AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना समर्थन आहे पण… विधानपरिषद निवडणुकीवर काँग्रेसची मोठी अट, वडेट्टीवार म्हणाले…

MVA MLC Election Candidate : आगामी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. अशातच आता काँग्रेसने याबाबत समोर एक अट ठेवली असल्याचेही समोर आले आहे.

उद्धव ठाकरेंना समर्थन आहे पण... विधानपरिषद निवडणुकीवर काँग्रेसची मोठी अट, वडेट्टीवार म्हणाले...
MVA MLC CandidateImage Credit source: Google
| Updated on: Apr 23, 2026 | 7:18 PM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. 10 जागांसाठी लवकरच निवडणूक पार पडणार आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून विधान परिषदेवर कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच आता या एका जागेबाबत काँग्रेसने मोठं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरेंना समर्थन आहे पण…

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असं बोललं जात आहे. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनीही भाष्य केले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आमचं काही म्हणणं नाही. पण त्याबरोबरच पुढील राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजे. उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे. याबाबत आमची आज प्रदेशाध्यक्षांची चर्चा झाली ते उद्धवजींना भेटून आले, आमच्या आघाडीत समन्वय राहावा या दृष्टीने हे निर्णय होणे अपेक्षित आहे ती चर्चा आम्ही करतोय.

उद्धव ठाकरे विधानपरिषदेत जात असतील तर आनंद – सपकाळ

आज दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर सपकाळ म्हणाले की, महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून आमच्यात संवाद झाला. भविष्यातील आव्हानांवरही आम्ही चर्चा केली. येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि विधानपरिषदेविषयी निर्णय घेतला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत आमची भूमिका तुमच्या सर्वांसमोर आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून आमची हीच भूमिका राहिलेली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आम्हाला उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत. ते विधानपरिषदेत जात असतील तर आम्हाला आनंदच आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप