मोठी बातमी! राज्यातील पहिल्या महापालिकेचा निकाल हाती, भाजपचा मोठा विजय, त्सुनामीत विरोधकांचा सुपडासाफ
मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणूक निकालांमध्ये पुन्हा एकदा राज्यात भाजपची लाट पहायला मिळत आहे. राज्यातील पहिल्या महापालिकेचा निकाल हाती आला असून, भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीमध्ये देखील भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे. गेल्यावेळी 27 महापालिकांपैकी 17 महापालिकेत भाजपची सत्ता होती, मात्र यावेळी 29 महापालिकांपैकी तब्बल 26 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या सारख्या राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळताना दिसून येत आहे. मुंबईमध्ये भाजप शिवसेना युतीने ठाकरे बंधूंंना जोरदार धक्का दिला आहे, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला पराभवाची धूळ चारली आहे. अजूनही काही जांगाचे निकाल येणं बाकी आहे. मात्र जालना महापालिका निवडणुकीचा निकाल लागला असून, या महापालिकेत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
जालन्यामध्ये ही महापालिकेची पहिलीच निवडणूक आहे, राज्यात दोन नव्या महापालिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये एक जालना आणि दुसरी इचलकरंजी. जालन्यात पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होत असल्यानं सर्वाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. जालन्यात शिवसेना शिंदे गटाचं भाजपासमोर तगडं आव्हान होतं. मात्र भाजपनं या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका दिला आहे, या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांना मोठा झटका बसला आहे.
Municipal Election 2026
Maharashtra Election Results 2026 : अजित पवारांकडे फडणवीसांचे थेट दुर्लक्ष
Mumbai Nagarsevak Election Results 2026 : रवींद्र चव्हाण यांनी विजयाचे श्रेय थेट दिले...
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 48 मधून काँग्रेसचे उमेदवार रफिक इलियास शेख आघाडीवर
सातारकरांनी अनुभवली खासदार उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांची मैत्री
पुण्यात रवींद्र धंगेकरांना धक्का, पत्नी पराभूत
जालना महानगरपालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. जालना महानगर पालिकेत 65 जागांपैकी भाजपने स्वबळावर 41 जागेवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाला जालना महापालिकेत अवघ्या 12 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान भाजपने विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली असून,जनतेने भरभरून मते दिली, त्याबद्दल जनतेचे आभारी आहोत, आणि जालना महानगर पालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर होणार असल्याचे मत भाजप नेत्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
राज्यात भाजपची लाट
दरम्यान जालनाच नाही तर संपूर्ण राज्यभरात भाजपची लाट पहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, पिंपंरी चिंचवड, नाशिक, सांगली अशा अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
