AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra HSC Result 2026 Updates : प्रतीक्षा संपणार, लवकरच लागणार 12 वीचा रिझल्ट; निकालाबाबत मोठी अपडेट समोर, कसा कराल चेक ?

Maharashtra HSC Result 2026: महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली असते. यंदा या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांची रिझल्टची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण एचएससी रिजल्ट 2026 जाहीर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यासदंर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

Maharashtra HSC Result 2026 Updates : प्रतीक्षा संपणार, लवकरच लागणार 12 वीचा रिझल्ट;  निकालाबाबत मोठी अपडेट समोर, कसा कराल चेक ?
12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट
| Updated on: Apr 27, 2026 | 11:27 AM
Share

वर्षभर मान मोडून अभ्यास केला, परीक्षाही दिली आता वेध लागलेत ते निकालाचे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) लेखा परीक्षा आयोजित करण्यात येते. 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून निकाल कधी लागणार हे जाणून घेण्यास सर्वच विद्यार्थी अधीर झाले आहेत. याच 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मोठी अपडेट समोर आली आहे. हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच एचएससी (HSC) निकाल 2026 जाहीर करण्याच्या तयारीत आहे. हा निकाल डिजीलॉकरवर (DigiLocker) देखील जाहीर करण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे.

विशेष म्हणजे मंडळाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासण्याची लिंक सक्रिय केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी आपले गुण जाणून घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

वेबसाईट आणि डिजीलॉकर वर चेक करता येणार निकाल

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांतच, मे महिन्याचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात 12 वीच्या परीक्षेचा निकाल लागू शकतो. निकालीच तारीख लवकरच जाहीर होईल आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना निकाला पाहता येऊ शकेल. यंदा विद्यार्थी दोन माध्यमांद्वारे आपला निकाल तपासू शकतील : पहिलं म्हणजे मंडळाची अधिकृत वेबसाइट आणि दुसरा पर्याय म्हणजे, डिजीलॉकर. हा निकाल चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आवश्यक लॉगिन तपशील वापरावा लागेल. डिजीलॉकरवरून डिजिटल गुणपत्रिका देखील डाउनलोड करता येतील, ज्या भविष्यात वापरण्यासाठी वैध ठरतील.

रिझल्टपूर्वीची अंतिम तयारी

निकाल जाहीर करण्यापूर्वी मंडळाकडून डेटा अपलोड आणि तांत्रिक तपासणी पूर्ण करण्यात येत आहे. त्यानंतर एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची तारीख आणि वेळ निश्चित केली जाईल. यावर्षी महाराष्ट्र बोर्डाची एचएससी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते आणि आता ते त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत.

असा चेक करा तुमचा रिझल्ट

– HSC रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

– तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा.

– ते सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

– तुमची मार्कशीट डाऊनलोड करा

– निकाल चेक करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की त्यांनी आपलं प्रवेशपत्र तयार ठेवावं आणि अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासावी, कारण निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो.

या वेबसाईट्सवर पाहता येईल निकाल

12 वीचे विद्यार्थी हे खाली दिलेल्या वेबसाईट्सवर निकाल तपासू शकतील.

1) mahresult.nic.in

2) hscresult.mkcl.org

3) results.digilocker.gov.in

4) mahahsscboard.in

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप