Maharshtra News LIVE : अमरावतीमध्ये स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग, 3 बालकांचा मृत्यू

अमरावतीमध्ये आज पहाटे जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागून तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सरकार साखर आयात करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharshtra News LIVE : अमरावतीमध्ये स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग, 3 बालकांचा मृत्यू
| Updated on: Aug 24, 2026 | 9:32 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 24 Aug 2026 09:30 AM (IST)

    साखरेच्या दरवाढीमुळे चहाच्या किमतीत देखील दुप्पटीने वाढ

    साखरेच्या दरवाढीमुळे चहाच्या किमतीत देखील दुप्पटीने वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात 5 रुपये हाफ मिळणारी चहा 10 ते 15 रुपयांवर पोहोचला आहे. ग्राहकांनी साखरेचे दर कमी करण्याची सरकारकडे मागणी.

  • 24 Aug 2026 09:20 AM (IST)

    दहिसर चेक नाका येथे ट्रॅफिक पोलीस आणि कार चालकामध्ये वाद

    दहिसर चेक नाका परिसरातून ट्रॅफिक पोलीस आणि कार चालकामधील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक कॉन्स्टेबल आणि कार चालकामध्ये तीव्र वादावादी झाली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दहिसर चेक नाका येथे घडली आहे.


  • 24 Aug 2026 09:10 AM (IST)

    आमगाव शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात चिखलाचे साम्राज्य

    गोंदियाच्या आमगाव शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळाले. चिखलामुळे व्यापारी आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत. मुख्य बाजारपेठेतील मार्ग तात्काळ बनवून देण्याची प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

  • 24 Aug 2026 08:57 AM (IST)

    नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांची गर्दी कायम

    नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांची गर्दी कायम आहे. समोर नंदी नसलेले एकमेव मंदिरात असल्याने कपालेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान विधीवत पूजा आणि आरतीनंतर पहाटे 5 वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. रात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे.

  • 24 Aug 2026 08:50 AM (IST)

    पावसाळा सुरू होऊन 2 महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील जिल्ह्यात पाणीटंचाईच सावट कायम

    पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी देखील जालना जिल्ह्यात पाणी टंचाईचा सावट अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे, प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीला जालना जिल्ह्यातील 16 गावे आणि 23 वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असून जवळपास 57 हजार नागरिकांची तहान अजूनही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे, दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी देखील खालावली असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्याही सिंचनाचा संकट आता शेतकऱ्यांसमोर उभा राहील, दरम्यान येत्या काळात पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या ही कायम राहील शिवाय शेतीमालांच्या उत्पादनात मोठी घाट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


  • 24 Aug 2026 08:40 AM (IST)

    चांदगुडे कुटुंबातील तिघांचा अंत्यविधी वेगवेगळ्या ठिकाणी, अस्थिविसर्जन मात्र एकाच ठिकाणी

    चांदगुडे कुटुंबातील तिघांचा अंत्यविधी वेगवेगळ्या ठिकाणी, अस्थिविसर्जन मात्र एकाच ठिकाणी करण्यात आले.  मुरलीधर चांदगुडे यांचा अंत्यविधी धनगर पिंपळगाव येथे तर कुणाल चांदगुडे आणि संगीता चांदगुडे यांचा  अंत्यविधी छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला होता. मात्र तिन्ही मृतांचे अस्थी विसर्जन पैठणच्या गोदावरी नदीपात्रात एकत्र करण्यात आले. अंत्यविधी वेगवेगळ्या ठिकाणी, मात्र अस्थिविसर्जन एकाच ठिकाणी करण्यात आले.

  • 24 Aug 2026 08:30 AM (IST)

    तुकाराम मुंडेंच्या सुट्टे खाद्यतेल विक्री बंदीच्या निर्णयाविरोधात नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची बैठक

    तुकाराम मुंडेंच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला व्यापाऱ्यांनी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. १५ दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  राज्यातील खाद्यतेल व्यापारी रस्त्यावर उतरून देखील आंदोलन करणार आहेत.

  • 24 Aug 2026 08:20 AM (IST)

    हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सिए श्याम कलानी पोलिसांच्या ताब्यात

    आयकर विभागाने भांडाफोड केलेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सिए श्याम कलानीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मधून श्याम कलानीला ताब्यात घेण्यात आले आहे. श्याम कलानी सह इतर 16 कंपन्यांवर 02 हजार 143 कोटी, 43 लाख रुपयांचा निधी बनावट कागदपत्रे तयार करून परदेशात पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. उदगीर मध्ये सिए श्याम कलानीच्या कार्यालयात चार दिवस चौकशी केल्या नंतर आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात सीए शाम कलानी ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्याम कलानी ला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  • 24 Aug 2026 08:10 AM (IST)

    कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

    कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत.  गोदावरी नदीच्या उगमस्थान अर्थात ब्रह्मगिरी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे.  गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कामांचा गिरीश महाजन आढावा घेणार आहेत. कुंभमेळ्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांकडून  माहिती घेणार आहेत.

  • 24 Aug 2026 08:09 AM (IST)

    अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये आग, शिशुच्या मृत्यूनंतर आई-वडिलांचा आक्रोश…

    अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभागात 3 शिशु चा आगीत होळपळून मृत्यू झाला आहे. शिशुच्या मृत्यूनंतर आई-वडिलांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयामधील फायर अलार्म यंत्रणाच कार्यन्वित नसल्याचा आरोप होत आहे.

अमरावतीमध्ये आज पहाटे जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. या आगीत तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू झाला. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3.30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. 39 लहान बाळांना याठिकाणी ठेवले होते. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सरकार साखर आयात करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत सरकार साखर आयात करणार आहे. एवढंच नाही तर, माझगाव मोरया गणपती आगमन मिरवणुकीत तणाव, अंड आणि दगड फेकल्याच्या आरोपावरून कार्यकर्त्यांनी गणपतीच्या मंडपा समोर निदर्शन केले. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us