Maharshtra News LIVE : श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद प्रकरणाची सुनावणी आता 18 सप्टेंबर रोजी
Maharshtra News LIVE : नंदुरबारच्या अतिदुर्गम मणीबेली गावातील देशातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता तडवींना अखेर न्याय मिळणार. टीव्ही९ मराठीने रविता तडवी यांची व्यथा प्रशासनासमोर आणल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल.

LIVE NEWS & UPDATES
-
आरपीआय (खरात गट)चे सचिन खरात वर्षा निवासस्थानी दाखल
आरपीआय (खरात गट)चे सचिन खरात वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी खरात वर्षा निवासस्थानी आले आहे. खरात गट पुन्हा महायुतीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
-
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMCचा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक
भुलेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय घेतला आहे. मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक असणार आहे. जड मूर्तींसाठी हा नवा नियम लागू केला आहे. गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी बीएमसी प्रशासनाने एक मोठे पाऊल उचललं आहे. भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर आता एक टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तीसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासोबतच मूर्तीची ऑर्डर दिल्याच्या वेळेपासून ते मूर्ती तयार होऊन मंडळात येईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे.
-
-
तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
सर्वोच्च न्यायालयाने ‘तहलका’ मासिकाचा माजी संपादक तरुण तेजपाल याला तीन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आणि आत्मसमर्पणाचे प्रमाणपत्र न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने तेजपालच्या अपीलावर २२ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.
Supreme Court ordered rape convict and former Editor of Tehelka magazine Tarun Tejpal to surrender within three weeks’ time and to furnish the surrender certificate before the Court.
A bench of Justice Alok Aradhe also agreed to list Tejpal’s appeal (challenge) against the… pic.twitter.com/PVBy1SpCNe
— ANI (@ANI) August 25, 2026
-
राहुल गांधी यांनी कृती सॅनॉनच्या समर्थनार्थ एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनेत्री कृती सॅनॉनच्या समर्थनार्थ एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यांनी लिहिले, “स्त्री काय घालते हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे.” त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये #SmashThePatriarchy हा हॅशटॅगदेखील वापरला.
-
रूपाली चाकणकर यांनी पुण्यात द नाईन्स नावाने हॉटेल व्यावसाय सुरू केला
महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यात द नाईन्स नावाने हॉटेल व्यावसाय सुरू केला आहे. पुण्यातील या द नाईन्स या हॉटेल मधे बार आणि रेस्टोरेंट समाविष्ट आहे. दोन दिवसांपूर्वी या हॉटेल च्या उदघाटनाला माजी मंत्री जयंत पाटील,आमदार सुनील शेळके आणि इतर प्रमुख नेते मांडली उपस्थित होते. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांकडून पुण्यात बार आणि रेस्टोरेंट हॉटेल उभं करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होऊ शकतो.
-
-
श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद प्रकरणाची सुनावणी आता 18 सप्टेंबर रोजी
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वाद प्रकरणाची सुनावणी घेतली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. न्यायालय एकाच वेळी हिंदू पक्षाने दाखल केलेल्या 18 दाव्यांवर सुनावणी घेत आहे. वादग्रस्त परिसराची संपूर्ण 13.37 एकर जमीन श्री कृष्ण जन्मभूमीला सुपूर्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अवनीश सक्सेना यांच्या एकल खंडपीठासमोर सुरू आहे.
-
जेजे फ्लायओव्हरवर १ तासांपासून वाहतूक कोंडी
मुंबईच्या जेजे फ्लायओव्हरवर १ तासांपासून वाहतूक कोंडी असून वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. भायखळापासून सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्यांना या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
-
गोंदिया : धान पिकाच्या बोनससाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा मागे
गोंदिया : धान पिकाच्या बोनससाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा अखेर आश्वासनानंतर मागे घेण्यात आला आहे. या मागण्या शासनापर्यंत पोचविणार असल्याचे निवासी जिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
-
मीरा-भाईंदर पालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू, मनसेने दिला होता इशारा
मीरा -भाईंदरमधील खड्डे २४ तासांत न बुजवल्यास पालिका आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे शहर अध्यक्ष संदिप राणे यांनी दिला होता, या इशाऱ्याची दखल घेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेने २४ तासांच्या आत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
-
जळगावच्या पिंप्राळा परिसरात एकाच रात्री तीन घरफोड्या
जळगावच्या पिंप्राळा परिसरात पांडुरंग साई रेसिडेन्सीतील तीन घरांमधून ८ लाखांचे सोने, २ लाख ८० हजारांची रोकड लंपास झाली आहे. पाच तोळे सोने, सुमारे २ लाख ८० हजारांची रोकड आणि टीव्ही चोरट्याने लांबविला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
-
रेल्वे कर्मचाऱ्यांना मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्याची मागणी
महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाहतूक विभागाकडून स्वागत. रेल्वे प्रवाशांशी थेट संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मराठी भाषेचे किमान व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करावे, अशी मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद (आण्णा) कांबळे यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन दिले. TTE/TC, तिकीट खिडकी कर्मचारी, चौकशी केंद्रातील कर्मचारी, RPF आणि इतर प्रवासी सेवा कर्मचाऱ्यांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असावे, अशी मागणी.
-
पाव किलो,अर्धा किलोच्या तेलाच्या पॅकेजिंगची बाजारात मागणी
महाराष्ट्रात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर FDA नं बंदी घातलीय..यानंतर पाव किलो, अर्धा किलो आणि एक किलोच्या तेलाच्या पिशव्यांची मागणी दुकांदारांकडून करण्यात येत आहे..
-
राज्यातील 314 अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाची करडी नजर असणार- सूत्र
राज्यातील 314 अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाची करडी नजर असणार अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय.. अधिकाऱ्यांची यादी तयार असून झाडाझडती होणार असल्याचंही सूत्रांकडून समजतंय..अनेक अधिकारी एकाच विभागात असल्याचं समोर आलंय.
-
साखरेचा तुटवडा, सोलापूरच्या डी-मार्टमध्ये पुरवठा अधिकारी
साखरेचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमिवर सोलापूरच्या डी-मार्टमध्ये तपासणी… जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापुरातील डी मार्टमध्ये दाखल… अतिरिक्त साठा तपासण्यासाठी दाखल
-
नवीमुंबई – सीसीटीव्हीच्या मदतीने चेन स्नॅचर टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून सोनसाखळी खेचणाऱ्या टोळीविरोधात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-1 ने मोठी कारवाई केली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन सराईत चेन स्नॅचरना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून तब्बल 7 लाख 39 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या चेन्स तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली .
-
नागपुरात शिवसेनेकडून सामूहिक वंदे मातरम् गायनाचं आयोजन
नागपुरात शिवसेना ( शिंदे गट ) कडून सामूहिक वंदे मातरम् गायनाचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या उपस्थितीत वंदे मातरम चं गायन झालं. नागपुरातील हिंदी मोर भवन सभागृहात हे आयोजन करण्यात आलं.
-
संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट
संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली. 10 जनपथ या निवासस्थानी झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्र आणि देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधींनी मोदी, शहांना खूप मागे टाकलंय, याची त्यांना भेटून खात्री पटते, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
-
संपावर असलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करा, नाहीतर मनसे स्टाईलने उत्तर देऊ – मनसे विभाग अध्यक्षांचा इशारा
कांदिवलीतील मराठी-अमराठी रिक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी आज कांदिवली ट्रॅफिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अमराठी रिक्षा चालकांच्या मनमानी आणि ट्रॅफिक पोलिसांकडून होणाऱ्या त्रासावर चर्चा केली.
रिक्षा स्टँडवर किंवा रस्त्याच्या कडेला रिक्षा पार्क करून संपावर असलेल्या चालकांविरोधात कारवाई करण्याची आणि संपाच्या नावावर बंद असलेल्या रिक्षा तात्काळ सुरू करण्याची मागणी मनसेने केली .
-
मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीत एण्ट्रीची शक्यता
मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीत एण्ट्रीची शक्यता आहे…फडणवीसांनी 2029च्या आत पंतप्रधान व्हावं असं विजय वडेट्टीवार म्हणालेत..तर सगळ्या विषयांचा निपटारा करुन फडणवीस दिल्लीत जातील असा दावा संजय राऊतांनी केलाय..दरम्यान भाजपच्या नवनाथ बन यांनी दोन्ही नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय
-
पुणे – रोहित पवार आदिवासी आंदोलकांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे पुण्यामध्ये आदिवासी आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. मांजरी येथे गेल्या 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे.
-
नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट
नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी भेट घेतली . २ वर्षात ५८५ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार ? यावर आंदोलन सुरू आहे. आंदोलकांच्या मागण्याबाबत सपकाळांनी सरकारवर निशाणा साधला . सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना १ कोटी रुपये मदत मिळावी, 5 ऑगस्ट २०२६ चा सुधारित जीआर रद्द करावा अशी आंदोलकांची मागणी आहे
-
अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे आक्रमक
कांदिवलीतील अमराठी रिक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आता ट्रॅफिक पोलिसांकडे धाव घेतली आहे.मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी हे कांदिवली ट्रॅफिक पोलिसांच्या सिनियर पीआय यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. अमराठी रिक्षा चालकांची सुरू असलेली मनमानी आणि ट्रॅफिक पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाबत ते चर्चा करणार आहेत. या भेटीनंतर मनसे काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
-
बीड – केज तालुक्यातील सावळेश्वर ते जवळबन रस्ता हाताने उखडल्याचे व्हिडिओ व्हायरल
बीडच्या केज तालुक्यातील सावळेश्वर ते जवळबन या 4.40 किमी अंतर असलेल्या डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा दावा करत गावकऱ्यांनी हाताने रस्ता उघडुन व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती झाली होती, ज्यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
-
12 किलोमीटर पायी चालत शेतकऱ्यांचे घागर आंदोलन
जालन्याच्या वडीगोद्री मध्ये शेतकऱ्यांनी तब्बल 12 किलोमीटर पायी चालत घागर आंदोलन केलंय.पैठणच्या जायकवाडी धरणातून अंबडच्या गल्हाटी मध्यम प्रकल्पात पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हे शेतकरी बांधव आक्रमक झाले असून त्यांनी डाव्या कालव्यातून घागर भरून घेत गल्हाटी मध्यम प्रकल्पात टाकल्या.पावसाळा सुरू होऊन 2 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी देखील जालना जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे सद्यस्थितीला जालना जिल्ह्यातल्या अनेक लघुउद्योग प्रकल्पातील पाणी पातळी चिंताजनक आहे अशातच अंबड तालुक्यातला गल्हाटी मध्यम प्रकल्प पूर्णतः कोरडा ठाक पडल्याने शेतकऱ्यांची शेती पिकं धोक्यात आली असल्याने शेतकरी बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे
-
थोरात आणि फडणवीस या नेत्यांनी खेळली फुगडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , विखे पाटील यांनी खेळली रामगिरी महाराज यांचेसोबत फुगडी खेळली. तर बाळासाहेब थोरात आणि फडणवीस या दोघा नेत्यांनी फुगडी खेळली.
-
रिक्षा चालकांची मराठी चाचणी
जळगावात आरटीओ विभागातर्फे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून रेल्वे स्थानकासह ठिकठिकाणी थांब्यावरील रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. रिक्षा चालक मराठी भाषा बोलतात की नाही यासंदर्भात आरटीओ विभागातर्फे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने तपासणी करण्यात आली. रिक्षा चालकांना सूचना देण्यात आल्या असून ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना नोटीस देऊन एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे. एक महिन्यानंतर मराठी भाषा आली नाही तर तीन महिन्यासाठी परवाना निलंबित केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तपासणी दरम्यान सर्व मराठी भाषिक रिक्षा चालक आढळून आले परप्रांतीय कुणीही आढळून आल्याने कारवाई करण्यात आली नसत्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
-
रस्ता खचल्याप्रकरणात आयुक्तांकडून पाहणी
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या कॉलनी रोड मध्ये रस्ता खचून त्यात डंपर गेल्याची घटना घडल्या नंतर नाशिक शहरात नव्याने केल्या जाणाऱ्या 31 रस्त्यांवर देखील भविष्यात हीच परिस्थिती निर्माण होईल का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागल्याने, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वतः याबाबत घटनास्थळी जाऊन खुलासा केला आहे, नव्याने केल्या जाणाऱ्या रस्त्याखाली 10 प्रकारच्या पाईपलाईन टाकल्या जात असून नव्या पाईपलाईन चा दर्जा आणि जुन्या पाईपलाईन चा दर्जा यात असलेला फरक त्यांनी स्पष्ट केला तर आज जरी नाशिककर यांना त्रास होत असला तरी पुढची 35 ते 40 वर्ष नाशिक मधले हे नव्याने करण्यात आलेले 31 रस्ते पुन्हा खोदण्याची गरज पडणार नाही असा दावा खुद्द पालिका आयुक्तांनी केला आहे.
-
आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम
आदिवासी मंत्री, आमदारांची बैठक झाली. त्यात आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्यात आली आहे. तरीही आदिवासी विद्यार्थी इतर मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम आहेत. त्यातील एका आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली आहे.
-
पालघरच्या मोखाड्यात धर्मांतराच्या प्रयत्न
पालघरच्या मोखाड्यात धर्मांतराच्या प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. २२ महिलांविरोधात मोखाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ वर्षांच्या तरुणाला धार्मिक पुस्तकाचं वाटप करण्यात आलं होते. या पुस्तकाचे वाचन केल्याने आजार बरे होतील असा दावा केला होता.
-
जालन्यातील शेतकऱ्यांच घागर आंदोलन
जालन्याच्या वडीगोद्री मध्ये शेतकऱ्यांनी तब्बल 12 किलोमीटर पायी चालत घागर आंदोलन केलंय.पैठणच्या जायकवाडी धरणातून अंबडच्या गल्हाटी मध्यम प्रकल्पात पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हे शेतकरी बांधव आक्रमक झाले असून त्यांनी डाव्या कालव्यातून घागर भरून घेत गल्हाटी मध्यम प्रकल्पात टाकल्या.पावसाळा सुरू होऊन 2 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी देखील जालना जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे सद्यस्थितीला जालना जिल्ह्यातल्या अनेक लघुउद्योग प्रकल्पातील पाणी पातळी चिंताजनक आहे अशातच अंबड तालुक्यातला गल्हाटी मध्यम प्रकल्प पूर्णतः कोरडा ठाक पडल्याने शेतकऱ्यांची शेती पिकं धोक्यात आली असल्याने शेतकरी बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे,
-
नवेलमधील उलवे येथील बामणडोंगरी जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार
उलवेतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना लागतो करंट; शाळा प्रशासनाला जाग आल्यानंतर अखेर दुरुस्तीचे काम सुरू. पनवेलमधील उलवे येथील बामणडोंगरी जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या भिंतींना विद्युत प्रवाह येत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे, स्वतः विद्यार्थ्यांनी घटनेचा थरार सांगितल आहे..,tv9 मराठीने या संर्दभात बातमी प्रसारित केली होती त्यानंतर शाळा प्रशासनाने त्वरित दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.., त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे…शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ बनवून संपूर्ण घटना समोर आणली आहे… मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घालत विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर विद्यार्थ्यांनी देखील आम्हाला करंट लागत असल्याचं धक्कादायक बाब सांगितली आहे त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
-
पुण्यातील मांजरीमधील आंदोलकांची प्रकृती बिघडली
पुण्यातील मांजरीमधील आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. पुण्यात मागील 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरु होतो.
-
धान पिकाला बोनस देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक…
धान पिकाला प्रतिक्विंटल बोनस मिळावा या मुख्य मागणीसाठी गोंदिया जिल्ह्यातील नवेझरी येथून निघालेला भव्य ट्रॅक्टर मोर्चा अखेर गोंदिया शहराच्या वेशीवर येऊन धडकला आहे…. एका शेतकऱ्यांना अवघड बाबा चे वेशभूषा मध्ये मोर्चामध्ये दाखल झाला त्या शेतकऱ्यांची भेशभूषा आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरला… सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेकडो शेतकऱ्यांचा हा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यासाठी पुढे सरकत आहे…
-
NCP कडून महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत 32 महामंडळाची मागणी
NCP कडून महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत 32 महामंडळाची मागणी करण्यात आली आहे. पुढील बैठकीत आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ वाटपाचा आकडा ठरणार आहे. मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत एकूण महामंडळाचे अध्यक्ष व्यतिरिक्त 650 सदस्यांची लवकरच नेमणूक करणार.
-
छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे रास्ता रोको
छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावर जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे रास्ता रोको. राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे घोषणा बाजी करत रास्ता रोको आंदोलन. अर्धा तास रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघातांच्या घटनां. पुढच्या १० दिवसात महामार्गावरील खड्डे बुजवली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वतीने देण्यात आलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार्यांच्या अधिकाऱ्यांच्या तसेच ठेकेदाराच्या खड्डे बुजवण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं
-
महापालिका आयुक्तांनी केली नवश्या गणपती परिसरातील रस्त्यांची पाहणी
महापालिका आयुक्तांनी केली नवश्या गणपती परिसरातील रस्त्यांची पाहणी. काही दिवसांपूर्वी रस्ता खचून डंपर गेला होता खड्ड्यात. गंगापूर रोड परिसरात सुरू असलेल्या कामांचा दर्जा असा असणार की पुढच्या अनेक वर्ष खड्डे पडणार नाहीत. महापालिका आयुक्तांची ग्वाही. कुंभमेळा दरम्यान तयार होणाऱ्या रस्त्यांमध्ये सगळ्या लाईन्स एकत्र टाकल्या जात आहेत
-
ठाण्यात “माझा फुटपाथ माझा अधिकार अभियान” , भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा उपक्रम
ठाणे शहर झपाट्याने वाढत असताना ठाणे शहरात अनेक दुकानांनी विविध ठिकाणी ठाण मांडले आहे या दुकानांच्या समोरील फुटपात वर देखील दुकानदारांनी अतिक्रमण केले असून हेच अतिक्रमण हटवण्यासाठी भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी माझे फुटपाथ माझा अधिकार या अभियानांतर्गत अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम हाती घेतली असून शहरातील विविध ठिकाणी दुकानदारांनी अतिक्रमण केलेल्या फुटपाथ मोकळं करण्याची भूमिका असल्याचं मृणाल पेंडसे यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे ॲक्शन मोडवर येताना दिसत आहे…
-
आदिवासी विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम
आदिवासी विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम असणार आहे, जीआर रद्द करण्याची आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
-
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यानंतर सरकारचा निर्णय
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यानंतर सरकारचा निर्णय, मंत्री अशोक उईके म्हणाले की, “वसतीगृहातील वयोमर्यादेच्या निर्णयाला स्थगिती, वयाची अट घालणार निर्णय स्थगित.”
