महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेना-भाजपला जोरदार टक्कर, मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर झेंडा

| Updated on: Jan 18, 2021 | 3:37 PM

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीत सातपैकी मनसेचे चार सदस्य विजयी झाले (Ambernath Kakoli Gram Panchayat MNS)

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेना-भाजपला जोरदार टक्कर, मनसेचा या ग्रामपंचायतीवर झेंडा
राज ठाकरे
Follow us on

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 14 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावून सुरुवात झाली आहे. अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीत मनसेचा सरपंच विराजमान होणार आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पॅनलचा धुव्वा उडवत मनसेने बाजी मारली. अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीत सातपैकी मनसेचे चार सदस्य विजयी झाले. (Ambernath Kakoli Gram Panchayat Election MNS victory)

दुसरीकडे, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीवरही मनसेचा झेंडा फडकला. सातपैकी मनसेचे सहा उमेदवार विजयी झाले. तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील खैरी सावंगी वाढोणा गट ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे सातपैकी सात उमेदवार निवडून आले.

आपले ‘मनसे’ अभिनंदन! ?✌️?

घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील ०७ पैकी ०४ सदस्य विजयी! #RajThackeray #MNS #मनसेवृत्तांत

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Sunday, 17 January 2021

मनसेची पाटी पुन्हा कोरी?

यापूर्वी राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मनसेचे पानिपत झाले होते. तेव्हापासून मनसे सुस्तावलेली होती. मात्र, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीपासून राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले होते. मात्र, त्या निवडणुकीतही मनसेचा फारसे यश मिळाले नव्हते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मनसेची पाटी कोरीच राहण्याची शक्यता आहे. (Ambernath Kakoli Gram Panchayat Election MNS victory)

शिवसेनेची राज्यभरात जोरदार घौडदौड

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला महाविकासआघाडीने एकत्र निवडणूक लढवल्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार महाविकासआघाडीत शिवसेना सर्वाधिक 714 ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनाप्रणित पॅनेल्सनी बाजी मारली आहे. भाजपने शिवसेनेला कांटे की टक्कर दिली आहे. 678 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा झेंडा फडकला.

संबंधित बातम्या : 

राज ठाकरे म्हणाले ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवा; पण मनसेचं इंजिन धावलंच नाही

मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती: नारायण राणे

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | काँग्रेसच्या गडावर अब्दुल सत्तार यांची धडक, पालोद ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा झेंडा

(Ambernath Kakoli Gram Panchayat Election MNS victory)