AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाची चर्चा; भविष्यात काय होणार?

विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाची आता सगळकीकडे चर्चा होत आहे.

उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाची चर्चा; भविष्यात काय होणार?
harshwardhan sapkal and uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2026 | 7:18 PM
Share

Vidhan Parishad Election : सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे. राज्यात एकूण 9 जागंसाठी निवडणूक होणार असून 12 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यावी, यासाठी सर्वच पक्षांत खल सुरू आहे. महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून खलबतं सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, अशीच भूमिका महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसची आहे. असे असतानाच आता सपकाळ यांनी ठाकरेंच्या भेटीनंतर सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

तिन्ही पक्ष एकत्र बसतील त्यानंतर…

महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून आमच्यात संवाद झाला. या पार्श्वभूमीवर आमची चर्चा झाली. भविष्यातील आव्हानांवरही आम्ही चर्चा केली. आजची राजकीय परिस्थिती, भूतकाळातील निर्णय यांचे सिंहावलोकन झाले. येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि विधानपरिषदेविषयी निर्णय घेतला जाईल,, असे सपकाळ यांनी सांगितले.

ते विधानपरिषदेत जात असतील तर आनंदच आहे

तसेच, उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत आमची भूमिका तुमच्या सर्वांसमोर आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून आमची हीच भूमिका राहिलेली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आम्हाला उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत. ते विधानपरिषदेत जात असतील तर आम्हाला आनंदच आहे. आम्ही याबाबत अगोदरच सांगितलेले आहे, असेही सपकाळ यावेळी म्हणाले.

सुप्रिया सुळे यांचेही ट्वीट

विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत आम्ही या बैठकीत चर्चा झाली नाही. भविष्यात कशी वाटचाल राहिली पाहिजे, यावर आम्ही चर्चा केली. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविषयी मी भाष्य करणे योग्य नाही. त्यांच्या उमेदवारीबाबत तेच बोलतील, असे बोलत काँग्रेसही उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत अनुकूल असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. दरम्यान, याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ट्वीट करत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच