AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून कोण जाणार विधान परिषदेत? हालचालींना वेग, 30 नावांची यादी दिल्ली दरबारी…

BJP : भाजपकडून विधान परिषदेवर कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 6 जागांसाठी अनेकजण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. आता 30 जणांची नावे दिल्लीला पाठवली असल्याचे समोर आले आहे.

भाजपकडून कोण जाणार विधान परिषदेत? हालचालींना वेग, 30 नावांची यादी दिल्ली दरबारी...
BJP NamesImage Credit source: Google
| Updated on: Apr 23, 2026 | 11:23 PM
Share

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. त्यामुळे आता भाजपकडून विधान परिषदेवर कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 6 जागांसाठी अनेकजण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपकडून हालचालींना वेग

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला 30 जणांची यादी पाठवली आहे. यात काही माजी आमदार-खासदारांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

30 जणांची नावे दिल्लीला पाठवली

भाजपच्या 30 जणांच्या यादीत माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी या नेत्यांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असं बोललं जात आहे. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनीही भाष्य केले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आमचं काही म्हणणं नाही. पण त्याबरोबरच पुढील राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजे. उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे. याबाबत आमची आज प्रदेशाध्यक्षांची चर्चा झाली ते उद्धवजींना भेटून आले, आमच्या आघाडीत समन्वय राहावा या दृष्टीने हे निर्णय होणे अपेक्षित आहे ती चर्चा आम्ही करतोय.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच