AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मेगाभरती… 1 लाखाहून अधिक लोकांना देणार सरकारी नोकऱ्या; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

येत्या महिन्याभरात 19 हजार 853 अर्जदारांना नियुक्ती पत्र दिली जातील, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्रात मेगाभरती... 1 लाखाहून अधिक लोकांना देणार सरकारी नोकऱ्या; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
देवेंद्र फडणवीसांची सरकारी नोकऱ्यांबद्दल मोठी घोषणा
| Updated on: Jul 01, 2024 | 4:37 PM
Share

Maharashtra Government Jobs : राज्य सरकारद्वारे तब्बल 1 लाख 8 हजार नोकर भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 57 हजार 452 अर्जदारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर येत्या महिन्याभरात 19 हजार 853 अर्जदारांना नियुक्ती पत्र दिली जातील, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे महाराष्ट्रात मेगाभरती सुरु असल्याचे बोललं जात आहे.

अतिशय पारदर्शी पद्धतीने परीक्षा

महाराष्ट्रात नवीन शासन आल्यानंतर ऑगस्ट 2022 पासून आम्ही पदभरती सुरु केली होती. राज्य सरकारकडून 75 हजार नवीन पद भरण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. आम्ही ही भरती सुरु केली. याबद्दल परीक्षा घेतल्या आणि अतिशय पारदर्शी पद्धतीने या परीक्षा पार पडल्या. अमरावतीत घडलेली घटना सोडली आणि तलाठी परीक्षेत पेपर चुकला, तो परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला, या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शी पद्धतीने ही परीक्षा पूर्ण झाली. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात आमच्या शासनाने एक अतिशय चांगला रेकॉर्ड तयार केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारकडून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण

आतापर्यंत ऑगस्ट 2022 नंतर 57 हजार 452 तरुणांना आम्ही नियुक्तीपत्र दिले आहे. या व्यतिरिक्त ज्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना या सव्वा महिन्यात किंवा महिन्याभरात नियुक्तीपत्र दिले जाईल, अशी संख्या 19 हजार 853 इतकी आहे. आम्ही 75 हजार भरतीची घोषणा केली होती, त्याऐवजी आम्ही 77 हजार 305 लोकांना सरकारी नोकरी दिली आहे. तसेच याबद्दलची सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. याबद्दलचे नियुक्ती पत्रही देण्यात आले आहे. तर काहींना दिले जात आहे.

1 लाख 8 हजार नोकऱ्या

यासोबतच आता जे शेवटच्या टप्प्यात आहेत, अशी एकूण 31 हजार 201 पदं आहेत. ज्याची प्रक्रिया येत्या 3 महिन्यात पूर्ण करु. म्हणजे जवळपास 1 लाख 8 हजार नोकऱ्या अडीच वर्षाच्या काळात सरकार देत आहे. महाराष्ट्रातील तरुणाईला दोन वर्षाच्या काळात एक लाख नवीन नोकऱ्या पारदर्शी पद्धतीने देण्याचा नवा विक्रम हा महाराष्ट्र सरकारने केला आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...