Maharashtra Election Results 2024 Live : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी एकमताने निवड
Maharashtra Assembly Election Final Results 2024 and Winner Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं आज मतमोजणी झाली. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीलाच कौल दिला असून महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीचं अक्षरश: पानिपत झालं असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे सर्व निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मविआचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. भाजप हा महायुतीतला सर्वात मोठा भाऊ ठरला आहे. भाजपला 130 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. तर मविआला 50 जागांवरही विजयी होता आलं नाही. विशेष म्हणजे मविआतील घटक पक्षांना विरोधी पक्षनेते पदासाठी लागणारा 29 आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्ष नेताच राहणार नाही.
LIVE NEWS & UPDATES
-
एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून एकमताने निवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये निवडून आलेल्या सर्व आमदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेता ठरवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या गटनेतापदी नियुक्ती व्हावी, असा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
-
तर आज चित्र वेगळं असतं, राऊतांचा हल्लाबोल
महाविकास आघाडीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जोरदार झटका बसला. ईव्हीएममधील गडबडीमुळे असा निकाल लागल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आज चित्र वेगळं असतं, असे ते म्हणाले.
-
-
जरांगेंमुळे माझ्या मतदानावर परिणाम
मनोज जरांगे हे अखेरच्या टप्प्यात माझ्या मतदारसंघात आले. त्यांनी मी आजारी आहे, त्यामुळे त्यांनी समाजाला आव्हान केलं होते. जरांगेमुळे माझ्या मतदानावर परिणाम झाल्याचे भुजबळ म्हणाले.
-
शिंदे गटाची बैठक संध्याकाळी
ग्रामीण महाराष्ट्रातील निवडून आलेल्या उमेदवारांना पोहचण्यास उशीर होत असल्यामुळे बैठक संध्याकाळी ६ वाजता नियोजित करण्यात आली आहे.
-
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे. भाजप मोठे भाऊ आहेत.. देशात आणि राज्यात पण आहे.. पण छोट्या भावाने चांगली कामगिरी पाहून जनतेच्या मनातील लोकप्रियता पाहून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी.
-
ही जनतेची मला भेट- सुजय विखे
महायुतीला जिल्हयात 12 पैकी 10 जागा मिळणे ही मला अहिल्यानगरच्या जनतेने माझ्या वाढदिवसाची दिलेली सर्वात भेट आहे, असे सुजय विखे यांनी सांगितले.
-
गद्दारी करणारे निवडणून आले- अहिर
राज्यात महायुतीकडे वातावरण नसताना जे घडले ते अनेपक्षित आहे. लोकांमध्ये राहणारे नेते लोकांनी नाकारले आहे. गद्दारी केलेल्या लोकांना निवडून कसे दिले? हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. येत्या काही दिवसांत याच विश्लेषण होईल, असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
-
भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोष
अमरावती जिल्ह्यात 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झाला. विजय उमेदवारांचे अमरावतीच्या राजापेठ भाजप कार्यालयात अभिनंदन केले जात आहे. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष होत आहे.
-
शिवसेनेला चार अपक्ष आमदारांचे समर्थन
शिवसेनेला चार अपक्ष आमदारांनी समर्थन दिले आहे. त्यात अशोक माने, हातकणंगले, राजेंद्र यड्रावकर, शिरोळ, शरद सोनवणे, जुन्नर, रत्नाकर गुट्टे, गंगाखेड यांचा समावेश आहे.
-
अजित पवार गटनेते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची गटनेतेपदी निवड झाली.
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीहून मुंबईकडे रवाना
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. इस्लामपूर इथून जयंत पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीच्या पराभवानंतर इस्लामपूरमधील विजयाचा जल्लोष टाळात जयंत पाटलांनी मौन बाळगला होता. आज सकाळी ते मुंबईकडे तातडीने रवाना झाले आहेत. ते शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
-
शिवसेना कोणाची याचा थेट निकाल जनतेनं दिला- दीपक केसरकर
“शिवसेना कोणाची याचा थेट निकाल जनतेनं दिलाय. आम्ही निवडून आलो की विरोधक ईव्हीएमला दोष देतात,” अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी टोला लगावला आहे.
-
मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही- जरांगे पाटील
“मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सांगितलं की मराठा समाज भाजपसोबत होता. मराठ्यांची विभागणी होऊ शकत नाही. मीच मराठा समाजाला मुक्त केलं होतं. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं. मी मैदानात नव्हतो तर फॅक्टर फेल कसा झाला? एक महिन्याभर थांबा, तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले,” असं जरांगे पाटील म्हणाले.
-
धुळ्यातील सर्व महायुतीचे उमेदवार मुंबईकडे रवाना
धुळ्यातील सर्व महायुतीचे उमेदवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची बैठक होणार आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) मंजुळा गावित बैठकीसाठी रवाना झाल्या आहेत. तर भाजपाचे चारही आमदार देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत.
-
महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी
महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. विधानसभेत डावललेल्या नाराजांना विधान परिषदेवर संधी मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परिषदेतील 4 आमदारांची विधानसभेवर वर्णी लागणार आहे. विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके विधानसभेवर निवडून गेल्याने भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत.
शिवसेनेकडून आमशा पाडवी यांची विधानसभेवर निवड झाली आहे. तर राजेश विटेकर विधानसभेवर निवडून गेल्याने राष्ट्रवादीची परिषदेतील एक जागा रिक्त झाली आहे. अनेक नाराज मंडळींपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलंय.
-
जरांगे फॅक्टर कळायला हयात जाईल तुमची- मनोज जरांगे पाटील
“”कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावा. पण श्रेय घेताना लोकांनी आपली औकात बघितली पाहिजे. काल सगळे म्हणत होते जरांगे फॅक्टर फेल झाला, पण आम्ही मैदानातच नाही तर कसं फेल झालो. कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय आम्हाला सोयरसुतक नाही. आले तेवढे मराठा फॅक्टर मिळाले. जरांगे फॅक्टर कळायला हयात जाईल तुमची,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
Maharashtra News: शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींची आज मुंबईतील ताज लॅंड्स हॅाटेलमध्ये बैठक
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे निवडूण आलेले नवनिर्वाचीत उमेदवार या बैठकीला उपस्थित रहाणार… या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गट नेता निवडला जाणार आहे… शिवसेना विधिमंडळ गट नेता निवडीनंतर नव नियुक्त गट नेता महायुतीच्या सहकारी पक्षांच्या गटनेत्यासोबत सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे निवेदन प्रस्ताव सादर करणार…
-
Maharashtra News: सरकारनं आता मराठ्यांशी बेईमानी करायची नाही… जरांगे पाटील
गोल बोलून मराठ्यांची मतं घेतलीत आता उद्याचा दिवस आमचा… सरकारनं आता मराठ्यांशी बेईमानी करायची नाही… आम्ही मैदानात असतो तर तुमच्यात किती दम आहे हे बघितलं असतं… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: मी भाजप सोडून कोणताही विचार करू शकत नाही – शिवाजी पाटील
मी भाजप सोडून कोणताही विचार करू शकत नाही… चंदगड मधील विजयी उमेदवार शिवाजी पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका.. भाजपचे पदाधिकारी असलेल्या शिवाजी पाटील यांनी चंदगड मधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढवली होती निवडणूक…
-
Maharashtra News: महायुतीचे सर्वच आमदार आणि महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची आज सायंकाळी पाच वाजता बैठक
कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच आमदार आणि महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची आज सायंकाळी पाच वाजता बैठक… खासदार धनंजय महाडिक यांची माहिती… खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने हे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांना घेऊन मुंबईच्या दिशेने…
-
दिलीप धोत्रे आक्रमक
मनसेचे नेते दिलीप धोत्रे EVM च्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहेत. राज्यभरात EVM च्या विरोधात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. दिलीप धोत्रे यांनी EVM मशीनमध्ये गडबड झाली असल्याने मतदान कमी झाले असल्याचा आरोप केला आहे. VVPAT च्या स्लिपची फेर मोजणी करावी अशी काल केलेली मागणी निवडणूक निर्णय अधिकार्यानी फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायलायात दाद मागणार आहेत. उद्या मुंबई हायकोर्टात निवडणूक आयोगा विरोधात याचिका दाखल करणार आहेत.
-
सामंत बंधूंच्या अभिनंदनाचे बॅनर
रत्नागिरीत झळकले सामंत बंधूंच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. उदय सामंत आणि किरण सामंत सख्ख्ये भाऊ जिंकले आहेत. दोन्ही भाऊ आमदार झाल्याबद्दल रत्नागिरी शहरातल्या सर्वच ठिकाणी अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. दोन्ही बंधू आमदार म्हणून निवडून आल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भाऊ एकत्रितपणे विधानसभेत पोहोचले आहेत. उदय सामंत पाचव्यांदा आमदार झाले आहे. किरण सामंत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले आहेत. उदय सामंत यांनी प्रतिस्पर्धी बाळ माने यांचा 41 हजार 590 मतांनी पराभव करत आमदारकीचा पंच मारला आहे. किरण सामंत यांनी 19 हजार 680 मतांनी राजन साळवी यांचा पराभव करत साळवींचा चौकार हुकवला आहे.
-
शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल
शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुंबईत यायला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज अॅन्ड लॅड्स मध्ये आतापर्यंत २९ आमदार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाॅटेलमध्येच सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार आहे. उपस्थित आमदारांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.
-
दिलजित दोसांचा कॅानसर्ट वादात
दिलजित दोसांचा कॅानसर्ट वादात सापडला आहे. कॅानसर्टला विरोध , आमच्या जागेत मद्यविक्रीला परवानगी देऊ नये, असं सुर्यकांत काकडे यांनी एक्साईजच्या एसपीला पत्र स्थानिक नागरिकांकडूनही विरोध सुरू आहे. पुण्यात आज दिलजीत दोसंज यांची लाईव्ह कॉन्सर्ट पार पडणार आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे.
-
धुळ्यात महाविकासआघाडी पूर्णपणे हद्दपार, महायुतीचा बोलबाला
धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडी पूर्णपणे हद्दपार झाले आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही जागा महायुतीने जिंकल्या आहेत. महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवारांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे ग्रामीणमध्ये देखील भाजपने विजय मिळवला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पाच जागांपैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. एक जागेवर शिवसेनेच्या महिला उमेदवार विजयी झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान शिरपूरच्या काशीराम पावरा यांना मिळाला आहे. चौथ्यांदा जागा जिंकत काशीराम पवार यांनी विक्रम केला आहे. तब्बल एक लाख 45 हजार 944 मतांनी काशीराम पावरा यांचा विजय झाला आहे.
-
चंद्रपुरात 9 जागांवर भाजपची सरशी, नवीन चेहऱ्यांनाही मिळाली संधी
चंद्रपूर:- राज्यातील भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पालकमंत्रीपदाच्या नेतृत्वाखाली 2 जिल्ह्यातील 10 पैकी 9 जागांवर भाजपची सरशी बघायला मिळाली. चंद्रपुरात 6 पैकी 5 तर वर्धा जिल्ह्यात सर्व 4 जागांवर भाजपचा झेंडा रोवला गेला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुयोग्य नियोजनाने भाजपने हे यश खेचून आणले. आमदारकीच्या जुन्या चेहऱ्यासह नव्या चेहऱ्याना भाजपने यावेळेस संधी दिली होती. नव्या-जुन्या चेहऱ्यासह भाजपने हे दणदणीत यश प्राप्त केले आहे.
-
मराठवाड्यात महाविकासआघाडीचा सुपडा साफ, जरांगे फॅक्टरलाही मोठा धक्का
मराठवाड्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. 46 मतदारसंघांपैकी फक्त 5 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाली एक जागा मिळाली आहे. महायुतीला 46 पैकी तब्बल 40 जागा मिळाल्या आहेत. महाविकासआघाडीचा मराठवाड्यातून सुपडा साफ झाला असून यामुळे जरांगे फॅक्टरलाही मोठा धक्का बसला आहे.
-
हिंगोलीतील राड्यानंतर 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल
हिंगोली : काल झालेल्या राड्यात 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका गटाच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. शिंदे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतमोजणी सुरु असताना शहरात राडा झाला होता. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या पुतण्यावर राड्यादरम्यान गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या राड्यात तलवारीसह अन्य शस्त्राने जखमी झालेल्या हैदराबादसह विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकासआघाडी हद्दपार, पहिल्यांदाच दोन महिला आमदारांची निवड
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून महाविकासआघाडी हद्दपार झाली आहे. याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. शिवसेनेचा गड असलेल्या ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही जागा नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन महिला आमदार विजयी झाल्या आहेत. अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव जिल्ह्यातून दोन महिला आमदार विजयी झाल्या आहेत. पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्या आहेत.
-
आमदार योगेश कदम यांनी जंगी मिरवणूक काढत केला विजयाचा जल्लोष
आमदार योगेश कदम यांनी विजयाचा मोठा जल्लोष केला आहे. त्यांनी जंगी मिरवणूक काढत कोटेश्वरी देवीचे दर्शन घेतले. रत्नागिरीतील दापोलीमधील खेड तालुक्यामधील जामगे गावात योगेश कदम यांची कुलस्वामिनी कोटेश्वर देवीचे मंदिर आहे. खेड दापोली मतदार संघातील विजयानंतर भव्य मिरवणूक काढल्यानंतर योगेश कदम कोटेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आपल्या घरात प्रवेश करताना देखील घरच्या मंडळींनी योगेश कदम यांच जल्लोषात स्वागत केलं
-
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत, सोमवारी शपथविधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे सर्व निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मविआचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सोमवारी 25 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.
-
उद्धव ठाकरेंना गेट आऊट केला, आता हिंदु राष्ट्राची सुरुवात :गुणरत्ने सदावर्ते
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशात गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण, सहनशीलता, हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या अखंड भारत मानणाऱ्या मतदारांनी भरभरून मतं दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेकांना त्रास दिला होता. त्यांना आता गेट आउट केला आहे, हिंदु राष्ट्राची सुरुवात झाली आहे, असं सदावर्ते म्हणाले.
-
बाळासाहेब ठाकरे यांचं देशासाठी मोठं योगदान : नरेंद्र मोदी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच मोदींनी राज्यातील महापुरुषांचा उल्लेख केला. तसेच मोदींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देशासाठी योगदान असल्याचंही म्हटलं.
-
महाराष्ट्रात विभाजनवादी शक्तींचा पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीच्या या घवघवीत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मोदींनी या विजयासाठी महायुतीतील एकनाथ शिंदे, देंवेद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही प्रमुख नेत्यांचं कौतुक केलं. तसेच “महाराष्ट्रात आज विकासाचा विजय झाला. महाराष्ट्रात विभाजनवादी शक्तींचा पराभव झाला, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. नवी दिल्लीतील भाजप मु्ख्यालयात मोदी बोलत होते.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात दाखल झाले आहेत. मोदींचं भाजप मुख्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
-
मविआच्या उमेदवाराची फेर मतमोजणीची मागणी फेटाळली
मविआच्या उमेदवाराची फेर मतमोजणीची मागणी फेटाळण्यात आली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काही फेऱ्यांची फेर मतमोजणी करावी,अशी मागणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून करण्यात आली होती. मात्र ही मागणी मागणी ठोस कारणाअभावी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळली आहे. शेवटच्या फेरीनंतर भाजपचे समाधान अवताडे हे 8 हजार 316 मताने विजयी झाले आहेत .
-
महाराष्ट्रात अनाकलनीय निकाल लागला : उद्धव ठाकरे
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल आहे. या विजयानंतर मविआतील शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात अनाकलनीय निकाल लागला आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
-
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे विजयी
मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे विजयी झाले आहेत. पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान अवताडे विजयी झाले होते. अशाप्रकारे काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान आवताडे यांच्यासमोर दुसऱ्यांदा पराभव झाला आहेत.
-
वानखेडे स्टेडियमवर होणार नव्या सरकारचा शपथविधी
वानखेडे स्टेडियमवर होणार नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. सोमवारी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी पार पडणार आहे. याआधी 2014 सालीही याच वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पाकर पडला होता.
-
पाचोरा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार किशोर पाटलांचा मोठ्या मताधिक्याने विजय
पाचोरा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. किशोर पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र वैशाली सूर्यवंशी यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. पाचोरा विधानसभेच्या निवडणुकीत किशोर पाटलांनी आपल्या बहिणीचा पराभव केला आहे. विजयानंतर किशोर पाटील यांची शहरातून विजय रॅली काढण्यात आली आहे.
-
जनतेने दिलेला कौल मान्य, संजय काका पाटील यांची प्रतिक्रिया
जनतेने दिलेला कौल मान्य करायचा, विकासाचा जो प्रयत्न केला,पण भावनेवर राजकारण केलं गेलं,त्यामुळे आपल्याला अपयश आलं, अशी प्रतिक्रिया सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पराभूत उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन करत राज्यात आणि देशात महायुतीचे सरकार आहे,त्यामुळे विकासाचा राजकारण यापुढे करूया,असं मत देखील संजयकाका पाटील यांनी व्यक्त केलं.ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते.
-
लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला : एकनाथ शिंदे
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. शिंदेंनी विजयानंतर मतदारांचे आभार मानत तसेच लाडकी बहिण योजनेचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : महाराष्ट्राच्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिलं – अजित पवार
महाराष्ट्राच्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिलं. राज्य कंगाल केलं अशी आमच्यावर टीका झाली.लोकसभेत आम्हाला अपयश मिळालं. आम्ही ते मान्य केलो, त्यातून शिकलो, सावरलो. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. विरोधक उताणे पडले. विजयानंतर अजित पवारांनी मानले जनतेचे आभार.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर पराभूत
तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपचे राजेश वानखेडे विजयी.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : महायुतीच्या भव्य विजयानंतर शपथविधीही भव्य होणार, जागा ठरली ?
महायुतीच्या भव्य विजयानंतर शपथविधीही भव्य होणार. महायुतीकडून शिवाजी पार्क आणि वानखडे स्टेडिअमवर शपथविधी घेण्याबाबत विचार सुरू असून सोमवार किंवा मंगळवारी शपथविधी होऊ शकतो.
-
Bhor election Result 2024 : भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे यांना पराभवाचा धक्का
भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे संग्राम थोपटे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचं वक्तव्य
मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कोणताही वाद-विवाद नाहीत, तीनही पक्षांचे नेते बसून, बोलून, विचार विनिमय करून जो निर्णय घेतील ते मान्य असेल. मुख्यमंत्रीपदावरून स्पष्ट वक्तव्य करणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : विषारी प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने कृतीतून उत्तर दिलंय – देवेंद्र फडणवीस
राज्यात जो विषारी प्रचार करण्यात येत होता, त्याला महाराष्ट्राच्या जनतेनं कृतीतून उत्तर दिलं , एकी दाखवली आहे. त्या जनतेचे मी आभार मानतो. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, अखेर हा चक्रव्यूह तोडून दाखवला आहे,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : महायुती,भाजपच्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
संपूर्ण महाराष्ट्र हा मोदींच्या पाठिशी आहे. एक है तो सेफ है हा मोदींनी दिलेला नारा महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येऊन, हा नारा यशस्वी केला आहे. आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले, त्यांचेही आभार मानतो.
जे फेक नरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं त्या फेक नरेटिव्हच्या विरोधात लढणाऱ्या राष्ट्रीय संघटनांचा हा विजय आहे. विशेषत: महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्याविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या संतांचा, महाराष्ट्राल एक ठेवणाऱ्यांचा हा विजय आहे
-
Dombivli election Result 2024 : डोंबिवलीमध्ये कमळ फुललं, भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचा दणदणीत विजय
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुललं आहे. भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण यांनी 1 लाख 30 हजार मतं मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांच्यासमोर शिवसेन ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे उभे होते, मात्र त्यांचा पराभव झाला.
-
Nalasopara election Result 2024 : नालासोपारामध्ये बविआचे क्षितीज ठाकूर पराभूत, भाजपाचे नाईक विजयी
नालासोपारा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे राजन नाईक विजयी झाले असन बविआचे क्षितीज ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
-
Latur Gramin election Result 2024 : लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव, देशमुखांचा गड हादरला
लातूर ग्रामीण धीरज देशमुख पराभूत झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड यांनी विजय मिळवला आहे. लातूर ग्रामीण हा देशमुख कुटुंबाचा गड मानला जातो, मात्र या पराभवामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
-
Karad election Result 2024 : पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का, भाजपच्या अतुल भोसलेंचा विजय
कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे अतुल भोसले यांचा विजय झाला.
-
Mahim election Result 2024 : ‘राज’ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा माहिममध्ये पराभव, कोण झालं विजयी ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडणूक लढवत होते, त्यांचा पराभव झाला आहे. माहिममध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत हे विजयी झाले आहेत. शिवसेना सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानी तर अमित ठाकरे हे तिसऱ्या स्थानी आहेत.
-
Sangole Election Result 2024 : सांगोल्यात शहाजीबापू धक्का, शेकापच्या देशमुखांची विजयी वाटचाल
सांगोला विधासभा मतदारसंघात शहाजीबापू यांना मोठा धक्का बसला आहे. शेकापचे बाबासाहेब देशमुख यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडे 23 हजार मतांची मोठी आघाडी आहे.
-
Baramati Election Result 2024 : बारामतीमध्ये अजित पवारांची विजयी आघाडी, युगेंद्र पवारांची मोठी पिछेहाट
बारामती मतदारसंघातून अजित पवारांनी पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 12 व्या फेरीअखेरीस ते 60 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. काटेवाडीत अजित दादांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. शरद पवार गटाचे युगेंद्र पवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : बाळासाहेब थोरात पराभवाच्या उंबरठ्यावर
बाळासाहेब थोरात पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील विजयी झाले आहेत.
-
Mawal Election Result 2024 : मावळ मतदारसंघाचा निकाल समोर, कोण झालं विजयी ?
मावळ विधानसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. 29 व्या फेरीअखेर मावळमध्ये महायुतीमधील अजित पवार गटाचे सुनील शेळके यांचा विजय झाला आहे. शेळके हे 1 लाख 08 हजार,565 मतांनी विजयी झाले. बापू भेगडे यांचा पराभव झाला.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उधळला विजयाचा गुलाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि शिंदे गटालाही अभूतपूर्व यश मिळालं. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर सर्व नेते, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले, पेढे भरवत त्यांनी विजयी गुलाल उधळला.
-
Kurla Election Result 2024 : कुर्ल्यातून शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर विजयी
कुर्ला मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर यांचा विजय झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मोरजकर यांचा त्यांनी पराभव केला
-
Mankhurd Election Result 2024 : मानखुर्द -शिवाजीनगरमध्ये नवाब मलिकांना धक्का, अबू आझमींची आघाडी कायम
मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवाब मलिक यांना धक्का बसला आहे. अबू आझमींची आघाडी कायम आहे.
-
Pune Election Result 2024 : पुणे कॅन्टोनमेंटचा निकाल समोर, कोण विजयी ?
पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे सुनील कांबळे हे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या रमेश बागवेंना पराभवाचा धक्का बसला आहे.
-
Andheri Election Result 2024 : अंधेरी पूर्वमधून शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांचा विजय
अंधेरी पूर्व मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांनी विजय मिळवला आहे.
-
Nifad Election Result 2024 : निफाडमधून अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी
निफाडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप बनकर यांचा विजय झाला आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : भाजप, महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, माझा मुलगा..
देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम या दोन्ही गोष्टींनी त्याला मोठा हा विजय मिळाला आहे. महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की त्याने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं.महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आईने त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर
नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. काही जागांवर महायुतीच्या उमेदवारांकडून निर्णय आघाडी . मालेगावमध्ये अपक्ष उमेदवार आणि कळवण मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेपी गावित आघाडीवर आहेत.
१.नाशिक पूर्व: राहुल ढिकले भाजप
२.नाशिक मध्य: देवयानी फरांदे भाजप
३.नाशिक पश्चिम: सीमा हिरे भाजप
४.देवळाली: सरोज आहेर अजित पवार गट
५.इगतपुरी: हिरामण खोसकर अजित पवार गट
६.सिन्नर: माणिकराव कोकाटे अजित पवार गट
७.दिंडोरी: नरहरी झिरवाळ अजित पवार गट
८.कळवण: जे.पी गावित मास्कवादी कम्युनिस्ट पक्ष
९.बागलाण: दिलीप बोरसे भाजप
१०.चांदवड: राहुल आहेर भाजप
११.निफाड: दिलीप बनकर अजित पवार गट
१२.नांदगाव: सुहास कांदे शिंदे गट
१३.येवला: छगन भुजबळ अजित पवार गट.
१४.मालेगाव बाह्य: दादा भुसे शिंदे गट
१५.मालेगाव मध्य: आसिफ शेख अपक्ष -
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : ही तर लँडस्लाईड व्हिक्टरी – महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना मी धन्यवाद देतो. राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी – अशा प्रकारचा विजय मिळाला आहे. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करत. लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी , समाजातील प्रत्येक घटकाने भरभरून मतदान केलं. गेली दोन-अडीच वर्षे महायुतीने जे काम केलं, त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. जनतेचे पुन्हा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.
-
Malbar Hill Election Result 2024 : मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा विजयी
मलबार हिलमधून भाजपचे मंगलप्रभात लोढा विजयी झाले आहेत.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंना मोठा धक्का, चंद्रकांत पाटील आघाडीवर
मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील 20 हजार840 मतांनी आघाडीवर आहेत. रोहिणी खडसे पिछाडीवरच आहेत. एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : श्रीवर्धनमधून अदिती तटकरे यांचा विजय
श्रीवर्धनमधून अदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत. तर खानापूरमधून शिंदे गटाचे सुहास बाबर हे विजयी झाले आहेत.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : कर्जत-जामखेडमध्ये अखेर रोहित पवार आघाडीवर
कर्जत जामखेडमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार हे आघाडीवर आले आहेत. सातव्या फेरीत ते 634 मतांनी आघाडीवर असून राम शिंदेंना धक्का बसला आहे.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : अहिल्यानगर – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर
13 व्या फेरी अखेर नगर मतदार संघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप 23712 मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर 23 हजार 712 मतांनी पिछाडीवर आहेत.
