BIG BREAKING: अखेर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार, कधी? शरद पवार गटाच्या आमदाराचाच मोठा खुलासा

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी तात्पुरती युती केल्यानंतर त्यांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली. अजित पवार गट आणि शरद पवार गट लवकरच एकत्र विलीन होणार आहेत असा दावा शरद पवार गटातील आमदाराने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

BIG BREAKING: अखेर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार, कधी? शरद पवार गटाच्या आमदाराचाच मोठा खुलासा
दोन्ही राष्ट्वरादी काँग्रेस पक्ष मर्ज होणार, आमदाराच्या विधानाने खळबळ
Image Credit source: social media
| Updated on: Jan 28, 2026 | 9:19 AM

महापालिका निवडणुकांमध्ये अनेक पक्षांनी युती करत निवडणूक लढवली. अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यात आघाडीवर होता. पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक ठिकाणी काक-पुतण्याने एकत्र येत निवडणूक लढवली. त्याचा त्यांना किती फयाद झाला, हा भाग वेगळा असला तरी त्यांच्या या तात्पुरत्या युतीमुळेही बरीच कुजबूज झाली. साधारण तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे बाहेर पडून महायुतीत आले. त्यानंतर महाराष्ट्राच फुटीचं राजकारण सुर होतंच. शिंदे यांच्यानंतर काही काळाने राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शकलं झालं, अजित पवारांनी काकांचा हात सोडला आणि तेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत घेऊन महायुतीत आले. या फुटीमुळे अनेकांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट, असे दोन गट पडले.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही पक्षांच्या पुन्हा येण्याची चर्चा सुरू झाली. महापालिका निवडणुकीत तर त्यांची तात्पुरती युतीही झाली. इतके दिवस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे दोन्ही राष्ट्रवादीतले नेते, या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र दिसले. त्यामुळे काका-पुतण्याचं पुन्हा मनोमिलन होणार का, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबद्दलही चर्चा सुरू झाल्या. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कधी येणार, त्यांचं विलीनीकरण कधी होणार याबाबतच ही मोठी अपडेट समोर आली आहे. खुद्द शरद पवार गटाच्या आमदारानेच हा मोठा खुलासा केला.

दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार, कधी ?

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मर्ज होणार, त्यांचं विलीनकरण होणार असं मोठ विधान राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केलं आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. ” स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्हीही राष्ट्रवादीची युती झाली. आतली गोष्ट सांगतो, बारामतीत अजित दादांसोबत आमची बैठक झाली. त्यावेळी जिल्ह्यातील चार आमदार आणि एक खासदारासह दोन्ही राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख बैठकीला उपस्थित होतो. तीन महिन्यांमध्ये निवडणुका होत असल्यामुळे आम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्याची घोषणा करता आली नाही. त्या बैठकीत अजित पवारांनी (विलीनकरणाचं) असं विधान केलं” असा दावा राजू खरे यांनी केला आहे.

आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार

” स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कुठे घड्याळ आणि कुठे तुतारी घेऊन निवडणूक चालवा. आपण एकत्रित निवडणूक लढवू या, असं पवार साहेब आणि अजित दादांचा निर्णय झाला. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर अधिकृतपणे पवार कुटुंबियांकडून घोषणा होईल असं राजू खरे म्हणाले. शरद पवार साहेबांची तुतारी आणि पक्ष अजित पवार यांच्या पक्षात मर्ज होईल. त्यानंतर आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार आहे, असंही विधान त्यांनी केलं. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून मोहोळ तालुक्याचा निधी मलाच मिळणार. शिवाय मी एकनाथ शिंदे यांचा खास माणूस आहे. त्यामुळे मला दुधाबरोबर त्यात टाकून तूपही मिळणार आहे. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राजन पाटील यांचा दारुण पराभव करणार . मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांचा टांगा पलटी करणार. त्यांचा घोडा एकीकडे जाणार अन टांगा एकीकडे जाणार” , असं मोठं वक्तव्य मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केलं आहे. दोन्गी राष्ट्रवादीच्या विलीनकरणााच्या त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.