Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा विळखा वाढताच, दिवसभरात 1,216 नवे रुग्ण, आकडा 17,974 वर

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17,974 वर पोहोचली आहे. आज (7 मे) दिवसभरात 1,216 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा विळखा वाढताच, दिवसभरात 1,216 नवे रुग्ण, आकडा 17,974 वर
Follow us
| Updated on: May 08, 2020 | 1:20 AM

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 974 वर (Maharashtra Corona Virus Cases) पोहोचली आहे. आज (7 मे) दिवसभरात 1 हजार 216 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 207 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 3,301 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी आज दिली (Maharashtra Corona Virus Cases).

दिवसभरात 43 कोरोनाबाधितांचा मृत्यू

आज राज्यात 43 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळीची एकूण संख्या 694 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील 24, पुण्यातील 7, वसई-विरारमधील 5, सोलापूर शहरात 2, अकोला शहरात 1, पालघरमध्ये 1 आणि औरंगाबाद शहरात 1 मृत्यू झाला आहे. याशिवाय मणिपूरमधील 1 आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 24 पुरुष तर 19 महिला आहेत. आज झालेल्या 43 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 25 रुग्ण आहेत. तर 14 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. 43 रुग्णांपैकी 29 जणांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 694 झाली आहे.

राज्यात 2 लाख 12 हजार 742 जण होम क्वारंटाईन

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 02 हजार 105 नमुन्यांपैकी 1 लाख 83 हजार 880 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 17 हजार 974 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 12 हजार 742 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 12 हजार 494 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Maharashtra Corona Virus Cases) आहेत.

राज्यात 51.76 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1087 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 21 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 51.76 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Corona Virus Cases

संबंधित बातम्या :

ऑर्थर रोड जेलमध्ये 26 कर्मचारी आणि 78 कैद्यांना कोरोना

Nagpur Corona | तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला

Shocking Video : मृतदेहाशेजारी कोरोना रुग्णांवर उपचार, विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.