Maharashtra News LIVE : पावसाने मध्य रेल्वेची गती मंदावली, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी
Maharashtra News LIVE : राज्याभरात जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबईमध्ये अनेक भागात सखल भागात पाणी साचले आहे. बीडच्या केजमध्ये तणावाचे वातावरण आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाच्या विरोधात खून प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला.

LIVE NEWS & UPDATES
-
सिडकोतील फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूलमधील 23 महिन्याच्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याकडून मारहाणीचा आरोप
सिडकोतील फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूलमधील 23 महिन्याच्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याकडून मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून बराच वेळ सुरू असलेल्या वादात शाळेतील कुणाचाही हस्तक्षेप नाही. शाळेच्या प्राचार्य, सीईओ, मालक, रिजनल मॅनेजर व महाराष्ट्र हेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 महिन्याच्या बालकावर छत्रपती संभाजी नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साखळी शिरपूर सह धुळे तालुक्यात दोन दिवसापासून काही प्रमाणात पाऊस..
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साखळी शिरपूर सह धुळे तालुक्यात दोन दिवसापासून काही प्रमाणात पाऊस सुरु झाला आहे. पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. गेल्या पंधरा दिवसापासून रखडलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. पुढे देखील समाधानकारक पाऊस पडावा शेतकऱ्यांची अपेक्षा…
-
-
जळगावच्या अमळनेरात मध्यरात्री पावसाची दमदार एन्ट्री..
अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागांत जोरदार पाऊस झाला आहे. पहिल्याच पावसात अमळनेर शहरातील तुडुंब भरलेल्या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आलं आहे. रेल्वे बोगद्यातून नाल्याच्या साचलेल्या घाणेरड्या पाण्यातून वाहनधारकांचा प्रवास सुरु आहे. अमळनेर शहरातील प्रांताधिकारी कार्यालयातील आवारात देखील पावसाचे पाणी साचले आहे.
-
चाळीसगावात मध्यरात्री पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; 44 सराईत गुन्हेगार ताब्यात
चाळीसगावात मध्यरात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत 44 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं. पोलीस दलाच्या मोठ्या फौजफाट्यासह मध्यरात्री धडक कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. शस्त्र कायद्याचा गुन्हा दाखल झाला असून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आली. तसेच 60 लिटर गावठी दारू नष्ट केली आणि तीन वाहनेही जप्त करण्यात आली.
-
टीव्ही9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, अंधेरी सबवेबाहेरील उघड्या मॅनहोलला तत्काळ बॅरिकेडिंग
टीव्ही9 मराठीवर बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. अंधेरी सबवेच्या बाहेरील उघड्या मॅनहोलला बीएमसी आणि पोलिसांनी तातडीने बॅरिकेडिंग केलं आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सबवेबाेर असलेलं हे मॅनहोल काल रात्रीपासून उघडा होतं. पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने हे मॅनहोल दिसतही नव्हता. त्यामुळे इथे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
टीव्ही9 मराठीने या धोकादायक मॅनहोलची बातमी दाखवली. बातमी प्रसारित होताच बीएमसी आणि मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मॅनहोलभोवती बॅरिकेडिंग करून सुरक्षा व्यवस्था केली.
-
-
विक्रोळी पश्चिम येथे संरक्षक भिंत कोसळली
विक्रोळी पश्चिम येथील जेव्हीएलआर (JVLR) मार्गावरील सनसिटी कॉम्प्लेक्समध्ये, आणि सनहाइट्स इमारतीलगत असलेली सुमारे 50 मीटर लांबीची संरक्षक भिंत रात्री १.३० वाजता कोसळली. भिंत रस्त्यालगत असल्याने परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाले आहेत . घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी जमली आहे.
-
अंधेरी सबवेबाहेर उघड्या मॅनहोलचा धोका
मुंबई उपनगरात सध्या काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आणि अंधेरी सबवे पण वाहनांसाठी सुरू आहे. मात्र सबवेच्या बाहेर असलेला हा उघडा मॅनहोल मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरण्याची शक्यता आहे.
पावसामुळे अंधेरी सबवेच्या बाहेर गुडघाभर पाणी साचतं. पाण्यामुळे रस्त्यावर काहीच दिसत नाहीये, अशा स्थितीत उघडा मॅनहोल नागरिकांसाठी जीवघेणा ठरू शकतो.
