AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान तिकिटाचा दर कमी होणार, ATF वरील व्हॅट कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

ATF VAT Cut : हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून एटीएफवरील व्हॅटमध्ये 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विमान तिकिटाचा दर कमी होणार, ATF वरील व्हॅट कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
ATF VAT CutImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 15, 2026 | 5:04 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील यु्द्धामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या काही काळापासून विमान प्रवासही महागला आहे. अशातच आता हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून एटीएफवरील व्हॅटमध्ये 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील 16 विमानतळांवरून प्रवास करणार्‍या 75 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे.

विमानाच्या इंधनावरील कर कपात

समोर आलेल्या माहितीनुसार, विमान कंपन्यांकडून व्हॅट कमी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्यात आले होते. त्यानंतर केंद्राकडून अधिक प्रमाणात व्हॅट आकारणाऱ्या राज्यांना हा कर कमी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा व्हॅट 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून विमान इंधनावरील कर कमी केल्याने राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होणार आहे. कारण महाराष्ट्रात 16 विमानतळे असून, देशातील सर्वाधिक वार्षिक हवाई प्रवासी वाहतूक महाराष्ट्रातून केली जाते. दरवर्षी सुमारे 7.5 कोटी प्रवासी हवाई प्रवास करतात, तर दररोज सुमारे 2 लाख प्रवासी विमानसेवेचा वापर करतात. व्हॅटमध्ये करण्यात आलेली ही कपात राज्यातील सर्व विमानतळांवरील उड्डाण संचालनाला मदत करणार आहे. मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा फायदा होणार आहे. जागतिक स्तरावरील आव्हानांमुळे विमान भाड्यात वाढ होण्याचा दबाव असतानाही, या निर्णयामुळे विमान तिकिटांचे दर नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.

राम मोहन नायडू यांनी मानले आभार

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. नायडू यांनी म्हटले की, विमान वाहतूक उद्योगातील एक महत्त्वाचा खर्च म्हणजे एटीएफवरील व्हॅट, जो राज्य सरकारांकडून आकारला जातो. नागरी विमान वाहतूक मंत्रालय गेल्या काही काळापासून, विशेषतः या संकटाच्या काळात, राज्य सरकारांशी हा व्हॅट कमी करण्यासाठी सातत्याने चर्चा करत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी पुढाकार घेत आजपासून एटीएफवरील व्हॅट 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय जाहीर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

Follow Us
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार