AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात अभूतपूर्व घडामोडी, बच्चू कडू यांच्याकडून अत्यंत मोठी घोषणा, थेट शिवसेनेचा धनुष्यबाण अखेर..

विधान परिषदे निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यादरम्यानच बच्चू कडू यांनी अत्यंत मोठी घोषणा केली. अखेर बच्चू कडू यांच्याकडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजकारणात अभूतपूर्व घडामोडी, बच्चू कडू यांच्याकडून अत्यंत मोठी घोषणा, थेट शिवसेनेचा धनुष्यबाण अखेर..
Bachchu Kadu
| Updated on: Apr 30, 2026 | 10:38 AM
Share

शिवसेना शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर काल बच्चू कडू यांनीही खुलासा ठेवला. आता यादरम्यानच बच्चू कडू यांनी मोठे विधान केले. बच्चू कडू यांनी म्हटले की, शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहे. दिव्यांगाच्या कल्याणासाठी हा धनुष्यबाण हाती घेत आहे. प्रहार ही संघटना कायम राहणार आहे. शिवसेना वाढीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान करू. बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उमेदवाराची ऑफर देण्यात आली. मात्र, त्यांना याकरिता धनुष्यबाण हाती घ्यावा लागणार होता. शेवटी आता बच्चू कडू यांनी मोठी घोषणा करत धनुष्यबाण हाती घेत असल्याचे स्पष्ट केले. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण धनुष्यबाण हाती घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा लढा कायम लढू असेही त्यांनी म्हटले.

बच्चू कडू यांनी म्हटले की, शिवसेनेची राजकीय ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. पण त्याच्या बदल्यात आम्हाला हवी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची ताकद आणि दिव्यांगांची ताकद. त्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा समजोता होणार नाही. शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी दिव्यांग मंत्रालय जर उभे राहिले तर त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करू.

शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये एक इंचही फरक पडणार नाही. प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रहार सामाजिक संघटना कायम राहणार. मात्र, पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल याकरिता या अंगातील रक्ताचा प्रत्येक थेंब पक्षासाठी धावणार आहे, तितकाच शेतकरी, मजूर आणि दिव्यांगासाठी धावणार आहे.

कोणताही समझोता शेतकरी आणि दिव्यांगांसाठी होणार नाही. राजकीय प्रवासाची सुरूवात शिवसेनेतून केली होती. शेतकरी आणि दिव्यांगांचे मुद्दे हाती घेऊन पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. बच्चू कडू यांच्याकडून शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडू शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. आता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

Follow Us
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो.
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर...
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर....
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...