-
आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार
आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक पार पडली, राज्यातील आदिवासी आमदार, खासदारांची बैठक पार पडली.
-
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सोलापुरात पुरवठा विभागाकडून तपासणी पथकाची नियुक्ती
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सोलापुरात पुरवठा विभागाकडून तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली. हे पथक सुपर शॉपी, मार्केट यार्डातील मोठे व्यापारी, नोंदणीकृत रिटेलर्स यांच्याकडील साखर साठ्याची तपासणी करणार आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशाने 3 सदस्य असलेले एकूण 15 पथकं स्थापन करण्यात आली. देशभरात वाढलेल्या साखरेच्या किमतीनंतर सोलापूर जिल्हा पुरवठा विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
-
हरिनामाचा गजर कुणीही थांबवू शकला नाही- फडणवीस
“जगाच्या इतिहासात अनेक देशांवर आक्रमणे झाली. देश बदलले पण आपल्या देशावर आक्रमणानंतर कोणताही परिणाम झाला नाही. हिंदू सनातन धर्माची आपली परंपरा आक्रमणानंतर बदलली नाही. पांडुरंगाचा गजर कधीच थांबला नाही,” असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान केलं.
-
छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळ; MIM नगरसेवकांचा महापौरांवर आक्षेप
छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळ झाला असून MIM नगरसेवकांनी महापौरांवर आक्षेप घेतला आहे. ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा होत नसल्याचा MIM नगरसेवकांचा आरोप आहे. नगरसेवकांचे विषय चर्चेला घेतले जात नसल्याने डायससमोर येत त्यांनी आरडाओरड केली. सत्ताधारी नगरसेवकांकडूनही हातवारे करण्यात आली. दर महिन्याला सर्वसाधारण सभा घेतली जात नसल्याचा MIM नगरसेवकांचा आक्षेप आहे.
-
सोन्याची चोरी करणारा कामगार अवघ्या 48 तासांत जेरबंद
पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या शुभम मनाजी खिलारे याने मालकाने शुद्धता तपासणीसाठी दिलेले 666.23 ग्रॅम वजनाची सहा सोन्याची बिस्किटं घेऊन पलायन केलं. या सोन्याची अंदाजे किंमत 66 लाख 62 हजार 300 रुपये आहे. घटना घडल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाला कुंभार यांनी विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.
पोलिसांनी पनवेल शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पनवेलहून रेल्वेने सोलापूरच्या दिशेने गेल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकापर्यंत त्याचा माग काढला आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील खिलारवाडी या त्याच्या मूळ गावी सापळा रचून त्याला अटक केली.
-
मुंबईत परप्रांतीय तरुणाने पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचलं
मुंबईत परप्रांतीय तरुणाने पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचलं. मराठी माणूस स्वतःच्या बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो, काम करायला लावतो आणि स्वतःला भाई समजतो, असा परप्रांतीय तरुणाचा वादग्रस्त व्हिडिओ चर्चेत आला आहे. रेल्वे कॅन्टीननंतर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं असून मराठी माणसांवर परप्रांतीय तरुणाने टीका केली आहे. आमच्या बायका कधी भांडी घासताना पाहिल्यात का, अशी वादग्रस्त टिप्पणी तरुणाने केली आहे.
