Maharashtra News LIVE : बच्चू कडू शिंदेंच्या सेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार- सूत्र

Maharashtra News LIVE Updates : भोंदू अशोक खरात आज आठव्या गुन्ह्यात न्यायालयात VC द्वारे हजर होणार. एसआयटी पोलिस कोठडीसाठी करणार जोरदार युक्तिवाद. सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एसआयटीने अशोक खरातला आठव्या गुन्ह्यात ताब्यात घेतले.

Maharashtra News LIVE : बच्चू कडू शिंदेंच्या सेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार- सूत्र
Breaking news
| Edited By: | Updated on: Apr 30, 2026 | 10:16 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Apr 2026 10:16 AM (IST)

    पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल याचा विचार करणार – बच्चू कडू

    दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही. शेतकऱ्यांच्या लढाईत एक इंचही फरक पडणार नाही. प्रहार संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार. पण पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल, या अनुषंगानेही विचार करु. जेवढा माझ्या अंगातील रक्ताचा थेंब पक्षासाठी धावेल, तेवढाच शेतकरी, मजूर आणि दिव्यांगासाठी धावणार आहे. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही

  • 30 Apr 2026 10:13 AM (IST)

    आमचे सर्व मुद्दे शिवसेनेने स्वीकारले – बच्चू कडू

    काल परवा जी चर्चा झाली. त्यात आमचे सर्व मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. हमीभावात सुधारणा करण्याची गरज आहे. लाडक्या बहिणीमधील विधवा बहीण तशाच आहेत, दिव्यांगांचे मंत्रालय स्थापित केले पण त्याचे बळकटीकरण झाले नाही, हे सर्व मुद्दे मान्य झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेत आहे. शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचा प्रयत्न करु, असे बच्चू कडू म्हणाले.

  • 30 Apr 2026 10:07 AM (IST)

    बच्चू कडू थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार?

    प्रहारचे बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बच्चू कडू थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. ते आज शिंदेंच्या सेनेकडून परिषदेसाठी अर्ज दाखल करणार असल्याचं समजतंय. कडूंच्या स्वागतासाठी नंदनवन बंगल्याबाहेर दिव्यांग पोहोचले आहेत.

  • 30 Apr 2026 09:50 AM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

    नाशिक जिल्ह्यातील अष्टलक्ष्मी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्या ंच्या संदर्भात पत्र ट्विट च्या माध्यमातून समोर आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे थकीत पेमेंट तातडीने मिळणे बाबत पत्रात उल्लेख. मुख्यमंत्री सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य संजय कोलते यांना देखील प्रत पाठवण्यात आलेली आहे……

  • 30 Apr 2026 09:40 AM (IST)

    पालकमंत्री पंकजा मुंडे आजपासून दोन दिवसीय जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज पासून दोन दिवस जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील खरीप हंगाम 2026 ची पूर्वतयारी आढावा बैठक आणि खत टंचाई संदर्भात अधिकाऱ्यांसोबत त्या बैठक घेणार आहे, शिवाय जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संदर्भात देखील किती टँकर सुरु आहेत, किती गावांना अजून टँकरची आवश्यकता आहे या संदर्भात देखील त्या बैठक घेणार असून पाणीटंचाईच्या संदर्भात सविस्तर आढावा घेणार आहे,

  • 30 Apr 2026 09:30 AM (IST)

    झिशान सिद्धीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नुकताच विधान परिषदेच्या उमेदवारी घोषणा करण्यात आली. सर्वांना धक्का देत थेट झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काल बऱ्याच वेळ याबाबत बैठक सुरू होती. अखेर आज घोषणा करण्यात आली.

