भावना जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली. परंतु या सभागृहाला दिलेले ‘शिवरत्न’ हे नाव कायम ठेवण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे. तर या वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे.

काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट करत काय म्हटलं?

काँग्रेसने म्हटलं की, ‘शिवरायांचं नाव हटवण्याची भाजपची हिंमत होतेच कशी? सोलापूर जिल्हा परिषदेने शिवरायांच्या नावानं असलेल्या “शिवरत्न” सभागृहाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय. सत्ताधारी भाजपने तसेच हे कारस्थान ज्या नेत्याच्या डोक्यात शिजलं. भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य या सर्वांनी आपल्या घरांचे, कार्यालयांचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी करावे. पण जिल्हा परिषद सभागृहाचे “शिवरत्न” हे नाव बदलू नये. महाराष्ट्राची जनता शिवछत्रपतींचा हा अपमान कदापी सहन करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...