-
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : माढा अभिजीत पाटील आघाडीवर
माढा मतदारसंघात अभिजीत पाटील हे 2289 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Bandra Election Result 2024 : वांद्रे पश्चिम मध्ये आशिष शेलार यांची आघाडी कायम
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात आशिष शेलार यांची 14 हजारपेक्षा अधित मतांनी आघाडी
आशिष शेलार – 25,590
आसिफ झकेरिया – 10,775
-
Maharashtra Election Results 2024 : मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल
मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल. 12 व्या फेरीअंती मंगल प्रभात लोढा यांचं मताधिक्य ३६ हजारांच्या पार गेलं आहे.
मंगल प्रभात लोढा यांना ५७,३९० मतं मिळाली असून ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांना २१,०२८ मतं आहेत.
-
धाराशिवच्या परंडा मतदारसंघात अटीतटीचा सामना
धाराशिव ब्रेकिंग – राहुल मोटे विरुद्ध तानाजी सावंत यांच्यात चुरस वाढली.
सहाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राहुल मोटे 65 मतांनी आघाडीवर
-
Worli Election Result 2024 : चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण यांची आघाडी कायम
चाळीसगाव विधानसभेतून भाजप महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांची आठव्या फेरीतही आघाडी कायम आहे. सहाव्या फेरीत मंगेश चव्हाण यांना 30 हजार 600 मतांची आघाडी
-
Worli Election Result 2024 : कुछ तो गडबड है – संजय राऊत
आत्तापर्यंतच्या निकालात कुछ तो गडबड है. हा जनतेचा कौल वाटत नाही – विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संजय राऊतांनी व्यक्त केली शंका. शिंदेंच सर्व आमदार कसे निवडून येतात ? असा सवालही त्यांनी विचारला.
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, अनेक ज्येष्ठ नेते पिछाडीवर
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेतक दिग्गजांना मोठा धक्का बसल्याचं दिसतं आहे. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख हेही पिछाडीवर आहेत.
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : बंडानंतरही एकनाथ शिंदेंना मोठं यश, ठाकरेंना धक्का
बंड करून बाहेर पडलेले आणि महायुतीमध्ये सामील झालेले एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठं यश मिळालेलं दिसत आहे. महाविकास आघाडीला 50 पेक्षा कमी जागांवर आघाडी मिळाली आहे तर शिवसेना शिंदे गट 58 जागांवर आघाडीवर आहे .
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : खानापूर मधून शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास बाबर आघाडीवर
सांगली – खानापूर मधून शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास बाबर पाचव्या फेरी 19 हजार 452 मतांनी आघाडीवर
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांना धक्का
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे संतूक हंबर्डे आघाडीवर
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे संतूक हंबर्डे आघाडीवर आहेत.
-
Anushakti Nagar Election Result 2024 : अणुशक्ती नगरमध्ये सना मलिक आघाडीवर , स्वरा भास्करचा पती फहाद अहमदला धक्का
अणुशक्ती नगरमध्ये चौथ्या फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सना मलिक आघाडीवर असून फाहाद अहमद हे पिछाडीवर आहेत.
सना मलिक (अजित पवार राष्ट्रवादी पक्ष)-10644 मतं
फाहाद अहमद (शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष)- 9253 मतं
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : जालना जिल्ह्यात भाजपचे तीन उमेदवार पुढे तर शिंदेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार आघाडीवर
जालना जिल्ह्यात भाजपचे तीन उमेदवार पुढे तर शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपचे संतोष दानवे,बबनराव लोणीकर आणि नारायण कुचे हे आघाडीवर आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि हिकमत उडान यांची आघाडी कायम.
-
Parli Election Result 2024 : धनंजय मुंडेंची तब्बल 22 हजार मतांची आघाडी
परळीमध्ये धनंजय मुंडे तब्बल 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत. देशमुख यांना मोठा फटका बसला आहे.
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : महायुती 188 जागांवर आघाडीवर तर मविआ अवघ्या 87 जागांवर आघाडीवर
भाजप 107 जागांवर आघाडीवर, शिवसेना 49 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर आहे. महायुती 188 जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी अवघ्या 87 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 31, शिवसेना ठाकरे गट 23 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 33 जागी आघाडीवर आहे.
-
Kudal Election Result 2024 : कुडाळमध्ये निलेश राणे आघाडीवर , वैभव नाईकांना मोठा धक्का
कुडाळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे हे 280 मतांनी पुढे आहेत. वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर गुहागरमधून भास्कर जाधव हे 7 हजार 700 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Shiwadi Election Result 2024 : शिवडीतून बाळा नांदगावकर पिछाडीवर
शिवडीतून मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अजय चौधरी हे आघाडीवर आहेत.
-
Ghatkopar Election Result 2024 : घाटकोपर पूर्व मधून पराह शाह आघाडीवर
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पराग शाह आघाडीवर आहेत.
पराग शाह – भारतीय जनता पक्ष – 12601
राखी जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 7427
-
Malbar hill Election Result 2024 : मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आघाडीवर
मलबार हिल मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मंगलप्रभात लोढा हे 7 हजारपेक्षा अधिक मतांनी पुढे आहेत. तर विलेपार्ले येथे भाजपचे पराग अळवणी हेही 1 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
-
Mahim Election Result 2024 : राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर; माहीममध्ये काय घडणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीममध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. ठाकरे गटाचे महेश सावंत हे माहीमध्ये आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाचे सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानावर आहेत.
-
AnushaktiNagar Election Result 2024 : अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा नवरा आघाडीवर, अजितदादा गटाला धोबीपछाड
अणुशक्तिनगर विधानसभेतून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद निवडणूक लढत आहेत. फहाद अहमद सध्या आघाडीवर असून अजितदादा गटाच्या सना मलिक या पिछाडीवर आहेत.
-
Vikroli Election Result 2024 : विक्रोळीमध्ये सुनील राऊत आघाडीवर
विक्रोळी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत सुनील राऊत आघाडीवर आहेत.
सुनील राऊत – 3800 मतं
सुवर्णा करंजे – 2712 मतं
विश्वजी ढोलम – 915 मतं
-
Ahilyanagar Election Result 2024 : अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप आघाडीवर, शरद पवार गटाला धक्का
अहिल्यानगरमध्ये तिसऱ्या फेरीत अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 9960 मतांनी आघाडीवर. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहेत.
तिसऱ्या फेरीत संग्राम जगताप यांना 6676 मतं तर अभिषेक कळमकर यांना 2941 मतं मिळाली आहेत.
-
Bandra Election Result 2024 : वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई आघाडीवर
वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई आघाडीवर आहेत. झिशान सिद्दीकी पिछाडीवर आहेत.
-
Achalpur Election Result 2024 : अचलपूरमध्ये बच्चू कडूंना धक्का, कोण आहे आघाडीवर ?
अचलपूर मतदारसंघात बच्चू कडूंना मोठा धक्का बसला आहे, ते पिछाडीवर आहेत. भाजपचे प्रवीण तायडे यांनी आघाडी घेतली आहे.
-
Mahim Election Result 2024 : माहीममध्ये अमित ठाकरेंना धक्का, कोण आघाडीवर ?
माहीम मतदारसंघात तिरंगी लढत असून मनसेचे अमित ठाकरेंना धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे आघाडीवर आहेत.
अमित ठाकरे – 2 हजार 156 मतं
महेश सावंत – 2हजार 142 मतं
सदा सरवणकर – 2 हजार 270 मतं
-
Mankhurd Election Result 2024 : नवाब मलिक यांचे काय होणार, पहिल्या फेरीत तिसऱ्या क्रमांकावर
मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात नवाब मलिक प्रचंड धक्का बसला आहे. ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अबू आझमी यांना 3884, अतिक खान (MIM) यांना 3617 मते मिळाली आहेत. तर नवाब मलिक यांना फक्त 461 मते मिळाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : भुजबळ कुटुंबाला मोठा धक्का, काका-पुतणे दोघेही पिछाडीवर
भुजबळ कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. येवल्यातून छगन भुजबळ हे पिछाडीवर आहेत. तर त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे नांदगावमधून पिछाडीवर आहेत. दुसऱ्या फेरी अखेरीस शिंदे गटाचे सुहास कांदे 8200 मते घेऊन आघाडीवर आहेत. त्यामुळे भुजबळ कुटुंबात चुळबुळ निर्माण झाली आहे.
-
Shirol election Result 2024 : शिरोळमध्ये अपक्ष राजेंद्र यड्रावर आघाडीवर
शिरोळ मतदारसंघात अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावर हे आघाडीवर आहेत. त्यांना 6700 मतांची आघाडी मिळाली आहे.