AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित; आशिष शेलार यांची घोषणा

महाराष्ट्रात भाजप नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सव हा आता राज्योत्सव म्हणून घोषित केल्याची घोषणा केली आहे. हे मुंबईच्या पावसाळी अधिवेशनात जाहीर झाले. या निर्णयाने गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

सर्वात मोठी बातमी ! गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित; आशिष शेलार यांची घोषणा
ganpati festival
| Updated on: Jul 10, 2025 | 2:22 PM
Share

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला गणेशोत्सवाला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. आता महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आगामी गणेशोत्सवाबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली.

हेमंत रासनेंनी केली मागणी

सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी भाजप आमदार हेमंत रासणे यांनी सभागृहात गणेशोत्सवाचे महत्त्व सांगण्यावर भर दिला आहे. “सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. गणेश मंडळे अनेक सामाजिक कार्य करत असतात. आता या उत्सवावर काही बंधने आली आहेत. पण आता महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर करावा, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

आशिष शेलार काय म्हणाले?

हेमंत रासने यांच्या या मागणीला मंत्री आशिष शेलार यांनी दुजोरा देत उत्तर दिले. महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी सुरू केला. त्यापूर्वी घरोघरी हा उत्सव सुरु होता. महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा आता आपण महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे आजच मी स्षप्टीकरण देतो. देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्यापती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहिल, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

विसर्जन परंपरागत पद्धतीनेच

देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवाबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. पीओपी (POP) मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही,” असे आशिष शेलार यांनी नमूद केले.

आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “शंभर वर्षांच्या परंपरेला कोणी खंडित केले असेल, तर ते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. गणेशोत्सवावर काही लोकांनी ‘स्पीडब्रेकर’ आणले होते, पण आपल्या सरकारने ते दूर केले आहे.” असे आशिष शेलारांनी म्हटले. या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारची ही भूमिका गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि भव्य आयोजनाला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.

शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.