  • 30 Apr 2026 09:20 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे १५९ नागरिक बाधित

    जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असून उष्णतेशी संबंधित आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये मिळून एकूण १५९ रुग्ण आढळले आहेत. ‘हीट रॅश’ (पुरळ) आणि ‘हीट कॅम्प्स’ या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. उष्णतेची पुरळ असलेले ७६ रुग्ण, स्नायूंचे गोळे येणे ४४ रुग्ण आणि उष्मा थकवा आलेले ३१ रुग्ण
    तर ८ रुग्णांना चक्कर येण्यास त्रास वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे

  • 30 Apr 2026 09:05 AM (IST)

    तुळजापुरात थंड पेयामध्ये गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत काढले आक्षेपार्य फोटो आणि व्हिडिओ. आरोपी साहिल सलीम शेख यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. गेली दोन वर्षापासून आरोपी ब्लॅकमेल करत असल्याचा प्रकार उघड, पीडित मुलगी तुळजापूरच्या सायन्स अकॅडमी मध्ये गेली दोन वर्षापासून घेत आहे शिक्षण. आरोपी साहिल शेख याला अटक करण्यात आली असून तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे

  • 30 Apr 2026 08:58 AM (IST)

    मुंबईत पुढील चार दिवस तापमान कसं असेल?

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा वाढला असून पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईच्या मरिन ड्राइव्ह क्वीन नेकलेसवर पादचाऱ्यांची वर्दळ झाली कमी. मुंबईत पुढील चार दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांताक्रुझ वेधशाळेत किमान 28 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून मंगळवार आणि बुधवारीही अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे.

  • 30 Apr 2026 08:43 AM (IST)

    निलम गोरे आणि शितल म्हात्रे या दोघांपैकी विधान परिषदेवर कोण जाणार?

    विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बच्चू कडू यांचं नाव निश्चित सूत्रांची माहिती. तर निलम गोरे आणि शितल म्हात्रे या दोघांपैकी एकाची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता.

  • 30 Apr 2026 08:28 AM (IST)

    उष्णतेच्या लाटेमुळे 159 नागरिक बाधित

    जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे 159 नागरिक बाधित. जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असून उष्णतेशी संबंधित आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये मिळून एकूण 159 रुग्ण आढळले आहेत.’हीट रॅश’ (पुरळ) आणि ‘हीट कॅम्प्स’ या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

     

  • 30 Apr 2026 08:27 AM (IST)

    विधानपरिषदेच्या निवडणुकीत 10 वा उमेदवार उभा करणार का?

    राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत 10 वा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात काल रात्री वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याची सुत्रांची माहीती. काँग्रेसने उमेदवार दिल्यास महायुतीही उमेदवार देणार असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती.

  • 30 Apr 2026 08:12 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    एनसीपी नेता आनंद परांजपे यांना नंदनवन इथे घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. खाजगी कामासाठी भेट घेतल्याची माहीती. मात्र बंगल्यावर भेट घेतल्याने चर्चेला उधाण. येणाऱ्या काळात शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण.

  • 30 Apr 2026 08:11 AM (IST)

    रात्री उशिरा बच्चू कडू-एकनाथ शिंदे यांच्यात भेट काय ठरलं?

    बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यात नंदनवन या शिंदेंच्या निवासस्थानी रात्री उशिरा भेट. पक्ष विलीनीकरण आणि उमेदवारीबद्दल चर्चा झाल्याची माहिती. आज सकाळी पुन्हा 10 वाजता कडू घेणार शिंदेंची भेट. कडू यांच्या रूपाने शिंदेंच्या सेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचे नाव घोषित होण्याची शक्यता.

शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबतच्या संवादाचा मनसेने निषेध केला. संजय निरुपम आज मुंबईतील ओशिवरा येथे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांशी संवाद साधणार होते, ज्याला वर्सोवा विधानसभा मनसे अध्यक्ष संदेश देसाई यांनी विरोध केला आहे. आता मनसेच्या विरोधानंतर संजय निरुपम आज ऑटो रिक्षा चालकांशी संवाद साधणार की नाही, हे पाहावे लागेल. कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष यांच्या बनावट सहीने मिळवले 70 कोटी रुपयांचे कंत्राट. कुंभमेळा कामांची वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी अज्ञाताने केली कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही. नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. अज्ञाताने बनावट सही द्वारे 35 कोटी रुपयांचे दोन वर्क ऑर्डर तयार केले. मात्र कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण गेडाम यांना आपली सही नसल्याचे लक्षात आल्यानंतर उघडकीस आला प्रकार.

Follow Us