Maharashtra News LIVE : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरूवात..
Maharashtra News Live Update : महाराष्ट्राच्या राजकारणात आज दोन महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकाबाजूला विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातून 6 खासदार फुटल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडून स्वतंत्र गट स्थापनेसाठी दिल्लीत हालचाली सुरु आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
अपक्ष उमेदवार गोकुळ गीते माध्यमांशी न बोलता घरातून बाहेर
विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान, महायुतीकडून नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार. गोकुळ गीते यांच्या माघारी नंतर आज मतदानाच्या दिवशी गोकुळ गीते यांच्या घरी शुकशुकाट. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला होता मात्र पाठिंबा न दिल्यामुळे आज मतदार कुणाला कौल देणार यासंदर्भात देखील नाशिक मध्ये चर्चांना उधाण
-
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
येवला तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ५ वर मतदान प्रक्रिया सुरू. एकूण ८८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क. येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांचे पहिले मतदान. नरेंद्र दराडे यांच्या होमपीचवर कडेकोट पोलीस बंदोबस्त. नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते यांच्यात रंगणार चुरशीची लढत…
-
-
मालेगावात विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू..
मालेगावातील निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त. मालेगावात एकुण 84 मतदार. इस्माल पार्टीचे – 35, स.पा – 5, भाजप -2, सेना शिंदे – 18, आय एम आय एम – 21, काँग्रेस – 3. मालेगावातील भाजपचे नेते प्रसाद हिरे, गोकुळ गीते यांचेही नावे मतदान बॅलेट वर असल्याने मतदार कोणाला पसंती देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.. मालेगावातील महत्वाचा असलेला इस्माल पार्टी, सपा आणि AIMIM यांची भूमिका महत्वाची असेल..
-
विधान परिषद निवडणुकीत जळगाव शहरातील मतदान केंद्रावर मतदानासाठी सकाळीच मतदार नगरसेवक रांगेत उभे
सकाळी आठ वाजताच मतदानाला सुरुवात होताच मतदार नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. जळगाव शहरातील तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. काही वर्षानंतर बॅलेट पेपरवर निवडणूक पार पडत असल्याने वेगळी उत्सुकता मतदानाची असल्याची नगरसेवकांची प्रतिक्रिया. उन्हाचा तडाखा असल्यामुळे सकाळीच मतदानासाठी आल्याच्या नगरसेवकांच्या प्रतिक्रिया..
-
गोंदिया-भंडारा विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू
गोंदिया-भंडारा स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे…. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे…. या निवडणुकीत एकूण 457 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी भंडारा, साकोली, गोंदिया आणि सडक-अर्जुनी येथे चार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे….
-
-
सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी खेळी..
सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत बार्शीतील ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांचे नगरसेवक रात्रीपर्यंत आमच्या संपर्कात होते. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांचे नगरसेवक आम्हालाच मतदान करणार असल्याचा दावा भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या बंधूंनी केला. राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील एकानेही विरोध केला नाही महाविकास आघाडीचे चार आमदारांनी आम्हाला जाहीरपणे पाठिंबा दिला. त्यामुळे सोलापूर विधान परिषदेत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजय निश्चित आहे. राजेंद्र राऊत बार्शी सह सोलापूर जिल्ह्याचा विकास करू शकतात त्यामुळे सर्वांनी पाठिंबा दिला. राजेंद्र राऊत हे 500 पेक्षा अधिक मतांनी विजयी होतील असा आमचा दावा आहे, असे विजय राऊत यांनी म्हटले.
-
गोकुळ गीते यांच्या घरी शुकशुकाट
अपक्ष उमेदवार गोकुळ गीते माध्यमांशी न बोलता घरातून बाहेर. विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान, महायुतीकडून नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार. गोकुळ गीते यांच्या माघारी नंतर आज मतदानाच्या दिवशी गोकुळ गीते यांच्या घरी शुकशुकाट. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला होता. मात्र पाठिंबा न दिल्यामुळे आज मतदार कुणाला कौल देणार यासंदर्भात देखील नाशिक मध्ये चर्चांना उधाण.
-
वंचित आघाडीचे लातूर पालिकेतील नगरसेवक सकाळी 11 नंतर घेणार निर्णय
वंचित आघाडीचे लातूर महानगर पालिकेतील नगरसेवक सकाळी 11 नंतर घेणार निर्णय. वंचितचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून घेणार निर्णय. मतदान करण्यासंबंधी करणार चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तटस्थ राहण्याची लातूर मधील वंचितच्या नगरसेवकांची भूमिका. लातूर महानगर पालिकेत आहेत वंचितचे पाच नगरसेवक.
-
अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये तटस्थतेची काँग्रेसची भूमिका
अमरावती शहर काँग्रेसने अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची घेतली भूमिका. अमरावती महानगरपालिकेचे 17 ही नगरसेवक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही. काँग्रेसने सगळ्या नगरसेवकांना व्हीप जारी करून दिले आदेश. मात्र यावेळी ग्रामीण मधील काँग्रेसच्या कोणत्याही नगरसेवकांना व्हीप जारी केले नाहीत.
-
कुर्डुवाडी मतदान केंद्रावर मतदान प्रकियेला सुरुवात
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी कुर्डुवाडी मतदान केंद्रावर मतदान प्रकियेला सुरुवात. करमाळा,कुर्डुवाडी, माढा येथील 80 मतदार बजावणार मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क. मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. अद्याप एकही मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेला नाही.
-
मुंबईतील मातोश्री परिसरात शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन
संपूर्ण परिसरात धनुष्यबाण चिन्हाचे भव्य बॅनर्स आणि पोस्टर्स. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विशाल छायाचित्रांनी परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे. मातोश्रीच्या आसपास उभारण्यात आले मोठे फुगे आणि धनुष्यबाणाच्या प्रतीकांचे बॅनर्स. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा मातोश्री समोरच मानस.
-
औरंगाबाद-जालना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात
दोन्ही जिल्ह्यातील 637 मतदार आज दिवसभर बजावणार मतदानाचा हक्क. छत्रपती संभाजी नगर मध्ये 399 तर जालन्यात 238 मतदार. दोन जिल्ह्यातील 13 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पार पडणार मतदान प्रक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या तहसील मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा. छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजुरकर मतदानासाठी दाखल.
-
खासदार फोडल्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी राजकीय समीकरण बदललं
ठाकरेंच्या शिवसेनेचे ४५ सदस्य अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंना मतदान करण्याची शक्यता. सहा खासदार फोडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती. नाशिक विधान परिषद निवडणुकीत ऐन मतदानाच्या दिवशी नवे राजकीय समीकरण. प्रचार थांबवला असला तरी गोकुळ गिते पडद्यामागून सक्रिय असल्याची चर्चा.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आज मतदान होत आहे. महायुती एकत्रितपणे ही निवडणूक लढवत असून त्यांचं पारड जड मानलं जात आहे. महाविकास आघाडीने सुद्धा काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी नाशिक आणि जळगावच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष असेल. कारण या दोन जागांवरुन महायुतीत बरीच धुसफूस झाली. धाराशिव बीड लातूर विधान परिषद निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. धाराशिव 8 लातूर 10 तर बीड येथे 11 असे एकूण तिन्ही जिल्ह्यातील 29 मतदान केंद्रावर ती ही प्रक्रिया पार पडणार आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध महाविकास आघाडीचे वसंत देशमुख यांच्यात लढत आहे.