-
पावसाने मध्य रेल्वेची गती मंदावली
पावसाने मध्य रेल्वेची गती मंदावली. एकीकडे मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून रोज उशिरा येणाऱ्या 8:33 लोकलमुळे प्रवासी संतापले आहेत. पावसामुळे मध्य रेल्वे 5 ते 7 मिनिटे उशिराने घावत अून कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
बदलापूर लोकलला प्राधान्य, कल्याण लोकलकडे दुर्लक्ष कल्याणकरांसोबत दुजाभाव केला जातो का असा सवाल उपस्थित होत आहे.
वारंवार पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन कडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी नोंदवली.
-
विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
बीड – विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन केला. रमेश घुले यांचा पुरवणी जबाब नोंदविल्यानंतर केज पोलीस ठाण्यात ठेवलेल्या विलास घुलेच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दिलं.
-
ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात हॉटेलच्या छतावरती कोसळलं झाड , वाहतुकीसाठी अडथळा
ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात दुर्गा विहार हॉटेलच्या छतावरती झाड कोसळलं आहे. भले मोठे झाड रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा होत आहे. सुदैवाने यात कोणालााही दुखापत झालेली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे.
-
नंदुरबारमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात
नंदुरबार शहरासह परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे नुकत्याच लागवड करण्यात आलेल्या पिकांना दिलासा मिळणार आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन पिकांना आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
-
कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण सह रिमझिम पावसाची हजेरी
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची सुरुवात. काल काही भागांत पावसाचा जोर वाढल्याने पाणी साचल्याच्या घटना. मात्र काही वेळातच पावसाचा वेग कमी होताच साचलेल्या पाण्याचा झाला निचरा. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
-
देवळाली प्रवरा येथे विजेच्या तारा कोसळून 8 गायींचा दुर्देवी मृत्यू…
वादळी वाऱ्यासह पावसामुळे वीजवाहिन्या तुटल्या. गोठ्याच्या परिसरात विद्युत प्रवाह पसरल्याने जनावरांचा शॉक बसून मृत्यू. मच्छिंद्र बापू काळे यांचे मोठे आर्थिक नुकसान. काही क्षणांतच 8 गायी जागीच मृत्युमुखी. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त. नगराध्यक्ष सत्यजीत कदम , शेतकरी सेनेचे रवि मोर यांची घटनास्थळी भेट…
-
कांदिवली पूर्व हनुमान नगरमधील राधा कृष्ण सोसायटीत घरांमध्ये पाणी
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. कांदिवली पूर्व हनुमान नगर येथील राधा कृष्ण सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे समोर आले आहे. राधा कृष्ण सोसायटीतील रहिवाशांच्या घरात रात्री पाणी शिरले. त्यामुळे या सोसायटीतील लोकांनी रात्रभर घरातील पाणी बाहेर काढण्याचे काम केले.
-
गोकुळ गीते यांच्या विजय मिरवणुकीत चोरट्यांचा डल्ला
विजय मिरवणुकीच्या जल्लोषात गर्दीत चोरट्यांनी केली हातसफाई. गर्दीचा फायदा घेत दोन जणांच्या गळ्यातील सुमारे सात लाख रुपयांच्या सोनसाखळी केल्या चोरी. गोकुळ गीते यांच्या मिरवणुकीत सहभागी झालेले येवला येथील ठेकेदार शुभम पाटील आणि मनोज इघे यांच्या सोन साखळीवर मारला चोरट्यांनी डल्ला
-
ठाणे ते वाशी दरम्यान बरोबर ट्रान्स हर्बल रेल्वे विस्कळी
१ तासानंतर पहिली रेल्वे ठाणे ते पनवेल जाणारी लोकल सोडत आहे.. फलाट वर रेल्वे गाडी पकडण्यासाठी गर्दी. पावसाचा फटका ट्रान्स हार्बर मार्गावर बसला आहे. तुर्भे आणि कोपरखैरणेच्या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला होता….
राज्यात मॉन्सून दाखल झाला. मुंबईसह अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. रात्रभर पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. मुंबई उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. काल संध्याकाळपासून मालाडसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई लोकलवरही या पावसाचा परिणाम झाला. मध्य रेल्वे उशीराने धावत आहे. पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली. त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच त्याचा हत्येचा कट रचला होता. रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 तारखेपासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान विरोध सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत आहेत. केजमधील एका खून प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.