-
काम करू नये म्हणून मानसिक त्रास दिला जातोय- दिपाली सय्यद
रुपाली चाकणकर यांनी दिपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी एक कलाकार म्हणून काम करतेय. तुम्ही आधीच दिल्लीमध्ये केस फाइल केली होती. त्याला आम्ही उत्तर देत होतो. तुम्ही आमच्यावर 25 कोटींचा दावा केला. आम्ही त्यांच्यावर 500 कोटींचा दावा केला. तिथे केस सुरू असताना तुम्ही मुंबईत येता आणि दुसरा टीझर लाँच झाल्यानंतर तुम्ही मुंबईत एफआयआर करता,” असं त्या म्हणाल्या.
-
पुण्यात गेल्या एक तासापासून मुसळधार पावसाला सुरवात
पुण्यात गेल्या एक तासापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने कात्रज चौकात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साठलं. पुण्यात गेल्या 15 दिवस पावसाने उघडीप दिली होती. रस्त्यावर पाणी साठल्याने वाहनचालकांना मोठा सामना करावा लागतोय. हवामान खात्याने देखील आजपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
-
उलवेतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना लागतो करंट?
विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्हिडिओ बनवत थेट मुख्यमंत्र्यांना घातली भावनिक साद… पनवेलमधील उलवे येथील बामणडोंगरी जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या भिंतींना विद्युत प्रवाह येत असल्याची गंभीर दावा पालकांनी केला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-
कांदिवली पश्चिममध्ये मनसेचे अमराठी रिक्षाचालकांना इशारा
कांदिवली पश्चिममध्ये मराठी रिक्षा चालकाला मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने कांदिवली पश्चिममध्ये अमराठी रिक्षाचालकांना इशारा देणारे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर लिहिले आहे – अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा…!! मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरलं तर मनसे गप्प बसणार नाही, ही शेवटची नम्र विनंती. मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी हे बॅनर लावले असून अमराठी चालकांनी मराठीचा सन्मान करावा असा इशारा त्यांनी दिला आहे.
-
मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी लोकल सेवा २० ते २५ मिनिटं उशिराने
मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी लोकल सेवा २० ते २५ मिनिटं उशिराने सुरु आहे. कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा २० ते २५ मिनिटं उशिराने सुरु आहे. पाऊस नसतानाही लोकल सेवा उशिराने असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पण रेल्वेकडून कोणतीही उद्घोषणा नाही.
-
नाशिक जिल्हा रुग्णालयाचे यावर्षीचे फायर ऑडिट अद्याप नाही
नाशिक जिल्हा रुग्णालयाचे यावर्षीचे फायर ऑडिट अद्याप नाही. जानेवारी 2025 मध्ये शेवटचे फायर ऑडिट केले होते. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी माहिती दिली आहे. जानेवारी 2026 मध्ये ऑडिट करणे बंधनकारक असताना देखील जिल्हा रुग्णालयाचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आला. अमरावती दुर्घटनेनंतर देखील रुग्णालयांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.
-
कर्जाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
स्वस्त कर्ज आणि आकर्षक योजनांचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करंजाडे परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून विजय बाबू भंडारी (३६), तुषार अरुण पिंगळे (३४), रोहित रंगाप्पा गौडा (२१) आणि दर्शन उमाशंकर (२१) या चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून लॅपटॉप, मोबाइल, डेबिट कार्ड, सिमकार्ड, रोख रक्कम व अन्य साहित्य असा सुमारे ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
-
नाशिकच्या आरटीओ कार्यालयात खाजगी स्कूल व्हॅन चालकांचे आंदोलन
नाशिकच्या आरटीओ कार्यालयात खाजगी स्कूल व्हॅन चालकांचे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. आरटीओकडून होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शालेय वाहनांची ७+१ सीटिंग कॅपॅसिटी; लेडी कंडक्टर ठेवण्याची सक्ती नको. कंडक्टरच्या पगारासाठी पालकांकडून १५ हजार रुपये वसूल केल्यास वाद निर्माण होत असल्याचा दावा करण्यात येत आहे
-
अमराठी रिक्षाचालकांना मनसेच्या इशारा
मनसेने कांदिवली पश्चिममध्ये अमराठी रिक्षाचालकांना इशारा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. “अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा…!!” असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे.
-
पार्टी विथ डिफरन्स नाही, पार्टी विथ करप्शन!- आमदार कैलास पाटील
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्या भाजप सरकारमध्ये मंत्रालयातील टक्केवारी दुप्पट झाल्याचा संस्थाचालकांचाच आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. मंत्रालयातील टक्केवारीच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्याचा कैलास पाटलांचा दावा.
-
अमरावतीत नवजात शिशू अतिदक्षता विभागाला ठोकले टाळे
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासन सतर्क झाले असून SNCU युनिटला टाळे ठोकण्यात आले आहेत.
