Maharashtra News LIVE : शेतकऱ्याकडे बघत असताना त्यात राजकारण होऊ नये- रोहित पवार

नीट पेपरफुटी प्रकरणातील मनीषा गुरुनाथ मांढरे दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. तर नाशिकमध्ये आज शिवसेनेचा संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, कीरिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग...

Maharashtra News LIVE : शेतकऱ्याकडे बघत असताना त्यात राजकारण होऊ नये- रोहित पवार
| Edited By: | Updated on: May 18, 2026 | 9:26 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 18 May 2026 09:50 AM (IST)

    धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल, चोराने..

    तळेगाव दाभाडे येथील धनराज गोल्ड या सराफ पेढीत ग्राहक बनून आलेल्या एका जोडप्याने तब्बल ५ ग्रॅम वजनाची सोन्याची वाटी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सोन्याच्या वस्तूची किंमत तब्बल ८० ते ९० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण हातचलाखी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सराफा व्यापारी यांनी याबाबत तळेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तर तळेगांव पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे या जोडप्याचा शोध घेत आहेत

  • 18 May 2026 09:40 AM (IST)

    सह्याद्रीच्या छातीवर गिर्यारोहण तानाजी केकरेचे नाव

    कोणत्याही दोरखंडा शिवाय सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. आंबेवाडी गावचे रहिवासी आणि ‘महाराष्ट्र रेंजर्स’ संस्थेचे गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी आपल्या अद्भूत कौशल्याच्या जोरावर दोन मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तानाजी यांनी सह्याद्रीतील सर्वात कठीण मानले जाणारे टप्पे विक्रमी वेळेत पार केले.

  • 18 May 2026 09:30 AM (IST)

    मंठा तालुक्यातल्या जांभरुण शेत शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

    जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील जांभरुण येथील शेत शिवारात मंठा पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला या कारवाई मध्ये पोलिसांनी जुगाराचे साहित्य दुचाकी आणि काही रोख रक्कम असा एकूण 3 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.शिवाय पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या गुन्हा दाखल केला. मागच्या काही दिवसापासून या परिसरामध्ये बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू होता आणि गोपनीय माहिती द्वारे पोलिसांनी हा छापा टाकला आणि कारवाई केली

  • 18 May 2026 09:26 AM (IST)

    शेतकऱ्याकडे बघत असताना त्यात राजकारण होऊ नये रोहित पवार यांचे विधान

    शेतकऱ्याकडे बघत असताना त्यात राजकारण होऊ नये. सत्तेतील, विरोधातील राजकारणी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्न पाठीमागे उभे राहणे गरजेचे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कांद्याला ३ , ५ रुपये भाव मिळत आहे. उत्पादन खर्च जास्त आहे. मागील वेळी २०० रुपये कांदा अनुदान जाहीर केले, दिले अवघे ५० रुपये…१५० रुपयांचे काय झाले…नाफेड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करते, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

  • 18 May 2026 09:20 AM (IST)

    गेवराईमध्ये किर्तनकार महाराजांवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ कॉल

    सप्ताहाचा हिशेब मागितल्याने कैलास महाराज आनंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, ते गंभीररित्या जखमी असून बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे विचारपूस करत काळजी करू नका असे आश्वासन दिले. तर युवासेनेच्या बाजीराव चव्हाण यांच्याकडून वैद्यकीय उपचारासाठी खर्च देण्यात आला आहे. कोणालाही सोडणार नाही, कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री शिंदेंचे महाराज मंडळींना आश्वासन. वारकऱ्यांवर जर कोणी हात उचलत असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही.

  • 18 May 2026 09:05 AM (IST)

    शेतकऱ्यांनी कापूस विकताच बाजारपेठेत कापसाचे दर वधारले…

    अमरावतीत कापसाचे दर प्रतिक्विंटल साडेनऊ ते दहा हजार रुपयांपर्यंत. महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांनी कापूस विकला 7000 ते 7500 रुपये प्रति क्विंटल. वाढलेल्या कापसाच्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा; शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीचा फायदा नाही

  • 18 May 2026 08:57 AM (IST)

    राज्य मंत्री मंडळ बैठकीसह इतर महत्वाच्या बैठकीसाठी राज्य सरकारचा नवा निर्णय

    मुंबई बाहेरील मंत्री आता मंत्रिमंडळ बैठक व इतर महत्त्वाच्या बैठकांना ऑनलाइन उपस्थित राहणार. मुंबई पासून लांब असणाऱ्या मंत्र्यांना व नेत्यांना बैठकांसाठी मुंबईत येण्याची गरज नाही. राज्य सरकारकडून नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर नवी संकल्पना राबवण्यात येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

  • 18 May 2026 08:50 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी डिझेलचा तुटवडा 40 टक्के पेट्रोल पंप बंद

    वाशिम जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून आजही जिल्ह्यातील 40 टक्के पेट्रोल पंप बंद डिझेल- पेट्रोल अभावी बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शेती मशागतीची कामही कोळंबली आहेत. तर प्रवासी वाहनांनाही याचा फटका बसला असून वाहन बंद करून ठेवण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. आज सायंकाळपर्यंत डिझेल पुरवठा सुरळीत होईल असं पंपचालकांकडून सांगण्यात येत असलं तरी नागरिकांमध्ये मात्र यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय.

  • 18 May 2026 08:40 AM (IST)

    राज्यभरात उष्णतेमुळे नागरिक त्रस्त…

    दिवसभर उन्हाची प्रखर तीव्रता तर रात्री उकाड्याने नाहगरिक हैराण झाले आहेत. पुण्यातही उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला आहे.  पुढील दोन दिवसांत पुण्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 18 May 2026 08:30 AM (IST)

    भोंदू अशोक खरातने बेनामी खात्यातून तीन महिन्यात काढले 52 कोटी

    भोंदू अशोक खरातने बेनामी खात्यातून तीन महिन्यात 52 कोटी काढले. डिसेंबर 2025 मध्ये वावी पोलीस ठाण्यात जासूद आणि परब विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भोंदू खरातने बँकेतून 52 कोटी काढले. जानेवारी ते मार्चमध्ये अटक होईपर्यंत  पैसे काढले. 65 बनावट खाते उघडून चार दिवसात 200 हून अधिक व्यवहारांद्वारे 52 कोटी काढले. अटके पूर्वीच काळा पैसा पांढरा करून विदेशात पळण्याचा प्लॅन होता.

  • 18 May 2026 08:25 AM (IST)

    ९५ वर्षीय आजोबांच्या घरातील चोरी उघड, नातलग आरोपी अटकेत

    जुन्नरच्या नेतवड कुटेमळा इथे ९५ वर्षीय बजाबा कुटे यांच्या घरातून ४ लाख २० हजारांचे ७ तोळे सोने चोरीला गेले होते. ओतूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपास करून आरोपी अभिषेक खंडू कुटे याला टिटवाळ्यातून अटक केली. विशेष म्हणजे चोरीचा १००% मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. आरोपी हा फिर्यादीच्याच गावातील आहे.

  • 18 May 2026 08:20 AM (IST)

    दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून ५२ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

    पुणे जिल्ह्यातील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत २३ गुन्ह्यांची उकल केली असून तब्बल ५२ लाख ९१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. यात घरफोडी, मोटारसायकल चोरीसह विविध मालमत्ता गुन्ह्यांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालामध्ये सुमारे १६ लाखांचे सोने, दीड लाखांची रोख रक्कम तसेच २४ लाखांच्या मोटारसायकली व इतर वाहनांचा समावेश आहे. परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या हस्ते नागरिकांना मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे तसेच पोलीस पथक उपस्थित होते.

  • 18 May 2026 08:17 AM (IST)

    शेतकऱ्यांनी कापूस विकताच बाजारपेठेत कापसाचे दर वधारले…

    अमरावतीत कापसाचे दर प्रतिक्विंटल साडेनऊ ते दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.  महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांनी  7000 ते 7500 रुपये प्रति क्विंटल कापूस विकला.  वाढलेल्या कापसाच्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा झाला असला तरी, शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीचा फायदा झालेला  नाही.

  • 18 May 2026 08:15 AM (IST)

    मुंबई-गोवा महामार्गावरील पथकराला मंत्र्यांचाच विरोध, अदिती तटकरे यांची लवकरच गडकरींशी चर्चा

    मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतानाही पथकर वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मंत्री अदिती तटकरे यांनीही या पथकर वसुलीला विरोध केला आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याला स्थगिती देण्याची मागणी करणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

  • 18 May 2026 08:10 AM (IST)

    पुण्यात दोन दिवस पावसाची शक्यता….

    गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात किंचित घट नोंदविण्यात येत आहे. तर पुढील पाच दिवसात हवामान फारसा बदल होणार नसल्याने तापमान स्थिर राहणार आहे तसेच पुढील दोन दिवसात शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

  • 18 May 2026 08:05 AM (IST)

    पुण्याची वाटचाल जीसीसी हबकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य…

    जागतिक स्तरावर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणून पुणे शहराची ओळख निर्माण होत आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा करण्याचे काम वेगाने सुरू आहे देशातील एकूण गुंतवणुकी पैकी सुमारे 25 टक्के गुंतवणूक पुण्यात होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मनीषा यांना दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. पुण्यातून देखील मोठी माहिती समोर येत आहे, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री आणि कॉपरिट कंपन्यांच्या अनैतिक स्पर्धेविरोधात येत्या दि. 20 मे रोजी देशभरात लाक्षणिक बंद पुकारला आहे. या बंदमध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील 15 हजार औषध विक्रेते सहभागी होणार असल्याचे केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट अध्यक्षांनी माहिती दिली. तर नाशिकमध्ये आज शिवसेनेचा संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी बैठका होणार आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे देखील पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर येणार आहे. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, कीरिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…

Follow Us