AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टि्वस्ट, काँग्रेसचा उमेदवार देण्याचा निर्णय, मग दगा-फटका कोणासोबत होणार?

Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक रंजक होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसची भूमिका महत्वाची होती.

Vidhan Parishad Election : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टि्वस्ट, काँग्रेसचा उमेदवार देण्याचा निर्णय, मग दगा-फटका कोणासोबत होणार?
harshwardhan sapkal
| Updated on: Apr 30, 2026 | 10:39 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टि्वस्ट आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने एकमताने उद्धव ठाकरे यांचं समर्थन केलं होतं. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तर आमचा पाठिंबा आहे असं काँग्रेसने आधीच स्पष्ट केलं होतं. पण उद्धव ठाकरे विधान परिषदेवर न जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून काल अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज सकाळी माध्यमांशी बोलले. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार देणार आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत टि्वस्ट आला आहे. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर एकूण 10 उमेदवार होतील. भाजपचे पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि मविआचा एक उमेदवार विधान परिषदेवर सहज निवडून येऊ शकतो. पण आता काँग्रेसने 10 वा उमेदवार दिल्यास एक उमेदवार पडणार? हे निश्चित आहे. तो उमेदवार अर्थाच मविआचा असू शकतो. विधान परिषदेच्या एका जागेसाठी 28 मतांचा कोटा आहे. महायुतीकडे त्यांचे आठ उमेदवार निवडून आणण्याइतका कोटा आहे.

मग या भांडणात सरशी कोणाची होणार?

मविआचे एकूण 46 आमदार विधानसभेत आहेत. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार विधान परिषदेवर जाऊ शकतो. त्यांना दोन उमेदवार निवडून आणायचे असतील तर अतिरिक्त 10 मतांची बेगमी करावी लागेल. काँग्रेस जर स्वत:चा उमेदवार देणार असेल, तर त्यांच्याकडे फक्त 16 आमदार आहेत. पण अजून 12 मतांची गरज आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत. त्यांना सुद्धा 8 मतांची गरज आहे. मग या भांडणात सरशी कोणाची होणार? कारण महायुतीने अतिरिक्त उमेदवार उतरवण्याचा अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही. त्यांनी अतिरिक्त उमेदवार दिला तर मतांची फाटाफूट निश्चित आहे. काल रात्री अतिरिक्त उमेदवार देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते.

भाजपचे उमेदवार कोण?

सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील भेंडे, विवेक कोल्हे

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार कोण?

निलम गोऱ्हे किंवा शितल म्हात्रे यांच्यापैकी एक

बच्चू कडू यांना मिळू शकते उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

झीशान सिद्दीकी उमेदवार

उद्धव ठाकरे गट

अंबादास दानवे उमेदवार

Follow Us
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो.
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर...
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर....
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...