-
काही लोकांचे मीटर बंद झालेत ते पुन्हा सुरु होणार नाही- अमित साटम
काही लोकांचे मीटर बंद झालेत ते पुन्हा सुरु होणार नाहीत. जे 25 वर्षात झाली नाही ती 6 महिन्यात कामं होत आहेत. चांगल्या गोष्टी मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरु आहे. विरोधी पक्षातल्या दोन लोकांनी मला फोन केला त्यांना साफ नकार दिला. पारदर्शक कारभार करणं आमचा उद्देश असे अमित साटम म्हणाले.
-
कोणत्या समितीत कुणाला घ्यायचं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न- सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी कोणत्या समितीत कुणाल घ्यायचं हा भाजपंचा अंतर्गत प्रश्न आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
-
पुणे महापालिकेतील निधी वाटपाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
पुणे महापालिकेतील निधी वाटपाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचला आहे. पुणे महापालिकेतील राष्ट्र्वादीच्या नगरसेवकाचा निधी शून्य केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही पुण्यात बैठक होणार आहे.
-
धुळ्यात 25 दिवसांपासून पावसाची दडी, शेतकऱ्यांची चिंता वाढली
धुळ्यात २५ दिवसांपासून पावसाची दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी कपाशीची पाने कोमेजली. कपाशीवर मावा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे शेतकरी चिंतेत असून उत्पादनावर परिणामाची भीती व्यक्त केली जात आहे. आठ दिवसांत पाऊस न आल्यास पिकांची स्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
-
कोल्हापुरात ई-चलन रद्द करण्यासाठी वाहतूकदारांचं आंदोलन
कोल्हापुरात ई-चलन रद्द करण्यासाठी वाहतूकदारांचं आंदोलन सुरू झालं आहे. कोल्हापुरात 11 दिवसांपासून ई-चलन रद्द करण्यासाठी उपोषण सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात बसेस आणल्या आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज ठप्प पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
अमरावती तीन बाळांच्या मृत्यूचे प्रकरण : अखेर चौकशी समितीकडून तपासाला सुरुवात
अमरावती स्त्री रुग्णालयात तीन बाळांच्या मृत्यूचे प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत अमरावतीत दाखल झाल्या आहेत. त्यांच्या चौकशी समितीकडून तपासाला सुरुवात झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत बैठकांचे सत्र सुरू आहे. नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) 3 बालकांचा बळी घेणाऱ्या दुर्दैवी अग्निकांड प्रकरणाची राज्य शासनाकडून चौकशी सुरू झाली आहे.
-
मुंब्रा-दिवा परिसरात आज पाणी नाही
ठाणे महानगरपालिकेच्या दिवा व मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील मुख्य 800 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यामुळे दिवा परिसरातील पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे, याबाबत स्थानिक नगरसेवक व नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत्या, या अनुषंगाने सदर व्हॉलव्हच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मुख्य जलवाहिनी 24 तास पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे.
-
टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात टोमॅटोचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना
धाराशिव जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलाय. टोमॅटोला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादनासाठी केलेला खर्चही भरून निघत नसल्याची परिस्थिती आहे. धाराशिव बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार १८ ऑगस्टला टोमॅटोचा कमाल भाव १,५०० रुपये क्विंटल होता, तर २२ ऑगस्टला कमाल भाव ७५० रुपयांपर्यंत घसरला. म्हणजेच काही दिवसांतच बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.
-
जळगावच्या बोरी नदीत पोहायला गेलेल्या बालकाचा मृत्यू
जळगावच्या अमळनेर तालुक्यात कन्हेरे येथे बोरी नदीत पोहायला गेलेल्या बालकाचा मृत्यू झाला आहे. दक्ष राजेंद्र नेरकर असे १२ वर्षीय बालकाचे नाव आहे आहे. शाळा सुटल्यानंतर बोरी नदीपात्रात पोहायला गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. दक्षला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
-
मुंब्रा दिवा परिसरात आज पाणी नाही
ठाणे महानगरपालिकेच्या दिवा व मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील मुख्य 800 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यामुळे दिवा परिसरातील पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे, याबाबत स्थानिक नगरसेवक व नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत्या, या अनुषंगाने सदर व्हॉलव्हच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामासाठी मुख्य जल
-
अमरावती स्त्री रुग्णालयात तीन बाळांच्या मृत्यूचे प्रकरण..
आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत अमरावतीत दाखल; चौकशीला सुरवात.. आरोग्य विभागा कडून चौकशी समितीकडून तपासाला सुरुवात. जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत बैठकांचे सत्र सुरू.. नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) 3 बालकांचा बळी घेणाऱ्या दुर्दैवी अग्निकांड प्रकरणाची राज्य शासनाकडून चौकशी सुरू झाली आहे…
-
जळगावच्या बसस्थानकात प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या दोन सराईत महिलाना जिल्हापेठ पोलिसांकडून अटक
उषा चंदन ससाने आणि अनिता विजय ससाने अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघं महिलांची नावे.. दोघेही महिला नात्याने एकमेकांच्या देरानी आणि जेठाणी असून दोघांकडून चोरीची कबुली. दोघा महिलांकडून एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत. दोघां महिलांवर जळगाव शहर व अमळनेर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर
-
सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची तुंबळ गर्दी
सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची तुंबळ गर्दी. साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर खरेदीसाठी सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात सभासदांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येत आहे. साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आले होते. मात्र,अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली. साखर मिळवण्यासाठी रांगा लागल्या असून,गर्दी वाढल्याने कारखाना प्रशासनाचीही चांगलीच धावपळ झाल्याचं दिसून आलं.
-
महाराष्ट्रातला कांदा दिल्लीला जाणार
लासलगावहून दिल्लीला ८४० टन कांदा होणार आज रवाना. शासनाच्या खरेदीतील कांदा दिल्लीकरांना कमी दरात होणार उपलब्ध. २१ व्हेगनच्या मालगाडीत आज दहा वाजता लासलगाव रेल्वे स्थानकात कांदा लोडिंगला होणार सुरुवात. कांदा लोडिंगसाठी लागणार सात ते आठ तासांचा कालावधी. लासलगावहून दिल्लीपर्यंत कांदा पोहोचण्यासाठी लागणार सुमारे २४ तास. कमी दरातील कांदा बाजारात आल्याने शेतकऱ्यांच्या कांदा दरावर दबावाची शक्यता. शासनाच्या निर्णयामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण. दिल्लीकरांना दिलासा; मात्र शेतकऱ्यांच्या कांदा दरावर घसरणीची भीती.
-
महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन
नागपूर जिल्ह्यात महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. पीएफ, रविवारी सुट्टी मिळावी, कामगार सुरक्षा आणि इतर मागण्यांसाठी कामगारांचं आंदोलन. कंपनीच्या मुख्य गेटबाहेर जमले हजारो कामगार. हिंगणा MIDC परिसरात कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कंपनीच्या गेटवर पोलीस सुरक्षा.
-
..तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटना टळली असती
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण. ज्या अतिदक्षता विभागात आगीची घटना घडली त्या दुर्घटना ग्रस्त विभागाच्या जवळच्या दुसऱ्या युनिटमध्ये महिन्यापूर्वी वॉशिंग मशीन जळाली असल्याची माहिती आता समोर आली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी हा प्रकार दडवून ठेवला. तेव्हा हा प्रकार वरिष्ठना सांगितला असता तर विद्युत यंत्रणेतील बिघाड समोर आला असता आणि ही दुर्घटना टळली असती.
-
धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
जिल्हा परिषदेचा तब्बल 71 कोटींचा निधी शासनाकडे परत. स्थगिती, आचारसंहिता आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे निधी खर्चाला खीळ. रस्ते, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठ्यासह विकासकामांना मोठा फटका. डीपीसीच्या कामांवरील आठ महिन्यांची स्थगिती अन् निवडणूक आचारसंहितेमुळे निधी खर्चासाठी पडला वेळ कमी. अखर्चित निधी परत मिळावा, जिल्हा परिषदेची शासनाकडे मागणी; मात्र शासनाचा स्पष्ट नकार. सामान्य प्रशासन ३० कोटी, बांधकाम १५ कोटी, पाणीपुरवठा ६ कोटी, पंचायत ६ कोटींचा निधी अखर्चित.
पुण्याच्या खेड तालुक्यातील वेताळे येथे रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने शेतकरी फुलाबाई बाबाजी बोंबले यांच्या शेतातील फुलोऱ्यावर आलेल्या सोयाबीन पिकावर विषारी तणनाशकाची फवारणी केली. अडीच एकर क्षेत्रातील सोयाबीन आणि ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.याबाबत खेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या व्यासपीठावर गोमूत्र शिंपडल्याच्या निषेधार्थ 14 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये काँगेसतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सनातन धर्म आणि मनुवादा विरोधात घोषणा दिल्या होत्या. त्यावरून हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. हिंदूवादी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.