AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहि‍णींना दणका; फडणवीस सरकारने आर्थिक चणचणीमुळे घेतला मोठा निर्णय

ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. सरकारने 100 कोटींची तरतूद असलेली योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लाडक्या बहि‍णींना दणका; फडणवीस सरकारने आर्थिक चणचणीमुळे घेतला मोठा निर्णय
devendra fadnavis
| Updated on: Jul 17, 2026 | 7:43 AM
Share

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली होती. सरकारने घेतलेल्या या निर्णयाची चर्चा असताना आर्थिक चणचणीमुळे आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयाने लाडक्या बहि‍णींना मोठा दणका बसला आहे.

योजना आर्थिक चणचणीमुळे बंद 

एकनाथ शिंदे यांची योजना आर्थिक चणचणीमुळे ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ सुरू करण्यात आली होती. मात्र, ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी काढल्याची माहिती हाती आली आहे.

योजनेमागचा हेतू काय होता?

माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत जून २०२३ मध्ये या मोफत साडी योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली एक साडी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी भेट म्हणून दिली जात होती. तसेच या योजनेमागचा दुसरा हेतू देखील होता. या योजनेच्या माध्यमातून यंत्रमाग क्षेत्राला चालना देणे आणि गरीब कुटुंबांना वस्त्र पुरवणे, असा दुहेरी हेतू असल्याचंही माहिती दिली होती.

साड्यांसाठी केली होती 100 कोटींची तरतूद

राज्यात 25 लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ही साडी दिवाळीत वितरीत करण्यात येत होती. या योजनेसाठी जवळपास वार्षिक 100 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून 2023, 2024, 2025 अशी सलग तीन वर्षे साड्यांचे वितरण करण्यात आले होते. यंदा ही योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी साडीचे वितरण केले जाणार नाही, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. योजनेचा आर्थिक भार लक्षात घेऊन योजना बंद करण्यात आल्याचेही सांगण्यात आलं आहे. आता यावर अधिकृतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागंल आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