ऐसी धाकड है! वयाच्या विसाव्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर, कोल्हापूरच्या लेकीची कमाल, कस्तुरी सावेकरवर कौतुकाचा वर्षाव…

ऐसी धाकड है! वयाच्या विसाव्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर, कोल्हापूरच्या लेकीची कमाल, कस्तुरी सावेकरवर कौतुकाचा वर्षाव...
कस्तुरी सावेकर
Image Credit source: TV9

कोल्हापुरातल्या मंगळपेठेत राहणारी कस्तुरी दीपक सावेकर हिने नुकतंच एव्हरेस्ट शिखर सर केलंय. सर्वसामान्य कुटुंबातील या मुलीने कोल्हापूर आणि राज्यातच नाही तर देशाचं नाव उंचावलय.

भूषण पाटील

| Edited By: आयेशा सय्यद

May 17, 2022 | 4:56 PM

कोल्हापूर : उंच उंच डोंगरात जावं. डोंगररांगात भटकावं असं अनेकांना वाटतं. एव्हरेस्ट शिखर सर करावं ही तर तमाम ट्रेकर्सच्या मननातील सुप्त इच्छा. काहीजण ही इच्छा मनोमन पूर्ण करतात. तर काही जण प्रत्यक्ष एव्हरेस्टवरचा बर्फ तुडवत पूर्ण करतात. या दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या कोल्हापूरच्या (Kolhapur) कस्तुरी सावेकरवर (Kasturi Savekar) सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. कस्तुरी सावेकर हिने नुकतच जगातील सर्वात उंच एवरेस्ट शिखर सर (Everest Climbing) केलंय. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कठीण आर्थिक परिस्थितीवर मात करत तिने हे यश मिळवलंय. मात्र असं असलं तरी तिच्या यशानंतरही तिच्या कुटुंबीयांसमोरील आर्थिक आव्हानांचा डोंगर संपलेला नाही. एवरेस्ट सर केलेल्या कस्तुरीला अजून नाही तीन बाबतीत अडथळ्यांची शर्यत पार करावे लागतीये.

कस्तुरी सावेकरची ‘एव्हरेस्ट’ला गवसणी

कोल्हापुरातल्या मंगळपेठेत राहणारी कस्तुरी दीपक सावेकर हिने नुकतंच एव्हरेस्ट शिखर सर केलंय. सर्वसामान्य कुटुंबातील या मुलीने कोल्हापूर आणि राज्यातच नाही तर देशाचं नाव उंचावलय. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तिने जगातील सर्वात उंच आणि आव्हानात्मक असलेले एव्हरेस्ट शिखर सर करत तिथं भगवा आणि तिरंगा ध्वज फडकावलाय. तिच्या या कामगिरीमुळे तिच्या आई वडिलांच्या उर अभिमानाने भरून आलाय.

लहानपणापासून ट्रेकिंग,स्केटिंग घोडेसवारी याची आवडलेल्या कस्तुरी वयाच्या बाराव्या वर्षी आपण एव्हरेस्ट सर करायचा हा चंग बांधला होता. मेकॅनिक असलेल्या तिच्या वडिलांनी देखील तिच्या या स्वप्नाला पाठबळ दिलं. आर्थिक परिस्थिती नसताना प्रसंगी मित्रांकडून मदत घेतली पत्नीचे दागिने विकले पण कस्तुरी स्वप्नात खंड पडू दिला नाही…एकाच हंगामात तीन उंच शिखर सर करायची असा चंग बांधून यावर्षी मार्च महिन्यात कस्तुरी घराबाहेर पडली.. पहिलं अन्नपूर्णा शिखर सर करण्यासाठी जाण्याआधी तिने आई-वडिलांना शेवटचा कॉल केला होता… हा सर्व अनुभव सांगताना आज तिच्या आई-वडिलांचे डोळे आपोआपच पाणावतात.

एव्हरेस्ट सर केलं पण अडचणाींचा डोंगर कायम

आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आता कस्तुरी ने एव्हरेस्ट शिखर सर केले असले तरी या सगळ्याचं आर्थिक गणित सांभाळताना तिच्या कुटुंबीयांचे आजही होरपळ होतेय. या सगळ्या मोहिमांचा लाखोंचा खर्च तिच्या कुटुंबीयांसाठी आवाक्याबाहेरचा आहे. एकाच हंगामात तीन शिखर पार करायची बाहेर पडलेली कस्तुरी आज फक्त पैशांअभावी अन्नपूर्णा आणि एव्हरेस्ट हे दोनच शिखर पार करून परतीच्या प्रवासाला लागलीय.लोटसे हे आणखी एक शिखर पार करण्याचं तिचं स्वप्न या वर्षी तरी पूर्ण होऊ शकणार नाहीये.. इतकच नाही तर एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर हे ही तिची अडथळ्यांची शर्यत संपलेली नाही.. कारण यास पैशांअभावी एव्हरेस्ट बेस कॅम्प ते लुकला पर्यन्त चा 75 किलोमीटर चा प्रवास तिला चालत करावा लागतोय. शिवाय ऐवरेस्ट चढाईसाठीची पूर्ण रक्कम ही आजून तिच्या आई वडिलांना भरता आलेली नाही. सर्व प्रयत्न करूनही ही व्यवस्था होत नसल्यान त्यांनी आता tv9 च्या माध्यमातून समाजातील दानशूरांच मदतीच आव्हान केलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें