AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीतून लढणार की नाही? काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

निवडणुका दसऱ्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी सगळ्याच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधनी सुरु आहे. निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी प्रचार जोरात सुरु आहे. आज राष्ट्रवादीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार काय म्हणाले जाणून घ्या.

बारामतीतून लढणार की नाही? काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 11, 2024 | 7:21 PM
Share

अभिनेते सय्याजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘महायुतीचे मतदारसंघ कुणाला मिळणार हे जाहीर झालं नाही. बारामती आमच्याकडे आली तर पटेल यांनी सांगितलेली अंमलबजावणी केली पाहिजे. पण बारामती आमच्याकडे आला पाहिजे. आम्ही महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेऊन कुणाला मतदारसंघ दिले वगैरे त्याची माहिती देऊ. सिन्नरचे लोकं आग्रह करत आहेत. प्रत्येक कार्यकर्ता प्रेमापोटी बोलत असतो. आमदारांनी मागणी केली. बारामतीत असताना कार्यकर्त्यांनी तीव्र भावना बोलून दाखवल्या. राजकारणात आम्ही लोकशाहीला महत्त्व देतो. बहुमताचा आदर करावा लागतो. अनेकदा कार्यकर्त्यांचं ऐकावं लागतं. त्यांच्याही म्हणण्याला मान सन्मान द्यावा लागतो.’

निवडणुका पाहून काम नाही

अजित पवार पुढे म्हणाले की, मी, अनेक वर्ष भुजबळांनी जास्त काळ मंत्रिमंडळात काम केलं आहे. शेवटी काही असलं तरी त्या विभागाला काय वाटतं ते तो विभाग करतो. ओव्हररूल करण्याचा अधिकार कॅबिनेटला आहे. विभागत तिथे बसून निर्णय घेतो. कॅबिनेट चांद्यापासून बांद्यापर्यंतचा निर्णय घेते. काही निर्णय गरीब आणि वंचितांसाठी घ्यावे लागतात. निवडणुका आल्या म्हणून तुम्ही म्हणता. त्यांनी त्यांचं काम केलं. कॅबिनेटने कॅबिनेटचं काम केलं आहे.’

निंबाळकर यांच्यासोबत चर्चा सुरु

या आर्थिक वर्षात दोन महिने लोकसभेच्या आचारसंहिता. दोन महिने विधानसभेच्या. आचारसंहिता ३५ दिवसाची असली तरी काही वेळ जातो. या सर्वांचा विचार करून अर्थ संकल्प सादर केला. उद्याच्या काळात या निवडणुका झाल्यावरही व्यवस्थितपणे राज्याचा आर्थिक गाडा पुढे नेण्यात आम्ही यशस्वी होऊ. रामराजे नाईक निंबाळकरांशी मी, पटेल, तटकरे बोललो. आम्ही सर्व चर्चा करत आहोत. बातम्या येत असतात. अनेकांबद्दल येतात. त्यांनाही माहीत नसतं बातम्या कशा आल्या. पण निंबाळकर यांनी अजून कोणताही निर्णय घेतला नाही. असं ही अजित पवार म्हणाले.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....